Agripedia

शेतकरी बांधवांनो काळाच्या ओघात शेती क्षेत्रात बदल करणे महत्त्वाचे आहे. शेतीत प्रामुख्याने पारंपरिक पीक पद्धतीत बदल करण्याचा सल्ला दिला जातो कृषी तज्ञांच्या मते, शेतकरी बांधवांनी पारंपरिक पिकांऐवजी नगदी किंवा फळबाग पिकांची लागवड केली पाहिजे.

Updated on 02 April, 2022 10:17 PM IST

शेतकरी बांधवांनो काळाच्या ओघात शेती क्षेत्रात बदल करणे महत्त्वाचे आहे. शेतीत प्रामुख्याने पारंपरिक पीक पद्धतीत बदल करण्याचा सल्ला दिला जातो कृषी तज्ञांच्या मते, शेतकरी बांधवांनी पारंपरिक पिकांऐवजी नगदी किंवा फळबाग पिकांची लागवड केली पाहिजे.

आज आपण फळबाग पिकांपैकी महत्त्वाचे पीक अर्थात केळीच्या लागवडी विषयी जाणून घेणार आहोत. केळीच्या शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे केळीची लागवड एकदा केल्यानंतर सलग पाच वर्षे यापासून उत्पादन घेतले जाऊ शकते. केळी हे एक नगदी पीक आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना याची शेती विशेष फायदेशीर ठरू शकते. अलीकडे मोठ्या प्रमाणात केळीची शेती केली जाऊ लागली आहे राज्यात खानदेश प्रांतात सर्वात जास्त केळीच्या बागा नजरेस पडतात. शेतकरी बांधव केळीची लागवड करून चांगला नफा कमवत आहेत.

शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केळीची लागवड करण्यासाठी खर्च खूपच कमी येतो. कमीत कमी खर्चात केळीच्या पिकातून जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाऊ शकते. कदाचित त्यामुळेच आजकाल अनेक शेतकरी केळीची लागवड करत आहेत. यामुळेच शेतकरी आता गहू, मका या पारंपरिक पिकांची लागवडीकडे पाठ फिरवून नगदी पिकांकडे अधिक वळू लागले आहेत.

संबंधित बातमी:-काय सांगता! खांदेशातील शेतकऱ्यांचा अभिनव प्रयोग; सुबाभूळ शेती ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक बिघा केळीची लागवड करण्यासाठी सुमारे 50,000 रुपये खर्च येतो. 50 हजार रुपये लागवड करून आपण दोन लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा कमवू शकता. इतर पिकांच्या तुलनेत केळी पिकास धोका कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

केळी पिकासाठी सेंद्रिय खताचा वापर केल्यास खर्च कमी येतो आणि शेतमालाचा दर्जा देखील चांगला बनतो. शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने केळीची लागवड करावी आणि शेणखत वापरावे.  केळी काढणीनंतर उरलेला कचरा शेताबाहेर टाकू नये.  ते शेतातच ठेवावे, जे सेंद्रिय खत म्हणून काम करते. त्यामुळे केळीचे नक्कीच उत्पादन वाढते.

संबंधित बातमी:-खरंच की काय…! नवयुवक शेतकऱ्याने शेडनेट उभारून केवळ तीन महिन्यात कमविले लाखों रुपये

केळीची लागवड केल्यानंतर यां पिकापासून सुमारे 5 वर्षे उत्पादन सहज घेता येते. केळी पिकातुन दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी या पिकाची विशेष काळजी द्यावी लागते. केळीच्या बागेतून तण काढणे खूप महत्वाचे आहे म्हणून केळीच्या बागेची वेळोवेळी निंदनी करणे महत्त्वाचे ठरते.  सिंहपुरीच्या केळीची रोबेस्टा जात इतर जातीपेक्षा उत्तम  असल्याचा दावा केला जातो. या जातीच्या केळीची शेती केल्यास जास्त उत्पन्न मिळते. केळीची शेती ही रिस्कफ्री आहे आणि कमी खर्चात नफा जास्त मिळतो. त्यामुळे शेतकरी केळी लागवडीकडे वळत आहेत. एक रोप 60 ते 70 किलोपर्यंत उत्पादन देऊ शकते.

संबंधित बातमी:-धक्कादायक! मोदी सरकारने पीएम किसान योजनेचा निकष बदलला महाराष्ट्रातील तब्बल 21 लाख शेतकरी राहणार वंचित

English Summary: Banana farming can be a boon for farmers; Learn more about this
Published on: 02 April 2022, 10:17 IST