Agripedia

जर शेतामधे मधमाशिचे प्रमान कमी असेल तर. 500 ग्रँम गुळ घ्या व 100 ते 150 मीली पानी घेऊन त्या गुळाची घट्ट स्ल

Updated on 09 January, 2022 2:08 PM IST

जर शेतामधे मधमाशिचे प्रमान कमी असेल तर.

500 ग्रँम गुळ घ्या व 100 ते 150 मीली पानी घेऊन त्या गुळाची घट्ट स्लरी तयार करुन त्या मधे कापडाच्या पट्ट्या भीजवुन जागोजागी त्या पीकामधे बांधा.त्यामुळे मधमाशि आकर्षीत होईल.ताक किंवा जिवआमृताची फवारणी करावी .व काही दिवसानी या दोन फवारणी घ्या .

टॉनिक

200 लि. पाणी + 2 लि. नारळाचे पाणी 

 सप्तधान्यांकुरअर्क 

ऐका छोटया वाटी मध्ये 100 ग्रॅम तीळ घ्या व ते पाण्यात भिजवून ठेवा.दुसऱ्या दिवशी ऐक मोठे भांडे घ्या त्यामध्ये

100 ग्रॅम मुग + 100 ग्रॅम ऊडीद + 100 ग्रॅम चवळी + 100 ग्रॅम मटकी + 100 ग्रॅम देशी हरबरा + 100 ग्रॅम गहूह्या सगळयांना मिसळा व धान्य भिजतील एवढेच पाणी टाका. घरात ठेवा. तिसरया दिवशी सकाळी पाण्यातून धान्य काढून घ्या व एका ओल्या फडक्यात बांधा व मोड येण्यासाठी लटकवून ठेवा. भिजवलेले पाणी फेकून देऊ नका.

1 सेमी. मोड आल्यावर सगळयांची चटणी वाटा. 

200 लि. पाणी + 10 लि. देशी गार्इचे गोमूत्र + कडधान्य भिजवलेले पाणी व चटणी मिसळा व काडीने चांगले ढवळा व गोणपाट झाका. हे मिश्रन 4 तास ठेवा. 4 तासानंतर पुन्हा ढवळा व गळून घ्या व फवारणी करा. 

टॉनीक फवारणीची वेळ: दाणे दुधावर असताना, फळ किंवा शेंगा लहान असताना, पालेभाज्या काढण्याच्या 5 दिवस आधी,फुलं कळी अवस्थेत असताना फवारणी करणे.कोनतेही पीक फुलोरावर असतांनी जीवामृतामधे गोमीत्राचे प्रमान कमी घ्यावे.व फवारनीचे वेळी जीवामृतामधे सोबत 200 ली पान्यात 1 ते 2कीलोग्रँम गुळ जास्त घ्यावा.

हे करुन पाहा व अनुभव घेउन ईतरांना पन सांगा.

नैसर्गीक शेती करतांनी जे अनुभव आपल्याला येतात ते स्वताहाचे अनुभव असल्यामुळे आपला आत्मविश्वास त्याने वाढतो.

 

गजानन ना.खडके-9422657574

 नैसर्गिक विषमुक्त कृषी तंत्र महाराष्ट्र.

English Summary: Any flower fall, fruits fall Stop by this procedure
Published on: 09 January 2022, 02:08 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)