आपण राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत बियाणे वितरण अनुदान २०२२ योजनेसंबंधित या लेखात माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये बियाणे अनुदानात समाविष्ट जिल्हे कोणते, पिके कोणती, पात्रता काय, आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कुठे व कसा करायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे आज पाहणार आहे. महाडीबीटी वरती सुरू आहेत.
केंद्र शासन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत समाविष्ट जिल्हे आणि पिके
राअसुअ भरडधान्य : (मका) सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व जळगाव (एकूण ७ जिल्हे).
राअसुअ गहू : सोलापूर, बीड, नागपूर (३ जिल्हे)
राअसुअ पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) : ज्वारी, बाजरी, रागी (एकूण २६ जिल्हे)
राअसुअ भात : नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली (८ जिल्हे)
राअसुअ कडधान्य :सर्व जिल्हे
अ) बाजरी :नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद (एकूण ११ जिल्हे)
ब)ज्वारी :नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ (एकूण २३ जिल्हे)
क) ऊस : (औरंगाबाद विभाग) - औरंगाबाद, जालना, बीड.
ड) कापूस : (अमरावती विभाग) - अमरावती, वाशिम, बुलढाणा,अकोला, यवतमाळ.
(नागपूर विभाग) : वर्धा, नागपूर, चंद्रपूर.
इ) रागी :ठाणे (पालघर सह), नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड व रत्नागिरी. (एकूण ७ जिल्हे)
(लातूर विभाग) : उस्मानाबाद,नांदेड, लातूर,परभणी,हिंगोली.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बियाणे वितरण योजनेसाठी आवश्यक पात्रता काय?
जर शेतकरी तांदूळ, गहू, डाळी, कापूस, ऊस या अंतर्गत कोणत्याही घटकासाठी अर्ज करत असेल, तर वर दिलेले जिल्हे त्यासाठी अनिवार्य आहेत.
शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गाचा असणे आवश्यक आहे.
जर लाभार्थ्याला या पीक योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल, तर त्याच्या शेतात गळीत धान्य पीक असणे आवश्यक आहे आणि जर वृक्ष तेलबियापिक या मधून लाभ घ्यायचा असेल, तर त्याच्या शेतात तेलबिया पिके असणे आवश्यक आहे.
अर्जदाराच्या स्वतःच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
Published on: 28 February 2022, 01:59 IST