भारतात जवळपास सर्वत्र उसाची शेती बघायला मिळते. आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जात असते. अनेकदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसात वाढत असलेल्या तणामुळे/गवतमुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनात घट सहन करावी लागते आणि त्यांना आर्थिक भुर्दंड बसतो.
तणामुळे उसाची कॉलिटी देखील खराब होत असते. यामुळे उसाच्या पिकात तन नियंत्रण करण्यासाठी आणि ऊस शेती मधून चांगले उत्पन्न अर्जित करण्यासाठी BASF या कंपनीने वेसनिट कम्प्लिट नामक कीटकनाशक लॉंच केले आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तर नियंत्रण करणे सोपे होणार असून उत्पादनात वाढ होणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ऊस उत्पादनात भारत संपूर्ण जगात दुसऱ्या क्रमांकावर विराजमाम आहे. महाराष्ट्राचा भारताच्या एकूण ऊस उत्पादनात मोठा सिंहाचा वाटा आहे. ऊस पिकातून बहुतांश शेतकऱ्यांना चांगला नफा देखील मिळत असतो. ऊस हे एक नगदी पीक आहे. त्यामुळे याचे भाव कधीच पडत नाहीत. याशिवाय उस पीक खराब होण्याची भीती नसते. मात्र असे असले तरी तणाचा या पिकावर विपरित परिणाम होत असतो.
या अनुषंगाने बीएएसएफने हे कीटकनाशक लाँच केले आहे. यामुळे पिकाचे तणांपासून संरक्षण होणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. उस पिकामध्ये विविध प्रकारचे गवत आणि रुंद पानांचे तण आढळत असते, ज्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या निर्माण होतात, अनेकदा यामुळे उत्पादनात घट देखील होते.
वेसनिट कंप्लिट ची विशेषता
वेस्निट कंप्लीट ऊस पिकाचे तणांपासून दीर्घकाळ संरक्षण करण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. ऊस पिकाव्यतिरिक्त मका पिकामध्ये आढळणारे तण देखील या कीटकनाशकामूळे नियंत्रित करता येणार आहे. यामुळे या कीटकनाशकाचा मका उत्पादक शेतकऱ्यांना तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
शेतकऱ्याच्या मते, हंगामाच्या सुरुवातीला ऊस व मक्याचे पीक तणमुक्त ठेवले गेले तर पिकांचे उत्पादन खुप अधिक वाढू शकते. शास्त्रज्ञांच्या मते, व्हेस्निट कंप्लिटचा वापर ऊस आणि मका पिकांसाठी उदयोन्मुख औषधी वनस्पती म्हणून होणार आहे.
BASF इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक नारायण कृष्णमोहन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतात शेती हा एक प्रमुख व्यवसाय आहे. यामुळे शेतकऱ्यांची मेहनत कमी व्हावी आणि पिकाचा दर्जा वाढावा यासाठी हा पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन हे काम करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. एकंदरीत हे कीटकनाशक मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
Published on: 25 March 2022, 01:48 IST