Agripedia

आता शेतीमध्ये असलेल्या परंपरागत पद्धती सोडून शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला आहे.शेतकरी आता विविध प्रयोग आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतीत विविध प्रकारचे आधुनिकपिके घेण्याकडे वळला आहे.

Updated on 24 August, 2021 3:19 PM IST

 आता शेतीमध्ये असलेल्या परंपरागत पद्धती सोडून शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला आहे.शेतकरी आता विविध प्रयोग आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतीत विविध प्रकारचे आधुनिकपिके घेण्याकडे वळला आहे.

 महाराष्ट्रातील शेतकरी आता सफरचंदाचे पीक देखील घेऊ लागले आहेत तसेच विदेशी भाजीपाला लागवडीत सुद्धा वाढ झाली आहे. या लेखामध्ये आपण तुळस लागवड कशी करावी व त्यातून मिळणारे उत्पन्न याबद्दल माहिती घेणार आहोत.

 तुळस लागवडीसाठी योग्य काळ

 जर तुळस लागवड करायची असेल तर ती जुलै महिन्यात करणे योग्य ठरते. जर तुम्हाला तुळशीपासून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर त्यासाठी चांगल्या जातीच्या तुळशीची निवड करावी लागते.

 जर आपण तुळशीच्या जातींचा विचार केला तर त्यामध्ये आर आरएलओसी बारा हे वाण उत्तम आहे. तसेच दुसरी म्हणजे आर आरएलओसी 14 हेवान देखील चांगल्या पद्धतीची समजले जाते.आर आर एल ओ सी 12 या वाणाची  लागवड ही 45×45 सेंटी मीटर अंतरावर करावी. तसेच आर एल ओ सी 14 या वाणाची लागवड 50×50 या अंतरावर करणे सोयीस्करठरते. ज्या शेतामध्ये  तुळस लागवड करायची आहे अशा शेतामध्ये पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाची सोय असेल तर फारच उत्तम असते. तुळस या पिकाला आठवड्यातून एकदा आवश्यकतेनुसार पाणी देणे गरजेचे असते. जेव्हा पिकाची कापणी करायची असते त्या आधी दहा दिवस पिकाला पाणी देणे टाळावे.

 

कंपनी करार पद्धतीने लागवड

 तुम्ही तुळस लागवड ही कोणत्याही कंपनीशी करार करून करू शकता.अशा कंपन्यांमध्ये वैद्यनाथ,डाबर, पतंजली  यासारख्या कंपन्या तुळस लागवडीसाठी करा करीत असतात. या कंपनीच्या माध्यमातून देखील तुळस लागवड करता येऊ शकते.अशाप्रकारे जर तुळस लागवड केली तर दरमहा 30 हजार रुपये उत्पन्न मिळू शकते.तुळस लागवडीसाठी एकरी 15,000 रूपये खर्च येतो.

जर सध्या तुळशीच्या मागणीचा विचार केला तर कोरोना महामार्ग च्या काळात लोकांचा कल हा आयुर्वेदिक व निसर्ग औषधांकडे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या  औषधांचामागणीत वाढ झालेली दिसून येते. या सर्व कारणांचा परिणाम म्हणून तुळशीची मागणी देखील बाजारातलक्षणीय  प्रमाणात वाढल्याचे दिसून येते.

English Summary: basil cultivation is step of financial progress
Published on: 24 August 2021, 03:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)