१. प्रतिबंधात्मक उपाय:-
तणांचा प्रादुर्भाव व तणांची वाढ होऊ नये म्हणून वापरल्या जाणाऱ्या पद्धतींचा समावेश प्रतिबंधात्मक उपायामध्ये होतो. उदा. प्रमाणित बियाणे वापरणे, तणविरहीत बियाणे पेरणे, पीक पेरणीपूर्वी तणांचा नायनाट करणे. पूर्ण कुजलेले शेणखत/कंपोस्ट खत वापरणे, जमिनीची पूर्व मशागत योग्य रितीने करणे, शेताचे बाध पाण्याच्या च
री/पाट व शेतातील रस्ते तण विरहीत ठेवणे इत्यादी.
२. निवारणात्मक उपाय:-
तणाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तणांची तीव्रता कमी करण्यासाठी वापरावयाच्या सर्व पद्धती या प्रकारात मोडतात.
1.भौतिक व यांत्रिक पद्धतींचा समावेश होतो. उदा. हाताने तण उपटणे, कोळपणी, खुरपणी, खांदणी, मशागत,
कापणी, छाटणी, तण क्षेत्रात पाणी साठवणे, जाळणे, आच्छादन करणे इ.
- स्पर्धात्मक जलद वाढणारी पिके घेणे, योग्य पीक पद्धतींचा व योग्य पेरणी पद्धतीचा अवलंब करणे, हेक्टरी रोपांची संख्या योग ठेवणे, योग्य पीक फेरपालट, आंतरपिक पद्धतीचा अवलंब करणे, खते व पाणी देण्याच्या सुधारित पद्धतीचा वापर करणे इत्यादी (बिगर खर्चिक पद्धती) माशगत पद्धती आंतर्गत येतात.
- जैविक पद्धतीने तणांचा बंदोबस्त करणे.
4.रासायनिक पद्धतीने तणांचा बंदोबस्त करणे.
तण व्यवस्थापनाच्या विविध पद्धती वापरून त्यांचे दिसून येणारे अपेक्षित परिणाम व विशिष्ट प्रकारच्या पद्धतीचा
अवलंब करावयाची शक्यता खालील गोष्टींवर अवलंबून असते.
अ. तणांचा प्रकार व त्याने व्यापलेले क्षेत्र.
ब.हवामान परिस्थिती.
क. त्या विभागाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती.
ड.तण व्यवस्थापनाच्या विविध पद्धती, आर्थिक बाजू व वापरावयाच्या पद्धतीची कार्यक्षमता,
अशा अनेक बाबींचा विचार करून, तणांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करण्यासाठी एकच पद्धत न वापरता अनेक पद्धतींची योग्य सांगड घालावी लागते. यालाच 'एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धत असे म्हणतात.
एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धत:-
१.पेरणीनंतर लगेच पीक व तणे उगवणी पूर्वी तणनाशकाची फवारणी करणे(रासायनिक पद्धत) +पेरणीनंतर १-२ कोळपण्या करणे (यांत्रिक पद्धत)+जरुरीनुसार खुरपणी करणे(यांत्रिक पद्धत)
2.पेरणीनंतर १५-२० दिवसांनी कोळपणी अथवा खुरपणी करणे (यांत्रिक पद्धत)+खुरपणीनंतर १५-२० दिवसांनी उगवलेल्या तणांवर उगवणी नंतर वापरावयाच्या तणनाशकाची फवारणी करणे. (रासायनिक पद्धत)+जरुरीनुसार मोठी तणे हाताने उपटून अथवा विळ्याने कापून काढणे (यांत्रिक पद्धत)
3.पेरणीनंतर लगेच पीक व तणे उगवणी पूर्वी तणनाशकाची फवाराणी करणे (रासायनिक पद्धत)+३०-३५ दिवसांनी उगवलेल्या तणांवर तणनाशकाची फवारणी करणे.(रासायनिक पद्धत)+जरुरीनुसार मोठी तणे हाताने
उपटून अथवा विळ्याने कापून काढणे (यांत्रिक पद्धत)
यापैकी कोणत्याही एका पद्धतीची सांगड घालून प्रभावी तण व्यवस्थापण आपण करू शकतो.
- विकास सानप नाशिक
संकलन - IPM school
Published on: 11 October 2021, 06:50 IST