Agripedia

यंदा पावसाळ्यात चारही महिने समाधानकारक पाऊस राहणार आहे. विशेष म्हणजे हा अंदाज भारतीय हवामान खात्याने

Updated on 28 March, 2022 2:37 PM IST

यंदा पावसाळ्यात चारही महिने समाधानकारक पाऊस राहणार आहे. विशेष म्हणजे हा अंदाज भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवला नसून चक्क ऑस्ट्रेलिया हवामान खात्याने वर्तवला आहे. ऑस्ट्रेलियन हवामान खाते आपल्या अचूक निर्णयामुळे संपूर्ण जगात ख्यातीप्राप्त आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आनंद गगनाला भिडला आहे.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी थेट ऑस्ट्रेलियाहून येतेय. ऑस्ट्रेलियन हवामान खात्यानुसार यंदा चारही महिने राज्यात दमदार पाऊस होणार आहे. 

मागील दोन वर्षाप्रमाणेचं यावर्षी देखील चांगला पावसाळा होणार असल्याचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत. 

गेल्या दोन वर्षात आपल्या राज्यात सर्वसाधारण पावसापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यापूर्वी मात्र, तब्बल 8 वर्ष मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात महाराष्ट्राने दुष्काळ अनुभवला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज शेतकऱ्यांसाठी संजीवनी देण्याचे कार्य करणारा आहे. प्रतिष्ठित ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने समाधान कारक पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या असून 

त्यांना खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळण्याची आता आशा आहे.हवामान खात्यानुसार, पावसाळ्याच्या (Mansoon) सुरुवातीपासून अर्थात जूनच्या सुरुवातीपासून यंदाच्या पावसाळ्यात धो-धो पाऊस बरसणार आहे. यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात देखील सर्वसाधारण पावसापेक्षा अधिक पावसाची नोंद होऊ शकते. या अंदाजामुळे महाराष्ट्रातील शेतकरी सुखावले असून आगामी खरीप हंगामात निदान पावसाच्या बाबतीत तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

 ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज नुकताच जाहीर झाला आहे आणि आगामी काही दिवसात आपल्या भारतीय हवामान खात्याचा अंदाज देखील येणार आहे. 

त्यामुळे भारतीय हवामान खात्याचा महाराष्ट्रातील पावसाबाबत अंदाज काय असतो? हे विशेष बघण्यासारखे राहील. तूर्तास तरी या अंदाजामुळे महाराष्ट्रातील उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून ते पश्चिम पर्यंत चहुकडे शेतकऱ्यांमध्ये आनंदीआनंद बघायला मिळत आहे

  या अंदाजानुसार महाराष्ट्र राज्यात 98 ते 104 टक्के पाऊस पडणार असल्याचे सांगितले गेले आहे. पावसाळा चांगला असला की, शेतीच्या उत्पादनात वाढ होते, पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण मिटते, मुक्या जनावरांना उन्हाळ्यात मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध होतो, यामुळे शेती व्यवसायाला गती मिळते, दुग्ध व्यवसायाला चालना मिळते. एकंदरीत चांगल्या पावसामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होत असते.

English Summary: Australian weather forecast section in Maharashtra 4 months rainfall
Published on: 28 March 2022, 02:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)