Agripedia

खंडाळा,बोरगाव वसु,अन्वी येथील शेतकऱ्यांची मागणी;आंदोलनाचा इशारा

Updated on 10 May, 2022 9:41 PM IST

खंडाळा,बोरगाव वसु,अन्वी येथील शेतकऱ्यांची मागणी;आंदोलनाचा इशारा

चिखली:खंडाळा म ते दिवठाणा या रस्त्याचे काही वर्षापुर्वी मातीकाम व खडीकरण करण्यात आले होते.परंतु ते काम अर्धवट अवस्थेत सोडुन देण्यात आल्याने या संपुर्ण रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्याने पावसाळ्यात शेतकऱ्यांना या रस्त्यावरुण शेती मशागती साठी व शेतमाल वाहतुकीसाठी अडचणी निर्माण होत असल्याने या चिखली खामगाव रोडला दिवठाणा फाटा येथे जोडणारा खंडाळा ते दिवठाणा रस्ता खुला करुण याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे,अशी मागणी स्वाभिमानीसह खंडाळा म,अन्वी,बोरगाव वसु येथील शेतकरी यांनी दि ०४मे २०२२रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.प्रसंगी तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

खंडाळा म ते दिवठाणा या रस्त्याचे मातीकाम अंदाजे दहा ते पंधरा वर्षापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते.त्यावेळी फक्त दिड ते दोन कि मी चेच खडीकरण काम करण्यात आले होते.तर तेव्हा ते काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले होते.तर आता या रस्त्याची खस्ता हालत झाली असुन काहि ठिकाणी झाडे झुडपं उगल्याने तर काहि ठिकाणी रस्त्यावरील अतिक्रमणात वाढ झाल्याने हा रस्ता अरुंद झाला आहे. या रस्ताचा वापर शेतकरी शेती मशागत करणे आपला शेतमाल वाहतुक करणे यासाठी करतात परंतु दोन चार वर्षापासुन पाऊस पडल्यावर या रस्त्यावरुण ये जाय करणे कठीण होते 

तर बैलगाडी, ट्रैक्टर व वाहतुक करणारे वाहणे चिखलात फसत असल्याने मोठी कसरत शेतकरी यांना करावी लागत आहे.

या रस्त्याचे काम करण्यात यावे,अशी ओरड शेतकरी अनेक दिवसांन पासुन करीत आहेत.परंतु या गंभीर समस्यांकडे संबंधीत प्रशासनाकडुन दुर्लक्ष होत असल्याने शेतकर्यानी आक्रमक पावित्रा घेतला असुन दिवठाणा ते खंडाळा रस्त्याचे अर्धवट खडीकरण काम केल्याप्रकरणी चौकशी करण्यात यावी,अरुंद रस्ता रुदीकरण करुण संपुर्ण रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे,पावसाळ्यात शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात 

 रस्त्याचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये समावेश करण्यात यावा,अशी मागणी खंडाळा म,अन्वी,बोरगाव वसु येथील शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता जि प बांधकाम विभाग बुलढाणा,तहसिलदार,ठाणेदार यांच्याकडे केली आहे.प्रसंगी मागण्यांची पुर्तता न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी निवेदनावर गजानन खेडेकर,विजय रुद्राक्ष, रामेश्वर पवार,विजय सुरडकर, नामदेव सपकाळ,प्रकाश डुकरे,आश्रुबा ठेंग,भगवान काकडे,भारत गाडेकर,गणपत गाडेकर,श्रीराम गाडेकर,भारत कदम,कडुबा भुतेकर यांच्यासह खंडाळा,दिवठाणा,बोरगाव वसु,अन्वी येथील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

English Summary: Asphalt the road from Khandala to Divathana to solve the problems of the farmers. Demand of the farmers
Published on: 10 May 2022, 09:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)