Agripedia

दोडका आहे वेलवर्गीय फळभाजी असून बऱ्याच ठिकाणी दोडक्याच्या लागवड केली जाते. तसे पाहायला गेले तर आरोग्याच्या दृष्टीने दोडके खूप फायदेशीर आहे. हे प्रकृतीने थंड असून क जीवनसत्वाचा तसेच कर्बोदके, प्रथिने आणि फायबरचा उत्तम स्त्रोत आहे.

Updated on 15 May, 2022 9:18 PM IST

दोडका आहे वेलवर्गीय फळभाजी असून बऱ्याच ठिकाणी दोडक्याच्या लागवड केली जाते. तसे पाहायला गेले तर आरोग्याच्या दृष्टीने दोडके खूप फायदेशीर आहे. हे प्रकृतीने थंड असून क जीवनसत्वाचा  तसेच कर्बोदके, प्रथिने आणि फायबरचा उत्तम स्त्रोत आहे.

तसेच दोडक्यामध्ये पोटॅशियम, फास्फोरस आणि अ जीवनसत्व देखील मोठ्या प्रमाणावर असते. एवढेच नाही तर दोडका आणि त्याच्या वेलीचा व बियांचा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमध्ये उपचार म्हणून वापर केला जातो. दोडक्याचा वेल गाईच्या दुधामध्ये किंवा थंड पाण्यामध्ये उकळून तीन दिवस घेतल्याने किडनी स्टोन विरघडू शकतो. अनेक औषधी गुणधर्म असलेल्या या भाजीपाला पिकाला खूप मागणी असते. परंतु त्या प्रमाणात त्याचा पुरवठा होताना दिसत नाही. या लेखामध्ये आपण दोडका लागवडीविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

 दोडका लागवड विषयी सविस्तर माहिती

1- हवामान-(Tempreture)या पिकाच्या उत्तम वाढीसाठी कोरडे आणि समशीतोष्ण हवामान चांगले असते. जर तापमान कमी असेल आणि हवेत आर्द्रता जास्त असेल तर  पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही व रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. 25 ते 35 अंश डिग्री सेल्सिअस तापमान दोडक्यासाठी मानवते. तसेच सूर्यप्रकाशाची मुबलक आवश्यकता या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे.

2- लागणारी जमीन- अर्धा ते एक मीटर खोल व पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम, काळी व कसदार जमीन त्यासाठी उत्तम असते. जर जमीन क्षार

युक्त असेल तर अशा जमिनीत दोडका लागवड टाळावी. हलकी ते मध्यम आणि उत्तम निचरा होणारी जमीन दोडक्याला मानवते. काळी जमीन या पिकाला चांगली असते परंतु पाणी धारण क्षमता जर 50 टक्क्यांच्या वर असेल तर अशा जमिनीत दोडके लावू नये.

3- दोडक्याच्या लागवड कालावधी -Duration Of Cultivation)या पिकाची लागवड खरीप हंगाम मध्ये करायचे असेल तर जून आणि जुलै महिन्यामध्ये करणे उत्तम असते. उन्हाळी हंगामात लागवड करायची तर जानेवारी आणि मार्चमध्ये करावी. जर तुमचा  भाग जास्त पावसाचा असेल तर उन्हाळ्याच्या सुरुवातीला सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात लागवड करावी.

4- या दोडक्याच्या दोन जाती आहेत फायदेशीर -

       पुसा नसदार

 पुसा नसदार जातीची लागवड केली तर 60 दिवसानंतर वेलीला फुले येतात व या जातीची फळे 30 ते 40 सेंटिमीटर लांब, फिक्कट हिरव्या रंगाची, कोवळी आणि शिरा असलेले असतात. या जातीच्या एका वेलीवर 15 ते 20 फळे लागतात.  ही जात खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामासाठी उत्तम आहे.

       को.1

 दोडक्याच्या या जातीची फळे 60 ते 75 सेंटिमीटर लांबीचा असून या जातीच्या एका वेलास दहा ते पंधरा दोडके लागतात.

