Agripedia

अप्रमाणित कीटकनाशक किंवा दोन रसायनांचे मिश्रण करणे यातून धोके मोठे आहेत.

Updated on 18 August, 2022 2:52 PM IST

अप्रमाणित कीटकनाशक किंवा दोन रसायनांचे मिश्रण करणे यातून धोके मोठे आहेत. कृषी विभागाकडून याची जागृती गावापर्यंत पोचत नाही.तसेच जिथे बोगस आणि अप्रमाणित उत्पादने विक्री होत आहेत, तेथे कडक कारवाई अपेक्षितपणे होत नाही. यामुळेच शेतीतला हा विषप्रयोग धोकादायक पातळीवर आहे.

यवतमाळ जिल्ह्यात पिकांना रोगांपासून वाचवतानाच्या कीटकनाशक फवारणीत ५७ पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे बळी गेलेत. सांगली जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब आणि भाजीपाल्यासाठी कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय.Pesticides are widely used for vegetables. जिल्ह्यात मल्लेवाडी (ता. मिरज) आणि उंटवाडी (ता. जत) येथेही कीटकनाशक फवारणीवेळी दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. अर्थात त्यांच्या मृत्यूपश्‍चात

वैद्यकीय तपासणी अहवालात वेगळी कारणे समोर आली आहेत. अप्रमाणित कीटकनाशक किंवा दोन रसायनांचे मिश्रण करणे यातून धोके मोठे आहेत. कृषी विभागाकडून याची जागृती गावापर्यंत पोचत नाही. तसेच जिथे बोगस आणि अप्रमाणित उत्पादने विक्री होत आहेत, तेथे कडक कारवाई अपेक्षितपणे होत नाही. यामुळेच शेतीतला हा विषप्रयोग धोकादायक पातळीवर आहे.

विषाची परीक्षा घेऊ नका अशी मराठीत म्हण आहे. नेमके तेच सध्या शेतीच्या क्षेत्रात सुरू आहे. अधिक मोहासाठी शेतकरीबांधव विषाची परीक्षा घेतो आहे. नाशिकपाठोपाठ सांगली जिल्ह्यात द्राक्ष उत्पादकांची संख्या मोठी आहे. शिराळा तालुक्‍यात भात, तर आटपाडी, जतसह माण, सांगोला भागात डाळिंबांसह कापूस उत्पादन घेतले जाते. बागायती

क्षेत्रात उसासह भाजीपाला उत्पादनासाठी कीटकनाशकाचा वापर अनिवार्य आहे.मात्र, रोगांपासून बचावासाठी विषाचा वापर कसा आणि किती करावा, हे शास्त्रोक्तरीत्या समजावून घेणेच महत्त्वाचे आहे. पिकांचे रक्षण करण्याच्या प्रयत्नात शेतकरी कीटकनाशकांबाबत घ्यावयाची काळजी पूर्णपणे विसरून जाताहेत. भविष्यात तरी शेतकऱ्यांनी पिकांचे रक्षण करताना स्वतःचे आणि ते उत्पादन जे लोक अन्न म्हणून खाणार आहेत त्या सर्वांची काळजी

घेण्याची गरज निर्माण झाली आहे.कीटकनाशकांचा अमर्याद वापर केल्याने संपूर्ण मानवी आरोग्यच धोक्‍यात आले आहे.जगभरात सेंद्रिय शेतीला महत्त्व आले आहे; पण आपल्या जिल्ह्यात होणाऱ्या काही पिकांबाबत रसायनांच्या माऱ्याशिवाय पर्यायच दिसत नाही. कीटकनाशके मारणारा आणि ते पदार्थ खाणारा हे दोघेही धोक्‍यात आहेत.जिल्ह्यात द्राक्षाचे सुमारे सव्वा लाख एकर, डाळिंबाचे सुमारे १२ हजार एकर, केळी सुमारे चार हजार एकर, कापसाचे चार हजार एकर आणि विक्रीसाठी निव्वळ भाजीपाल्यांचे क्षेत्र किमान २० हजार एकरांवर आहे.

चांगल्या उत्पादनासाठी कीटकनाशक फवारणी ठरलेलीच असते. जिल्ह्यात द्राक्ष हंगामातच किमान ५००० कोटी रुपयांवर कीटकनाशकांची विक्री होते. ऊस आणि अन्य पिकांवरही आता कीटकनाशकांचा वापर सुरू झाला आहे. शिराळा तालुक्‍यातील भात पिकावर पडलेला तांबेरा रोग, टोळधाडीने नुकसान होते. त्यावर नियंत्रणासाठी औषधांची फवारणी होतेच. यवतमाळ जिल्ह्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यात कीटकनाशक फवारताना शेतकऱ्यांचा मृत्यू सार्वत्रिक

चर्चेचा विषय झाला आहे. **त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी काय दक्षता घ्यावी, याबाबत जागृती महत्त्वाची आहे. कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी कोणती दक्षता घ्यावी, यासाठी चार हजार पत्रके छापून ग्रामपंचायतीमार्फत शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोचवली जात आहे.    प्रायोगिक तत्त्वावर काही शेतकऱ्यांना हातमोजे, बुट, गॉगल, टोपी, मास्कचे वाटप करणार

असून,जनजागृतीसाठी दोन मोबाईल (चित्ररथ) व्हॅन फिरत आहेत. शेतकरी गट, बाजाराच्या ठिकाणी माहिती दिली जात आहे. ‘झेडपी’चा कृषी विभागही मदतीला आहे. जिल्ह्यात मल्लेवाडीतील शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला, तर उंटवाडीच्या शेतकऱ्याचा न्यूमोनियाने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. - 

 

संकलन - विष्णू मोहिते

राजेंद्र साबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

English Summary: Awareness about pesticides is needed because...
Published on: 18 August 2022, 02:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)