Agripedia

परतीचा पाऊस ओला दुष्काळ पडला आहे.तरी तुला चिंता पक्षाची आहे.आपली नाही.

Updated on 30 October, 2022 9:15 AM IST

परतीचा पाऊस ओला दुष्काळ पडला आहे.तरी तुला चिंता पक्षाची आहे.आपली नाही.आपल्या शेतातील नासाळीची तुला काहीच चिंता भासत नाही.तुला पक्ष पार्टी की परिवार समाज प्यारा आहे.अबे ये शेतकऱ्यांच्या पोरा म्हणूनच मी तुला खरोखरच आत्मविश्वासाने सांगत आहे.तुला ज्या पक्षाचे काम करायचं आहे.ते फक्त चुनावापुरते करत जा.तुला जे पक्षाकरीता श्रम द्यायचं आहे ते चुनावापुरते करत चल. बाकीचे वेळेस तुझ्यावर तुझ्या समाजावर तुझ्या परीवारावर अन्याय होत असेल तर,तु समाजाला

संघटीत कर.अन्याच्या विरोधात संघर्ष कर.आपला महत्त्वपूर्ण लढ्यात सहभागी होऊन मैदानावर लढ तेच तुझे खरं कर्तव्य आहे.Your real duty is to participate in your important battle and fight on the field.अरे शेतकऱ्याच्या पोरा.तुझा बाप शेतावर जाते

मका उत्पादकांसाठी अत्यंत महत्वाची सूचना

 आणि बघते. शेतातील सोन पिवळं उगवलं होते ते आज परतीच्या पावसाने पाण्यात झोपुन गेली आहे.तुझा बाप बघतो आठवण करतो आणि धडाधडा रडतो.घरी येतो परत शेतातून परंतु आपलं डोळ्यातील अश्रू झाकुन देतो.कशाकरीता तर आपलं दुःख आपणच काळजात लपवतो.तुला दुःख होऊ नये म्हणून.म्हणून म्हणतो शेतकऱ्यांच्या पोरा कधी

तरी शेतावर गेलास.आपल्या बापाला विचारलाश बापा सर्व बरोबर आहे की नाही म्हणून.अबे तु विचारु शकतच नाही.तुला हव्या टवाळक्या,कॅरम् ,पत्ते, हाटेल,चाय पाणी व खर्रा.बस झाले.अबे शेतकऱ्यांचा पोरा तुझा बाप रात्री झोपतेना तेव्हा दोन वाजता जाऊन बघ त्याचे खाटेजवळ.फाटली चड्डी व बनियान चार चार थिगरं लागलेले आहेत.पायातील चप्पल छिन्नभीन्न आहे.अबे तुझा बाप एकच चप्पल फाटेल तरी चांभाराच्या दुकानात जाऊन दहावेळा शिवून घालतो.परंतू माझा पोरखा

काॅलेज जातो.माझ्या पोराला कशाचीही कमतरता गेली नाही पाहिजे माझ्या पोराला कुणी काही म्हणले नाही पाहिजे म्हणून तुला किंमती जुते पायात घ्यालायला घेऊन देतो तरी तुला तुझ्या बापाची किंव व दयामाया मुळीच येत नाही.अबे बापाला ओळखलं फक्त दोघांनी एक शिवबाचा शंभुराजे व भीमराव आंबेडकर जी बाबासाहेब यांनी.अबे शेतकऱ्यांचा पोरा आता तरी जागे होशिल का बे की पक्ष च बघशील.अबे पक्षाला मार लात कोणताच पक्ष असो.पहिले उतर मैदानावर परतीचा पाऊस

ओला दुष्काळ घोशीत झालाच पाहिजे म्हणून.आमदार खासदार तुझ्यामुळे झाला.त्याला तुझ्या बापाची म्हणजेच शेतकरी राजाची दयामाया नाही.तुला काहीची दयामाया बे ह्या खरामखोर आमदार खासदार मंत्री यांची.अबे हे मालामाल झाले आहे.आणि तुझा बाप शेतकरी कंगाल झाला आहे.म्हणूनच सांगतो बे शेतकऱ्यांचा पोरा आता तरी पेटून उठ ओला दुष्काळ परतीचा पाऊस शेतकरी कंगाल.चल उठ बे शेतकऱ्यांच्या पोरा कसलाही विचार करु नकोस मैदानावर इतिहास घडव सर्व शेतकरी तुझ्या पाठीशी आहोत.

 

आपला हितचिंतक ओबीसी

देवानंद भाऊ महावाडे

भंडारा जिल्हा

English Summary: Are the farmer's sons going to wake up now?
Published on: 29 October 2022, 07:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)