Agripedia

पारंपरिक पिकांना फाटा देऊन वेगळ्या पिकांच्या उत्नादनातून चांगलं उत्पन्न मिळवण्याचा विचार करत असाल तर बांबू शेती (Bamboo Farming) हा त्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. बांबूला हिरवं सोनं असं म्हटलं जातं. ज्या शेतकऱ्यांना लखपती व्हायचं आहे, त्यांनी बांबू शेती करावी, असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं असतं.

Updated on 19 July, 2021 6:47 AM IST

पारंपरिक पिकांना फाटा देऊन वेगळ्या पिकांच्या उत्नादनातून चांगलं उत्पन्न मिळवण्याचा विचार करत असाल तर बांबू शेती (Bamboo Farming) हा त्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. बांबूला हिरवं सोनं असं म्हटलं जातं. ज्या शेतकऱ्यांना लखपती व्हायचं आहे, त्यांनी बांबू शेती करावी, असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं असतं.

बांबूचा वापर विविध उद्योगधंद्यांत केला जातो तसंच फर्निचर निर्मितीसह अनेक कामांसाठी बांबू वापरला जातो. तुम्हाला जाणून थोडंसं आश्चर्य वाटेल, की भारत दर वर्षी 60 दशलक्ष कोटी रुपये किमतीच्या बांबूची आयात (Bamboo Import) करतो. त्यामुळे तुम्हीदेखील या हिरव्या सोन्याची शेती करणार असाल तर तुम्ही लवकरच लखपती होऊ शकाल. बांबू शेती कशी करायची, याविषयी आता जाणून घेऊ या.

हेही वाचा : बांबू शेती करताय मग हे एकदा अवश्य बघा; भविष्यातील शाश्वत कमाईचा उत्तम मार्ग

देशातलं बांबू उत्पादन वाढावं, यासाठी केंद्र सरकारने बांबू मिशन (Bamboo Mission) सुरू केलं आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना बांबू शेती करण्यासाठी प्रतिझाड 120 रुपये शासकीय अनुदान (Government Subsidy) दिलं जातं. देशात सातत्याने बांबूला मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तुम्ही बांबू शेती सुरू केली तर मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो. बांबूची शेती हंगामानुसार (Season) केली जात नाही. तसंच अन्य पिकांसाठी जसा वेळ द्यावा लागतो तसा वेळ या पिकासाठी द्यावा लागत नाही. एकदा बांबू लागवड केली, की 4 वर्षांनंतर बांबू कापणी केली जाते. 

 

या गोष्टी लक्षात ठेवा

बांबूशेती सुरू करण्यापूर्वी बांबूविषयी सर्वांगीण माहिती घेणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या जातीच्या बांबूची लागवड करायची बाजारात त्याची विक्री कशा पद्धतीनं करायची आहे, हे ठरवावं लागेल. बांबूच्या 136 जाती आहेत. त्यामुळे लागवडीच्या अनुषंगाने तुम्हाला शंका निर्माण होऊ शकतात, अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कृषी विभागातल्या आपल्या जवळच्या कार्यालयात किंवा या विषयातल्या तज्ज्ञाकडून किंवा कृषी विज्ञान केंद्रातून याबद्दलची पूर्ण माहिती लागवडीआधीच मिळवणं अत्यावश्यक आहे. बाजारपेठ निश्चित माहिती झाल्याशिवाय उगाचच लागवड करण्याची घाई करून उपयोग नाही.

 

उत्पन्नाचं गणित

तुम्ही 3 मीटर बाय 2.5 मीटर अंतरावर बांबूची झाडं लावली, तर एक हेक्टर क्षेत्रात सुमारे 1500 रोपांची लागवड होईल. तसंच दोन झाडांमधल्या मोकळ्या जागेत तुम्ही अन्य पिकंही घेऊ शकता. 4 वर्षांनंतर 3 ते 3.5 लाख रुपये उत्पन्न सुरू होऊ शकेल. दर वर्षी पुनर्लागवड करण्याची गरज नसते. कारण बांबूचं झाड किमान 40 वर्षं जगू शकतं.

प्रवीण सरवदे कराड
प्रतिनिधी गोपाल उगले

English Summary: Bamboo farming 'green gold' can make you a millionaire, earn Rs 3 to 3.5 lakh after planting
Published on: 19 July 2021, 06:47 IST