Agripedia

बांबू हा ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग आहे. बांबूला गरीब माणसाचे लाकूड असे देखील म्हटले जाते. बांबूच्या विविध त्याच्या बाबतीत भारत चीनपेक्षा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ईशान्येकडील राज्यांना बांबू च्या विविध तेचे भांडार म्हटले जाते.

Updated on 07 March, 2022 2:48 PM IST

बांबू हा ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग आहे. बांबूला गरीब माणसाचे लाकूड असे देखील म्हटले जाते. बांबूच्या विविध त्याच्या बाबतीत भारत चीनपेक्षा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ईशान्येकडील राज्यांना बांबू च्या विविध तेचे भांडार म्हटले जाते.

बांबू हे भारतातील दहा दशलक्ष हेक्‍टर क्षेत्रावर पीक घेतले जाते. जर सर्वसाधारणपणे आपल्याकडे बांबूची शेती ही लागवडीयोग्य जमीन नाही त्यामध्येच करतात. मात्र काही ठिकाणी व्यावसायिक दृष्टिकोनातून बांबूची शेती केली जाते. जर भारताचा विचार केला तर बांबूची लागवड क्षेत्र अंदाजे 13 टक्के आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण बांबू शेती चे महत्व, बांबू उत्पादनाविषयी समज व गैरसमज याविषयी माहिती घेऊ.

 प्रश्नोत्तराच्या माध्यमातून बांबू शेतीची माहिती

  • आपल्याकडे असलेल्या बांबूची जात कुठली असेल बांबू कसा ओळखता येतो?

 आपल्याकडे महाराष्ट्रात बांबूच्या नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सहा जाती आहेत. त्यातल्या मेस आणि माणगा या जाती मूळच्या कोकणआणि सह्याद्रीतील आहेत. त्यासोबतच परिबास ही जात गडचिरोली जिल्ह्यामध्ये आढळते. काटे कळक आणि काष्टी या दोन जाती महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आढळतात.बांबूची जात ओळखायला त्याची फुले, पाने, काठ्याची जाळी, तेरा चा आकार तसेच किरण वरील रोमांची रचना यादी गोष्टी लागतात या सर्व बाबींचा विचार करून बांबू ओळखता येतो.

2-आपल्याकडे कुठला बांबू लावता येईल?

 महाराष्ट्र मध्ये आठ ते दहा जातीच्या बांबूची व्यावसायिक तत्त्वावर लागवड करता येते. त्यासाठी पावसाळा सोडता सहा ते आठ महिने पाण्याची व्यवस्था,जमिनीचा पोत,पर्जन्यमान, जमिनीवर असलेली इतर झाडे तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे बांबू विक्री साठी आवश्यक असणारी बाजारपेठ या गोष्टींचा विचार होणे अतिशय गरजेचे आहे. या गोष्टींवर आपण कुठल्या जातीचा बांबू लावणार हे ठरवले जाते.

3-बांबूला पाण्याची किती आवश्यकता असते आणि बोअरवेलच्या पाण्यावर बांबू येतो का?

 कुठल्या जातीचा बांबू कुठल्या वातावरणामध्ये आणि काय उद्देशाने लावला आहे यावर त्या बांबूला  किती पाणी लागेल हे ठरते. बोअरवेलच्या पाण्यावर बांबू ठिबक सिंचन करून नक्कीच लावता येतो.

4- बांबूची एकरी उत्पन्न किती येते व लागवड कशी करतात?

बांबू  चे एकरी उत्पन्न साधारणपणे 45 हजार ते एक लाख प्रती वर्ष एवढे येऊ शकतो. यापेक्षाही जास्त उत्पन्न घेणे शक्‍य आहे पण त्यासाठी बांबूचा आणि बांबू व्यापाराचा सखोल अभ्यास लागतो. बांबूची लागवड रोपापासून किंवा खुंटापासून करता येते.

5- लागवड केल्यानंतर किती वर्षात बांबूचे उत्पादन येते?

