शेतकरी मका पिकातून (Corn crop) चांगले उत्पादन घेत असतात. परंतु मका पिकाची काळजीही तितकीच घ्यावी लागते. मका पिकावरील किडीचे दर दोन दिवसांनी निरीक्षण करणे गरजेचे असते.
मका पिकावरील लष्करी अळी अत्यंत विध्वंसक कीड आहे. या किडीचा प्रादुर्भाव (Insect infestation) मोठ्या प्रमाणात जाणवत असतो. सर्व उपाययोजनांचा एकात्मिक पद्धतीने अवलंब केल्यास मक्यावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन करून मका पिकाचे नुकसान टाळू शकता.
लष्करी अळी कशी ओळखाल
अळी - पूर्ण वाढलेली अळी ३.१ ते ३.८ सें.मी. लांब असते. अळीचा रंग फिकट हिरवा ते जवळपास काळा असतो. पाठीवर फिकट पिवळ्या रंगाच्या तीन रेषा असतात. तसेच शरीरावर काळे ठिपके असतात. मागच्या बाजूने दुसर्या वलयावर चौरसाच्या आकारात चार काळे ठिपके असतात.
नुकसानीचा प्रकार
लष्करी अळीचा प्रादुर्भाव (Armyworm infestation) मका पिकावर सर्व अवस्थेत आढळून येतो. या किडीची अळी अवस्था पिकांना नुकसान पोहचवते. सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या पानाचा हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे चट्टे दिसतात. मोठ्या अळ्या पाने कुरतडून खातात. त्यामुळे पानांना छिद्रे दिसतात.
दिलासादायक! पालेभाज्यांच्या दरात घट; जाणून घ्या आजचे बाजारभाव
एकात्मिक व्यवस्थापन असे करा
पाऊस पडण्याआधी खोल नांगरट करा जेणेकरून किड सूर्यप्रकाशाच्या तसेच पक्षांच्या संपर्कात येऊन मरून जाते. पिकांची फेरपालट करा. मका घेतलेल्या शेतात त्यानंतर भुईमूग अथवा सूर्यफूल घ्या. पेरणी पाऊस पडल्यानंतर करा. उशिरा पेरणी टाळा.
लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास निंबोळी अर्क (५%) किंवा ॲझाडीरॅक्टीन (१५०० पीपीएम) ५० मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करा. मका पेरणीनंतर लगेच एकरी दहा पक्षिथांबे उभारा.
पानांवर दिसणारे अंडीपुंज व सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. मक्यावरील लष्करी अळीसाठी कामगंध सापळे वापरा. किडींचे नैसर्गिक शत्रू उदा. परभक्षी व परोपजीवी कीटक (ट्रायकोग्रामा, टिलोनोमस, कॅम्पोलेटीस इ.) यांचे संवर्धन करा. त्यासाठी आंतरपिके व शोभिवंत फुलांची झाडे लावावी.
अळीचा प्रादुर्भाव दिसू लागताच जैविक कीटकनाशक नोमुरिया रिलाई ३ ग्रॅम किंवा मेटारायझिम ॲनीसोप्ली ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करा. प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीवर गेल्यास द्रावण पोंग्यात जाईल अशी फवारणी करा.
महत्वाच्या बातम्या
Business Tips: 15 हजार रुपये गुंतवून सुरू करा 'हा' व्यवसाय; महिन्याला 1 लाख रुपयांपर्यंत होणार कमाई
दूध उत्पादकांना मोठा दिलासा; १ सप्टेंबर पासून दुधाच्या दरात ७ रुपयांनी होणार वाढ
शेतकरी लाल भेंडीची लागवड करून चांगला नफा मिळवू शकतात; दर मिळतोय 500 रुपये किलो रुपये
Published on: 29 August 2022, 01:39 IST