मका हे प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाणारं पीक आहे. परंतु ज्या भागात मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध आहे किंवा सिंचनाची उत्तम सोय आहे, त्या भागात रबी आणि खरीपच्या बरोबर उन्हाळी पीकच्या स्वरूपात मक्याची शेती केली जाते किंवा केली जाऊ शकते. मका हे वेगवेगळे गुणधर्मयुक्त आहे, पण विशेषतः मका हे कार्बोहायड्रेटच खूप चांगला स्रोत असणारे पीक आहे. मका हे एक बहुउपयोगी पीक आहे जे माणसांसोबतच जनावरांनाही आहार म्हणून खूपच उपयोगाच आहे, त्याप्रमाणेच औद्योगिक दृष्टीनेही मकाला खुप महत्व आहे.
मक्याचा उपयोग माणसाच्या आहारातही मोठ्या प्रमाणात केला जातो. ग्रामीण तसेच शहरी भागातही मक्याच्या भाकरीचे सेवन केले जात. तसेच मकाच कणीस(भुट्ट)भाजून ही लोक ग्रहन करतात. तसेच कॉर्नफ्लेक्स, पॉपकॉर्न,लाह्या अशा विविध रूपात मका खाल्ला जातो. मकाचा उपयोग औद्योगिक क्षेत्रात ही केला जातो जसे कि क्रूड ऑइल, बायोफ्युल साठीपण आता मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. जवळपास 65% मक्याचा उपयोग कोंबड्यांचा व पशु आहारासाठी होतो. सोबतच मक्याचा चारा म्हणूनही गुर्हाढोरांसाठी उपयोग केला जातो. जो जनावरांसाठी खूपच पौष्टिक समजला जातो.मक्याचे कणीस काढल्यानंतर शिल्लक असलेलं कडबा पशुआहार चारा म्हणून कामात येतो. औद्योगिक दृष्टीने मकामध्ये प्रोटीनेक्स, चॉकलेट पेंट्स स्याही लोशन स्टार्च कोका कोलासाठी कॉर्न सिरप इत्यादी बनू लागले आहे. बेबीकॉर्न म्हणजे मक्यापासून प्राप्त होणारे बिना परागीत भुट्टा होय. बेबीकॉर्नच पौष्टिक मूल्य इतर शाक भाजीपेक्षा अधिक असते.
मक्यासाठी लागणारी जमीन आणि वातावरण
मका उष्ण व आदर्ता असणाऱ्या वातावरणात येणारे पीक आहे. मका पिकासाठी जिथे पाण्याचा निचरा अधिक होतो, अशी जमीन उपयुक्त ठरते.
मका पिकासाठी लागणाऱ्या जमिनीची मशागत
मका पीकच्या पेरणीसाठी पहिला पाऊस पडलन्याआधी नांगरणी करावी (15-20सेमी खोल) लागते नंतर रोट्याव्हेटर चा वापर करून (कुळव्याच्या 2-3पाळ्या देऊन) जमीन भुसभूशीत केली जाते. शेणखताचा वापर सुमारे 10-12 टन / हेक्टर येवढा केला जातो.नंतर पाऊस पडल्यानंन्तर मकाची पेरणी केली जाते व नंतर फळी मारून बेले पाडले जातात.
मका पेरणीचा कालखंड
- खरीप- जून पासून जुलै पर्यंत
- रबी – ऑक्टोबर पासून नोव्हेंबर पर्यंत
- उन्हाळी -फेब्रुवारी -मार्च
Sr |
जात |
प्रकार / वान |
उत्पन्न |
1 |
राजश्री |
एकेरी संकरीत |
100-110 क्विंटल/हेक्टर |
2 |
मांजरी |
संमिश्र |
40-50 क्विंटल/हेक्टर |
3 |
पंचगंगा |
संमिश्र |
40-50 क्विंटल/हेक्टर |
4 |
करवीर |
संमिश्र |
50-55 क्विंटल/हेक्टर |
5 |
आफ्रिकानटॉल |
संमिश्र |
40-50 क्विंटल/हेक्टर |
बियाणे प्रमाण :-
15 ते 20 किलो प्रति हेक्टर
बीजप्रतिक्रिया :-
पेरणीपुर्वी 2-2.5 ग्राम थायरम प्रति किलो बियान्यास चोळावे.
- पाणी व्यवस्थापन :-
खरीप हंगामात पुरेसा पाऊस असल्यास पाणी देण्याची आवश्यकता नाही.
- पाऊस नसल्यास किंवा रब्बीतील पाणी नियोजन :-
- पेरणी केल्यानंनंतर लगेच पाणी द्यावे
- पेरणी नंतर 20ते 40 दिवसात (पिकाची शकीय अवस्था )
- पेरणीनंतर 40-60 दिवसात (पीक फुलोऱ्यात असताना )
- दाणे भरणीच्या वेळी (पेरणीनंतर 70-80दिवसात )
- आंतरमशागत किंवा तननियंत्रण :-
- पेरणी संपताच चांगल्या वापशावर अट्रॅझीन 2.5 kg प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून सम प्रमाणात जमिनीत फवारावे.
- फवारणी केलेले क्षेत्र तुडवू नये.
- तणनाशक फवारणी नंतर 15-20 दिवस आंतरमशागत करू नये.
- मक्यामध्ये घ्यावायची आंतरपीके :-
- कडधान्ये :- उडीद, मुंग, चवळी.
- तेलबिया :- भुईमूग, सोयाबीन.
- भाजीपाला :- मेथी, कोबी, कोथिंबीर, पालक, इत्यादी.
खत व्यवस्थापन :-
अनु. |
रासायनिक खते द्यावयाची वेळ |
नत्र( युरिया) |
स्फूरद (SSp) |
पालाश (MOP) |
1 |
पेरणीच्या वेळी |
40 kg/hec |
60kg/hec |
40kg/hec |
2 |
पेरणीनंतर 30 दिवसांनी |
40kg/hector |
00 |
00 |
3 |
पेरणीनंतर 40-45 दिवसांनी |
40kg/hector |
00 |
00 |
टोटल |
|
120kg/हेक्टर |
60kg/hec |
40kg/hector |
Published on: 02 July 2021, 10:04 IST