5- पूर्वमशागत - ज्या जमिनीत दोडके लावायचे आहे अशा जमिनीची उभी-आडवी नांगरणी करून तणांचे अवशेष वेचूनशेतामध्ये कंपोस्ट खत टाकून घ्यावे.त्या नंतर वखरणी करून ते खत जमिनीत चांगल्याप्रकारे मिसळून घ्यावे. दोडका लागवड करताना दोन ओळीमध्ये अडीच ते साडेतीन मीटर अंतर व दोन वेली ऐंशी ते शंभर सेंटिमीटर अंतर ठेवावे. प्रत्येक ठिकाणी दोन, तीन बिया  लावाव्यात. वरंब्याच्या बगले मध्ये बिया टोपाव्यात.उगवण होईपर्यंत पाणी देताना विशेष काळजी घ्यावी.

6- लागवड पद्धत- जमिनीची चांगली मशागत केल्यानंतर 120 ते 150 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात. लागवड करण्याअगोदर दोडक्याची बी पाण्यात सहा तास भिजत ठेवावे. लागवड करताना वरंब्याच्या एका बाजूवर 90 सेंटिमीटर अंतरावर तीन-चार बिया टाकून पेरावे. खरीप हंगामात दोडक्याची बी गादी वाफ्यावर पेरावे. पेरणीनंतर तीन आठवड्यांनी रोपांची विरळणी करून एका जागेवर फक्त दोन निरोगी आणि निकोप रोपे ठेवावीत.

7- दोडक्याचे खत व्यवस्थापन -(Fertilizer Management)लागवडीपूर्वी शेताची चांगली मशागत करून एकरी पाच ते सात टन चांगले शेणखत मिसळावे. माती परीक्षण केले असेल तर या अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा ठरवावी. ढोबळ मानाने विचार केला तर एका एकर मधील दोडक्याला 30 किलो नत्र, 20 किलो स्फुरद  आणि 20 किलो पालाश देणे उत्तम असते.

8- आंतरमशागत- वेलाच्या सभोवती तण असेल तर ते नींदुन काढून स्वच्छ करावे. हे पीक वेलवर्गीय असल्यामुळे त्याला आधाराची गरज असते त्यामुळे बांबू किंवा झाडाच्या वाळलेल्या फांद्यांचा आधारासाठी वापर करावा. तसेच तारा वर देखील वेली पसरवल्या तर त्यापासून अधिक उत्पन्न मिळते.

9- दोडक्यास पाण्याचे व्यवस्थापन-(Water Management)ठिबक सिंचनाचा वापर करावा. ठिबक च्या वापराने दोडके चांगले पोसले जाते व चविष्ट होते. दोडक्याला पाणी देताना त्याचेखोडाचे देठ भिजणार नाही याची काळजी घ्यावी. नियमित भिज पाणी न देता नेहमी पोच पाणी द्यावे. हिवाळ्यामध्ये सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत पाणी द्यावे. परंतु उन्हाळ्यामध्ये पाणी देताना ते सकाळी नऊच्या आतच द्यावे.फुलं लागल्यानंतर चौथ्या दिवशी पाणी द्यावे. थोडा पाण्याचा ताण बसला तर दोडके वाढते परंतु आतून पोकळ राहिल्याने बाजारपेठेत चांगला दर मिळत नाही.

10- दोडक्याची काढणी- लागवडीपासून 60 दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते व फुले आल्यानंतर 12 ते 15 दिवसांत फळे तयार होतात.  काढणी करताना कोवळ्या फळांची दोन ते तीन दिवसांच्या अंतराने तोडणी करावी. नखांनी फळांवर हळूच दाबल्यावर व त्याचे व्रण पडल्यावर फळे कोवळी  आहेत असे समजावे. दोडका या पिकाचे प्रति हेक्‍टरी सात ते दहा टन उत्पादन सहज मिळते.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:एकदा लागवड करा 25 वर्षांपर्यंत उत्पन्न मिळवा! मे- जून महिन्यात करा लागवड, एका एकरात वर्षात कमवा 10 लाख उत्पन्न

नक्की वाचा:High Tempreture:ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडत 2022 सालातील जगात सर्वाच्च तापमानाची नोंद पाकिस्तानात

नक्की वाचा:माहिती गरजेची! गावठाण विस्तार म्हणजे नेमके काय? वाचा आणि जाणून घ्या

English Summary: angled loofa(dodka) cultivation is give more profit to farmer and more production
Published on: 15 May 2022, 09:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)