दोडक्याचे पिक हे एक प्रमुख भाजीपाला पिकापैकी एक आहे. हे एक वेलीवर्गीय वनस्पती आहे, ह्याची लागवड हि संपूर्ण भारतात थोड्या-मोठ्या प्रमाणात केली जाते. दोडक्याचे पिक हे व्यापारी पिक आहे म्हणजेच याच्या लागवडीतून शेतकरी बांधव चांगली तगडी कमाई करू शकतात. ह्याची शास्त्रीय पद्धतीने केलेली लागवड खात्रीशीर दर्जेदार उत्पादन मिळवून देऊ शकते. दोडक्याची लागवड हि महाराष्ट्रात विशेष उल्लेखनीय आहे, महाराष्ट्रात दोडके पिकाखाली जवळपास 1200 हेक्टर क्षेत्र आहे,
ह्यावरून आपल्याला समजते की, दोडके पिकाची महाराष्ट्रात खुप मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. दोडक्याची मागणी हि भारतात सर्वत्र आहे. हि एक प्रमुख भाजी आहे हिची मागणी खेड्यापासून तर शहरापर्यंत खुप मोठ्या प्रमाणात आहे. दोडक्यामध्ये प्रोटीन ची मात्रा भरपुर असते त्यामुळे मानवी आरोग्यास ह्याचे सेवन फायदेशीर असल्याचे सांगितलं जाते शिवाय हि भाजी खाण्यासाठी खुप चविष्ट असते यामुळे याची मागणी हि वर्षभर बनलेली असते.
दोडके लागवडीसाठी आवश्यक हवामान आणि जमीन
कोणत्याही पिकाची लागवड यशस्वी करायची असेल व त्यापासून दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर त्या पिकासाठी अनुकूल हवामान आणि जमिनीची निवड करणे महत्वाचे ठरते. दोडके पिकासाठी देखील हे आवश्यक आहे. दोडके हे थंड हवामाणात चांगले वाढते असे सांगितलं जाते. दोडके हे पावसाळ्यात व उन्हाळी हंगामात लावता येते व त्यापासून चांगले उत्पादन देखील मिळवता येते.
दोडक्याची लागवड हि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. जमीन हि मध्यम ते भारी असावी पण पाण्याचा निचरा उत्तम होणारी असावी असा सल्ला दिला जातो. दोडक्याचे पीक हे चिकणमाती असलेल्या जमिनीत घेऊ नये असा सल्ला दिला जातो कारण ह्या मातीत दोडक्याचे पिक वाढत नाही.
दोडक्याची काही सुधारित जाती :-
»पूसा नस्दार : हि एक दोडक्याची सुधारित वाण आहे. ह्या जातींचे दोडके एकसमान लांब आणि हिरव्या रंगाचे असतात. हे वाण 60 दिवसानंतर फुलायला सुरवात होते. दोडके हे वेळीवर्गीय पिक आहे,प्रत्येक वेलीला 15 ते 20 दोडके लागतात.
»Co-1: हि एक हलकी वाण असल्याचे सांगितलं जाते. ह्या जातींचे दोडके 60 ते 75 सेमीपर्यंत लांब वाढतात. प्रत्येक वेलीला जवळपास 4 ते 5 किलोपर्यंत दोडके लागू शकतात.
दोडक्यासाठी खत व्यवस्थापन
दोडके लागवडीच्या वेळी 8 किलो नत्र/एकरी, 12 किलो स्फुरद आणि 12 किलो पोटॅश लावावे ह्यासाठी आपण कृषी विशेषज्ञाचा सल्ला घ्यावा. नत्राची दुसरी मात्रा म्हणजे 8 किलो/एकर दोडक्याच्या फुलोऱ्याच्या वेळी द्यावी. 8 ते 12 किलो नत्राचा दुसरा हप्ता एक महिन्याने द्यावा असे शेतकरी बांधव सांगतात.
Published on: 02 November 2021, 07:01 IST