बीट हे थंड हवामानातील पीक असून बीटची प्रत, रंग, चव आणि उत्पादन थंड हवामानात चांगले येते. थंड हवामानात साखरेचे प्रमाण वाढते. जर जास्त तापमान असेल तर मुळाना चांगला रंग येत नाही. तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास बीटच्या खाण्यायोग्य मुळाची पूर्ण वाढ न होताच पीक फुलावर येते.
बीट पिकाला आवश्यक जमीन
बीट पिकाची लागवड निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत करता येते. परंतु बीड हे जमिनीत वाढणारे कंदमुळे असल्याने जमीन चांगली भुसभुशीत आणि पाण्याचा उत्तम निचरा असणारी असावी. भारी जमिनीत बीटची लागवड केल्यास मुळाचा आकार वेडावाकडा होतो. बीटच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू सहा ते साडेसात असावा. जमिनीचा सामू नऊ ते दहा पर्यंत असणाऱ्या खारवट क्षारयुक्त जमिनीतही बीडचे पीक उत्तम येते. महाराष्ट्रातील हवामानात रब्बी, खरीप हंगामातही बिटाची लागवड केली जाते.
बीटचा लागवडीचा हंगाम
बीट हे थंड हवामानात वाढणारे पीक असून पिकाच्या वाढीसाठी थंड हवामान पोषक असते. बीटचा रब्बी हंगामातील लागवडीसाठी बियांची पेरणी ऑक्टोबर मध्ये करावी. महाराष्ट्रातील हवामानात बीडचे पीक खरीप हंगामात घेतले जाते. त्यासाठी बियांची पेरणी जून जुलै महिन्यात केली जाते.
बीटच्या विविध जाती
बीडच्या आकारमानाप्रमाणे त्याचे चपटे गोल, लंबगोल आणि लांब असे प्रकार पडतात. डेट्राईट डार्क रेड आणि क्रिमसन ग्लोब या दोन गोल आकाराच्या जाती भारतात चांगल्या वाढतात.
- डेटट्राइट डार्करेड-या जातीची मुळे एकसारखी गोल आकाराचे,मुलायम असतात.मुळ्यांचा रंग गर्द लाल असतो. मुळातील गराचा रंग रक्तासारखा गर्द लाल असतो. या जातीमध्ये कंदाचा वरील पानाचा भाग कमी असतो. पाने गर्द हिरव्या रंगाची व मरून रंग मिश्रित असतात.या जातीचे पीक लागवडीनंतर 80 ते 100 दिवसात तयार होते. हा अधिक उत्पादन देणारे वाण आहे.
- क्रिमसन ग्लोब- या जातीची मुळे गोल्ड चपट्या आकाराचे असतात. मुळाचा रंग मध्यम लाल असतो. मुळातील गराचा रंग फिकट लाल असतो. कापल्यानंतर यामध्ये रंगाच्या स्तरांचे रचना दिसून येत नाही. पाने मोठी गर्द हिरवी आणि मरून रंग मिश्रित असतात. कंदाचा वरील भाग मध्यम ते उंच असतो.
बीटाचे बियाण्याचे प्रमाण, लागवड अंतर आणि लागवडीची पद्धत
एक हेक्टर लागवडीसाठी बीट रूट चे सात ते दहा किलो बियाणे लागते. बीटचे एक बी म्हणजे दोन किंवा जास्त बियांचा समूह असतो.बिटाची लागवड पाभरीने पेरून किंवा बी टाकून करतात. बिटाची लागवड करण्यासाठी 45 सेंटिमीटर अंतरावर सऱ्या कराव्यात आणि वरंब्यावर 15 ते 20 सेंटिमीटर अंतरावर बिया टोकून लागवड करावी. काही वेळा 30 सेंटिमीटर अंतरावर पाभरीने पेरणी करतात. नंतर विरळणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावे. बीटचे बी पेरणीपूर्वी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्या बियांची उगवण चांगली होते.बियाणे पेरताना जमिनीत ओलावा असावा. बिटाची लागवड 30 ते 45 बाय 15 ते 20 सेंटिमीटर अंतरावर करावी.
Published on: 22 November 2021, 11:24 IST