Agripedia

सुगंधित रोपे एक विशेष प्रकारची वनस्पती आहे, ज्याचा वापर एखाद्या पदार्थाला सुगंध आणि चव देण्यासाठी केला जातो.. त्यापैकी बरेच औषधी उद्देशाने देखील वापरले जाते. सुगंधी संयुगे वनस्पतींच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये असतात जसे कि मूळ, लाकूड, साल, झाडाची पाने, फूल, फळ, बियाणे इ. लेमन ग्रास, खस, मेंथा, जिरेनियम इत्यादी वनस्पती सुगंधित झाडे श्रेणीमध्ये येतात. सुगंधी तेलाचा उपयोग हा औषधी, कॉस्मेटिक्स, साबण आणि डिटर्जंट पावडरमध्ये केला जातो..

Updated on 16 September, 2021 6:51 PM IST

सुगंधित रोपे एक विशेष प्रकारची वनस्पती आहे, ज्याचा वापर एखाद्या पदार्थाला सुगंध आणि चव देण्यासाठी केला जातो.. त्यापैकी बरेच औषधी उद्देशाने देखील वापरले जाते. सुगंधी संयुगे वनस्पतींच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये असतात जसे कि मूळ, लाकूड, साल, झाडाची पाने, फूल, फळ, बियाणे इ. लेमन ग्रास, खस, मेंथा, जिरेनियम इत्यादी वनस्पती सुगंधित  झाडे  श्रेणीमध्ये येतात. सुगंधी तेलाचा उपयोग हा औषधी, कॉस्मेटिक्स, साबण आणि डिटर्जंट पावडरमध्ये केला जातो..गेल्या दोन दशकांपासून जागतिक बाजारात आवश्यक तेल, सुगंध रसायने औषधे आणि औषधी पदार्थांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

सुगंधित शेतीचे फायदे

1-सुगंधित शेती मधून अधिक उत्पन्न मिळते: पारंपारिक शेतीमधून येणाऱ्या उत्पन्नाची तुलना केली तर सुगंधित शेतीमधून येणारे उत्पन्न हे दुप्पट असते. सोयाबीन, गहू तारखे पारंपारिक शेतीमधून शेतकरी जवळ-जवळ 50 ते 60 हजार रुपये प्रतिवर्ष प्रतिएकर कमवू शकतो. परंतु सुगंधित  शेतीमधून प्रतिएकर शेतकरी सव्वा ते दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेऊ शकतो.

2-अतिवृष्टी,दुष्काळ इत्यादी परिस्थितीचा या शेतीवर कोणताही परिणाम होत नाही. पारंपारिक शेतीमध्ये दुष्काळामुळे, अतिवृष्टीमुळे किंवा कधी-कधी पीक कापणी करून शेतात असते ते पावसात ओले झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानला सामोरे जावे लागते. बहुसंख्य शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन शेतीसाठी भांडवल उभे केले असते. जर अशा प्रकारचे नुकसान झाले तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या अनेक काही वर्ष मागे जाऊ शकतो. परंतु  सुगंधित शेतीमध्ये अतिवृष्टी, दुष्काळासारख्या समस्यांचा प्रभाव जास्त पडत नाही.

3.या शेतीमधून रोजगार निर्माण होऊ शकतो.  जसे कि, कापणीला आणि शेतकऱ्याने जर

ऊर्धपातन युनिट / उभा  केला असेल तर तिथे त्याला मजूर लागतात.

  1. सिंचनाची कमी आवश्यकता :

सुगंधित शेती साठी जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता नसते. पाण्याच्या फवार्‍याने म्हणजे तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचनासारख्या साधनांनी ही  शेती करता येऊ शकते. आपल्याकडे  पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. दुष्काळग्रस्त भागांमध्ये भूमिगत जलस्तर  कमी होण्याची समस्या  उग्र  स्वरूपात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड करणे फायद्याचे ठरेल.

 

जिरेनियमची शेती

जगात अशा अनेक वनस्पती आहेत ज्यांची किंमत बाजारपेठेत खूपच आहे. ‘जिरेनियम’  ही वनस्पती यापैकीच एक असून सुगंधी उत्पादनांमध्ये या वनस्पतीच्या तेलाला सर्वाधिक मागणी आहे. आपण वापरत असलेल्या दैनंदिन सौंदर्य प्रसाधनांमध्ये जिरेनिय वनस्पतीचे  तेल सर्वाधिक प्रमाणात वापरले जाते. तसे पाहायला गेल्यास भारतीय बाजारपेठेतील जिरेनियम तेलाची गरज भागवण्यासाठी परदेशातून हे तेल मोठ्या प्रमाणात आयात करावे लागते. 

