अलीकडे अनेक शेतकरी पारंपरिक पिकपद्धतीला फाटा देत नगदी पिकांची लागवड करत आहेत तसेच अनेक शेतकरी औषधी पिकांची देखील लागवड करत आहेत व यातून चांगला मोठा नफा कमवीत आहेत. औषधी वनस्पतीची लागवड आपल्या देशात खूपच लोकप्रिय बनत आहे, तसेच शेतकरी बांधव औषधी वनस्पतींच्या लागवडीतून चांगली मोठी कमाई करत आहेत. औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी जास्त पैसे गुंतवण्याची गरज नसते, या वनस्पतीची लागवड अगदी कमी खर्चात केली जाऊ शकते. आज आपण अशाच एका औषधी वनस्पतीच्या लागवडीविषयी जाणून घेणार आहोत.
आज आपण तुळशीच्या शेती विषयी माहिती जाणून घेऊया. तुळशीच्या शेतीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी खूपच कमी भांडवलाची गरज लागते. तुळशीची लागवड अवघ्या पंधरा हजार रुपयांत केली जाऊ शकते. तसेच तुळशीचे पीक हे अवघ्या तीन महिन्यात तयार होते म्हणजे आपण या पिकातून तीन महिन्यानंतर उत्पादन प्राप्त करू शकता.तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे, तुळशीची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या कंपन्या तुळशीची खरेदी करत असतात, तसेच या कंपन्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुद्धा करतात. म्हणजे शेतकऱ्यांना तुळशीचे उत्पादन घेण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देतात. असे सांगितले जाते की तुळशीच्या पिकातून हेक्टरी तीन लाख रुपये कमाई केली जाऊ शकते.
म्हणजे फक्त तीन महिन्यात तुळशीच्या लागवडीतून तीन लाख रुपये कमवले जाऊ शकतात. तुळशीला बाजारात खूप मोठी मागणी आहे, अनेक आयुर्वेदिक कंपन्या, याची खरेदी करतात. तसेच आपण तुळशीला सरळ बाजारात देखील विकू शकतो यासाठी आपणास व्यापाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल. तुळशीची लागवड ही जुलै महिन्यात केली तर त्यापासून मिळणारे उत्पादन हे दर्जेदार असते.
तुळशीच्या झाडांची पाने जेव्हा पूर्ण विकसित होतात तेव्हा तुळशीची काढणी केली जाते. शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा तुळशीचे पिक हे फुलोरा अवस्थेच्या आधीच काढून झाले पाहिजे. कारण की फुलोरा अवस्थेत असताना तुळशीच्या पिकातले तेल कमी होते, परिणामी याला मार्केटमध्ये डिमांड कमी असते. शेतकरी मित्रांनो तुळशीचे पीक काढणी करण्यापूर्वी दहा दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे.
Published on: 25 December 2021, 04:30 IST