 योग्य व्यवस्थापन असेल तर साधारणपणे चार ते पाच वर्षात उत्पन्न सुरू होऊ शकतो.जर बांबू पिकाची योग्य व्यवस्थापन घेतले नाही तर आठ ते दहा वर्षांनी उत्पन्न सुरू होऊ शकते व त्यासोबत उत्पादन कमी देखील येते. बांबूच्या लागवडी बायो सीएनजी तसेच जैव इंधनासाठी  केल्या जातात त्यांचे उत्पन्न बाजार बाजार असेल तर तीन वर्षात सुरू होते.

बांबूला कुठल्या प्रकारची खते द्यायची असतात व फवारणी कुठली लागते?

चांगले कुजलेले शेणखत भरपूर प्रमाणात असणे चांगले असते. रासायनिक खतांची गरज ही मातीच्या गुणधर्मावर अवलंबून असते. बांबूला तशी फवारणीची गरज पडत नाही. अगदी सुरुवातीला एखादी बुरशी किंवा पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.त्यावेळी रोगाच्या प्रमाणानुसार योग्य ती फवारणी करावी. एकदा का बांबूचे बेट तयार झाले की फवारणीची गरज लागत नाही.

7- बांबू शेती साठी काय मेहनत घ्यावी लागते?

 खड्डे खोदणे, रोपे लावणे,पाणी देणे, वर्षातून एकदा किंवा दोनदा वेड्यावाकड्या फांद्या तसेच काठ्या तोडणे,  रोपांना तसेच बेटांना दरवर्षी गरजेनुसार मातीची भर घालने इत्यादी कामे व्यवसायिक  लागवडीसाठी आवश्‍यक आहे.

8-बांबू लागवड केल्याने जमीन नापीक होते का?

 उलट बांबू लागवडीचे योग्य नियोजन व व्यवस्थापन केले असल्याने जमिनीचा पोत सुधारतो.

9-क्षारपड जमिनीमध्ये बांबू लागवड करता येते का?

बांबूसावल्गारिस ही बांबूची जात क्षारपडजमिनीत लागवडीस योग्य आहे.इतर जातींची सुद्धा प्रायोगिक तत्त्वावर लागवड करता येते.

10-कुठल्या बांबूची काठी चांगली तयार होते?

आपल्याला नक्की काय उपयोग करायचा आहे यावरच चांगली काठी म्हणजे नक्की काय ते ठरते. सरळ काठी हि मेस, माणगा, टूलडाया जातीपासून मिळते.

11-लागवड किती अंतरावर करतात?

 कुठल्या जातीचा बांबू काय उद्देशाने निवडलेला आहे यावर लागवडीचे अंतर ठरते. जातीनुसार प्रति एकर 200 ते 330 बांबू लावणे योग्य राहते.यापेक्षा जास्त दाट लागवड करायची असेल तर व्यवस्थापन फार काटेकोर असणे गरजेचे आहे.

11- या मध्ये आंतरपीक घेता येईल काय?

लागवडीनंतर पहिली तीन वर्षे पिके घेता येऊ शकतात.पहिल्या वर्षी कुठलेही आंतरपीक घेता येते. त्यानंतर मात्र सूर्यप्रकाशाचा विचार करून पीक नियोजन करावे लागते. शेवगा तसेच बहुवार्षिक तूर,पपई इत्यादी पिके घेता येतात.

12-बांबूची तोडणी कशी करतात?

  साधारणपणे चार ते पाच वर्षांनी एकदा बांबूचे बेट तयार झाले की त्यातील ज्या काठ्याना तीन वर्षे पूर्ण झाली आहेत अशा काठ्या निवडून तोडाव्यात. त्यासाठी योग्य व्यवस्थापन असणे गरजेचे आहे.(source-modern agrotech)

English Summary: bamboo cultivation is very profitable and crucial for farmer that give more income
Published on: 07 March 2022, 02:48 IST