Agripedia

केळी हेच तर खरे कल्पवृक्ष आहे.

Updated on 14 October, 2022 7:08 PM IST

केळी हेच तर खरे कल्पवृक्ष आहे. जळगाव जिल्ह्याची ओळख केळीचे आगार म्हणून संपूर्ण जगात असणे गौरवाची बाब आहे. जळगावची केळी, नवतंत्रज्ञान, टिश्‍यूकल्चरची केळी भारतात आणि भारताबाहेर प्रसिद्ध पावलेली आहे. याचे सगळे श्रेय जळगावच्या केळी उत्पादक भूमिपुत्रांना जाते. केळी उत्पादकांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे कार्य जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले व ते तंत्रज्ञान सगळ्यांना उपलब्ध करून दिले.त्यामुळे आज जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्याने

पिकविलेली केळी जीआय मानांकन मिळवून विश्वाच्या पटलावर आलेली आहे. Cultivated bananas have come to the world stage by getting GI rating.

या तारखेपासून पासून पावसाचा जोर होईल कमी.तर या तारखेपासून धुके थंडी सुर्यदर्शन व हवामान कोरडे !

येथील केळी उत्पादकांना याचे श्रेय द्यायला हवे म्हणूनच आपण टपाल विभागाबरोबर पाठपुरावा करत केळीचे चित्र व माहिती असलेले पाकिट (इनव्हलप) आज (ता.११) प्रकाशित करीत आहोत, असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.विश्व टपाल दिनाचे औचित्य साधून जळगाव टपाल विभागाने अशोक जैन यांच्याहस्ते जळगाव केळी यावरील विशेष पोस्टाच्या पाकिटाचे प्रकाशन गांधी

उद्यानात सकाळी करण्यात आले. व्यासपीठावर या वेळी ऑल इंडिया बनाना ग्रोवर्स असोसिएशनचे सचिव वसंतराव महाजन, जळगाव टपाल विभागाचे अधीक्षक बी.व्ही. चव्हाण, निसर्गराजा कृषिविज्ञान केंद्र, तांदलवाडीचे अध्यक्ष शशांक पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.केळीला जागतिक पातळीवर पोचविण्यासाठी, केळीला जीआय मानांकन मिळविण्यात शशांक पाटील यांचे प्रयत्न व जैन टिश्युकल्चरच्या गुणवत्तापूर्ण केळीची मिळालेली जोड आणि त्यास कृषी विभागाचेही मिळालेले सौजन्य या सगळ्यांचे

मनःपूर्वक अभिनंदन करत जळगाव जिल्ह्याची स्वतंत्र ओळख असलेल्या केळीला पोस्टाच्या पाकिटावर स्थान मिळाले याचा आनंद अशोक जैन यांनी व्यक्त केला.ऑल इंडिया बनाना ग्रोअर्स असोसिएश���चे सचिव वसंतराव महाजन यांनी सांगितले, की जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांनी केळीमध्ये टिश्युकल्चर तंत्रज्ञान आणून केळीला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. केळी उत्पादक शेतकऱ्यांचा टपाल खात्याचा अगदी जवळचा संबंध असल्याचे त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत स्पष्ट केले. केळीचे जीआय (जिऑग्राफिकल इंडेक्स)

मानांकन प्राप्त तांदळवाडी निसर्गराजा कृषिविज्ञान केंद्राचे अध्यक्ष शशांक पाटील यांनी मानांकन मिळविण्यासाठी काय करावे लागले, ते सविस्तर सांगितले. यावेळी जळगाव टपाल विभागाचे अधीक्षक बी. व्ही. चव्हाण यांनी देखील मनोगत व्यक्त केले.हे जळगाव केळीवरील विशेष इनव्हलप गांधी रिसर्च फाऊंडेशनने जैन टिश्युकल्चर यांच्या मदतीने तयार केले आहे. याच्या ४ हजार प्रति करण्यात आल्या आहेत. लवकरच त्या जनसामान्यांसाठी गांधीतीर्थ आणि जळगावच्या टपाल कार्यालयात उपलब्ध होतील. डॉ. आश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले.

English Summary: Banana is a real Kalpa tree
Published on: 14 October 2022, 04:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)