Agripedia

आपण कोणी 10 वर्षांपासून तर कोणी 50 वर्षांपासून शेती करत आहोत,बियाणे ,खते,कीडनाशके, यांची आपल्याला माहिती पाहिजे.

Updated on 05 March, 2022 7:04 PM IST

आपण कोणी 10 वर्षांपासून तर कोणी 50 वर्षांपासून शेती करत आहोत,बियाणे ,खते,कीडनाशके, यांची आपल्याला माहिती पाहिजे. सर्व प्रथम कृषी केंद्रावर माल घेण्यासाठी जातांना आपल्याला थोडा दुकानदार चा अभ्यास असावा, कृषी केंद्रचालक प्रामाणिक आणि विस्वासू असावा, औषध आणताना औषधांचा अभ्यास असावा, माहिती असावी आपण काय आणतो? कशासाठी आणत आहे? त्याचे प्रमाण किती लागते? त्याने काय परिणाम होईल,आपण कोणत्या कंपनीचे औषध घेतले? कंपनी कोणती?त्या कंपनी ची विश्वासार्हयता किती ? योग्य आहे की नाही ? आपल्याला सर्व बाजूचा अभ्यास असायला हवा, सध्याच्या काळात 

आपल्या प्रत्येकाच्या हातात आता स्मार्ट फोन आहे, कोणतीही

माहिती एका क्षणात मिळते.

  सर्व काही दुकानदाराला विचारने किंवा इतरांना विचारने सोडा, आणि आपण स्वतः अभ्यासू बणा, सजग व्हा, प्रयोगशील व्हा.

        माहिती विचारने योग्यच पण कामापूरती माहिती आपल्याला स्वत ला असणे गरजेचेआहे.

आपण शेतकरी आहोत, आपली शेती आहे,आपल्याला सर्व माहिती असावी,फार नाही पण कामाची माहिती प्रत्येक शेतकऱ्याला असली पाहिजे .आपल्याजवळ स्मार्ट फोन आहे ,शेती क्षेत्राच्या अनेक हेल्पलाईनस आहेत त्यांचा वापर करा, शेती संदर्भाचे अनेक चांगले व्हाट्स अपचे ग्रुप्स आहेत,त्यांचा आपण फायदा घेतला पाहिजे. आपण दरवर्षी बियाणे घेतो, खते घेतो, कीडनाशके घेतो,मग त्याची माहिती आपण दुकानदाराला किंवा दुसऱ्याला का विचारतो? मित्रांनो त्यासाठी आपण सगळे प्रयोगशील झालो पाहिजे, सजग झालो पाहिजे, जागृत झालो पाहिजे.

एक मात्र खरे आहे पारंपरिक पद्धतीने शेती केली तर शेतीला लावलेला खर्चही वसूल होत नाही. गेल्या 4/5 वर्षांपासून शेती हा व्यवसाय सातत्याने घाटयातच जात आहे, त्याला राज्य कर्ते आणि शासकीय धोरनेही तितकीच जबाबदार आहेत. आपल्याला प्रत्येक वर्षी तोटाच होत आहे. त्यासाठी आजच्या काळात हायली क्वालिफाईड आणि अनुभवी अशा सल्लागार/मार्ग दर्शकाची आवश्यकता शेती क्षेत्राला भासू लागली आहे.

 मि माझी, शेती, कृषी केंद्र,घर सांभाळून भगवती सिड्स चे एकूण 35 ग्रुप्स शेतकऱ्याच्या मदती साठी विनामूल्य चालवतो, मला शेतकरी असे प्रश्न विचारतात की त्यांची कीव करावीशी वाटते, अगदी क्षुल्लक निरर्थक प्रश्न विचारतात. 

मी नवीन नवीन माहिती देऊन तुम्हाला सजग आणि जागृत करण्याचा प्रयत्न करतो, पण ग्रुप्स वर अशे ही काही महाभाग सापळतात की 15 दिवसापूर्वी ,1 महिन्यांपूर्वी टाकलेला लेख कींवा पोस्ट वाचत नाहीत, आणि काही अडचन आली की ग्रुप वर विचारतात आणि त्यांना त्याचक्षणी त्याचे उत्तर हवे असते,कसे शक्य आहे मला? अशा मित्राची मदत करणे, असो.

        ही पोस्ट लिहिण्याचा एकच उद्देश आहे तो म्हणजे तुम्ही सजग व्हा, हुशार व्हा,शेतीचा अभ्यास करा, जमिनीत रमा एकदा का तुम्ही जमिनीत रमायला सुरुवात केली तर जमीन तुमच्याशी बोलू लागेल.शेती मनलावून करा,नवनवीन उपायांमुळे, प्रयोगांमुळे उत्पादन वाढीस मदत होईल, आणि अशी नाविन्यता तुम्हाला तुमच्या शेतातच सुचेल.आपली काळी आई,पोटच्या मूला सारखी जपलेली पिके ,बैल, पशु पक्षी तुमच्याशी बोलू लागतील, शेतीत रमल्यामुळे एकना एक दिवस आपलाही येईल, येणारा काळ, पुढची 10/15 वर्ष ही शेती आणि शेतकऱ्यांचीच असतील यात शंकाच नाही.

खते,बियाणे,कीडनाशके,कीड रोग त्यावरील उपाय यांची माहिती ठेवा, पिकांचे सुक्ष्म निरीक्षण करायला शिका, आणि कृषी केंद्रावर गेल्यावर मला हे द्या ते द्या ,असे सांगा, तुम्ही मागा. तो देईल ते घेऊ नका ,स्वार्थ कोणालाच सुटत नाही दुकानदारही व्यवसाय घेऊन बसला आहे, तो त्याचा व्यवसाय करण्यासाठी पैसे लावतो वेळप्रसंगी व्याजाने पैसे घेऊन व्यवसायात टाकतो ,त्याने फुकट किंवा नफा न घेता वाटण्यासाठी व्यवसाय टाकलेला नाही. त्यासाठी तुमचा 10 ते 50 वर्षाचा शेतीचा अनुभव तुम्हाला तारेल. दुकांनदारावर,बोगस कृषी सल्लागारांच्या सुळसुळाटावर, आणि कंपन्यांच्या भुलभुलैय्यावर जर तुम्ही अवलंबून राहिलात तर तुमचा उत्पादन खर्चही निघणार नाही.शेती हे एक शास्त्र आहे, आपल्या वाडवडिलांनी शिकलेल्याना नोकरीवर पाठवले आणि निरीक्षरांना शेतीवर ठेवले म्हणूनच शेती आणि शेतकऱ्यांची आजची ही दैनावस्था झाली आहे.

 

शिंदे सर

भगवती सिड्स

9822308252

English Summary: Be aware, the time to come is 100% agriculture and farmers, know how
Published on: 05 March 2022, 07:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)