जैविक कीडनियंत्रण म्हणजे पिकांवरील किडींचे नियंत्रण हे त्यांच्या नैसर्गिक शत्रु द्वारे करण्याची पद्धत होय. हे आपल्याला माहिती आहे. यामध्ये किडिवरील परोपजीवी तेव्हा पर भक्षक कीटक किंवा अन्य रोगजंतूंचा वापर करून किडींची संख्या नियंत्रणात आणून की आर्थिक नुकसानपातळीच्या खाली ठेवणे म्हणजे जैविक कीड नियंत्रण होय.
या पद्धतीचा पर्यावरणावर कुठल्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होत नाही. या पद्धतीमध्ये पिकांना उपद्रवी किडीच्याजीवनक्रमाचा सखोल अभ्यास केला जातो व त्या माध्यमातूनसंबंधित किडीचे नैसर्गिक शत्रू शोधले जातात.
त्यांचे प्रयोगशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रजोत्पादन करून उपद्रवी किडीचा उद्रेक झालेल्या भागातील पिकावरत्यांना प्रसारित करण्यात येते. या लेखामध्ये आपण काही महत्त्वाचे जैविक घटक जे वेगवेगळ्या प्रकारच्या किडी साठी उपयुक्त पडतात त्यांची माहिती घेणार आहोत.
किडनीहाय जैविक घटकांचा वापर
1- पीक व त्यावरील कीटक व रोग-कपाशी, ऊस, टोमॅटो, तुर, भुईमूग, वांगे यासारख्या पिकांवर विविध हानिकारक बुरशींचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे मूळ कुजणे, खोड सडणे, पानगळ, मररोग, रोपे कोलमडणे, कोंब कुजणे, कंद कुजणे आणि झाड वाळते यासारखे रोग पडतात.
यासाठी ट्रायकोडर्मा या जैविक घटकाचा उपयोग….
एक उपयुक्त बुरशी असून तिचा उपयोग जैविक रोग नियंत्रणासाठी केला जातो. हानिकारक बुरशीना नियंत्रणात ठेवण्यासाठी ट्रायकोडर्मा या बुरशीचा वापर केला जातो. ही बुरशी हानिकारक गोष्टींवर जगून आपली उपजीविका व जीवन क्रम पूर्ण करते. त्यासोबत जमिनीतील स्फुरद विरघळणारे ची प्रक्रिया ही फास्ट होते.
2- बोंड अळी व अन्य पतंग वर्गीय किडींच्या बंदोबस्तासाठी- ट्रायकोग्रामा चीनोलीस ( ट्रायको गार्ड)- ट्रायकोग्रामा की लहान गांधिलमाशि बोंड आळीच्या अंड्यांना शोधते त्यावर बसते व अंडी घालते. त्यातून तयार झालेली ट्रायकोग्रामा ची अळी बोंड आळीच्या अंड्यातील बलकावर आपले पोषण करते. बोंड आळी सोबतच अन्य पतंग वर्गीय किडींसाठी उपयोगी आहे.
3-बोंड आळी, मावा, पांढरी माशी, तुडतुडे यांच्या बंदोबस्तासाठी - क्रायसोपा कीटक - क्रायसोपा हे परभक्षी कीटक असून याची आळी उपद्रवी कीड यांचे भक्षण करते. क्रायसोपाच्या अळ्यांना मोठ्या नांग्या सारखे दात असतात. या दातांच्या सहाय्याने ही कीड उपद्रवी किडींना घट्ट धरून त्यांच्या शरीरातील रस शोषून घेतात.
4- कोपिडोसोमा कोइहेलरी- बटाटा पोखरणाऱ्या अळीच्या बंदोबस्तासाठी ही जैविक कीड उपयुक्त आहे.
5-झायकोग्रामा- गाजर गवत च्या नियंत्रणासाठी झायगोग्रामा या भुंगेरा चा वापर फायदेशीर ठरतो.
Published on: 22 March 2022, 02:48 IST