जिरेनियम लागवडी चे तंत्र

  • जिरेनियम.ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे. लागवडीसाठी मध्यम प्रतीची जमिनीवर आणि  माळरानावरही हे पीक घेता येईल. म्हणजे कि जिथे,  टॅक्टरनी नांगरता येईल अशा कोणत्याही जमिनीत जिरॅनियम पीक घेता येईल
  • सर्वसाधारण २०0C ते ३४0C तापमानात हे पीक चांगले येते . २० 0C पेक्षा कमी किंवा ३४0C  पेक्षा जास्त तापमानात पिकांची वाढ खुंटते व पाहिजे तसे उत्पन्न मिळत नाही. या पिकासाठी आद्रता ७५% ते ८० % लागते .
  • या पिकाची लागवड करताना शेतीची योग्यप्रकारे नांगरणी व मशागत करून घेणे खूप गरजेचे असते. कारण तीन वर्ष हे पीक शेतात राहणार आहे. मशागत केल्यानंतर बेड व्यवस्थित तयार करून घ्यावेत. त्यावर ठिबक टाकावे आणि चार बाय दीड फुटावर त्याची लागवड करावी.
  • या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्ष उत्पादन मिळते.
  • एका एकरमध्ये  १०, ०००  हजार रोप लागतात. लागवडी नंतर पहिल्यांदा हे पीक चार महिन्यानंतर कापणीला येते व त्यानंतर प्रत्येक तीन महिन्याला कापणीला येते . अशाप्रकारे हे पीक एका वर्षात तीनवेळा कापणीला येते.
  •  एकरी सुरूवातीला खर्च ७० ते ८० हजार येतो. इतर पिकाच्या तुलनेत फवारणी व खते यामध्ये  ७५% खर्च कमी आहे.
  • एका एकरात तीस ते चाळीस किलो ऑईल वर्षाला मिळू शकते. एक  लिटर ऑईलला किंमत जाग्यावर १२०००- १२, ५०० हजार रु मिळू शकतात. एक एकरमध्ये एका वर्षात चार ते पाच लाखाच ऑईल मिळू शकते.  एकरी उत्पादन सरासरी चार ते पाच लाख.

या वनस्पतीची भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी

या वनस्पतीची भारतात तेलाची मागणी दर वर्षाला २०० ते  ३०० टनाची आहे.पण सध्यस्थिती पाहता भारतात वर्षाला १० टन पण ऑईल निर्मिती होत नाही. त्यामुळे या आणी अशा सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड करणे  अधिक फायदेशीर ठरेल. अशा या औषधी वनस्पतीची भारतात लाखो एकर शेती केली तरी कमीच 

पारंपरिक पिकापेक्षा दुप्पट उत्पन्न

आपल्या पारंपरिक पिकापेक्षा हे पीक दुप्पट नफा देणारे आहे . या वनस्पतीवर फारसे किड रोग येत नाहीत. त्यामुळे खर्च कमी आहे आणि उत्पन्न जास्त आहे . कोणतेही जनावरं याचा पाला खात नाही. या पिकाला जास्त फवारणीची गरज नसते .निरोगी आणि १००%  उत्पन्न देणारे पीक आहे. तसेच जिरेनियम वनस्पतीच्या तेलाला शाश्वत बाजापेठ उपलब्ध आहे. बाजारामध्ये या पिकाला हमीभाव देखील मिळतो .,

 

काळजी

 जिरेनियम या पिकाच्या फांद्याची तोडणी करून त्यापासून तेल बनवले जाते.  ज्या भागात जास्त पाऊस पडतो तेथे फक्त या पीकाला पावसाळ्यात जास्त काळजी घावी लागते . कारण जास्त पावसामुळे पिकाच्या खालच्या भागातील फांद्या खराब होऊ शकतात . त्यामुळे पावसाळ्यात या पिकाची काळजी घेणे गरजेचे असते. उर्वरित ऋतूमध्ये या पिकावर काहीही परिणाम पडत नाही.

उपयोग

जिरेनियम तेलापासून अनेक सुगंधी पदार्थ बनवले जातात , जसे कि औषधी, कॉस्मेटिक्स साबण आणि डिटर्जंट शाम्पू , सेंट , अगरबत्ती पावडर, . अशा प्रकारच्या अनेक वास्तूमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो . या वस्तुंना बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे .व कापणी नंतर उरलेल्या पालापाचोळ्या पासून खत निर्मिती करता येते.

लेखक

प्रा. किरण सखाराम दांगडे

सहाय्यक प्राध्यापक, डॉ. विट्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळद घाट, अहमदनगर(४१४ १११)

 

English Summary: Aromatic Farming - Learn how to cultivate geranium
Published on: 16 September 2021, 06:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)