शेतजमिनीचा सुपीकपणा प्रदूषण, रासायनिक खते व कीटकनाशक औषधांच्या वापरामुळे नष्ट झाला आहे. उत्कृष्ट प्रतींच्या पिकाचे रहस्य उत्तम वातावरणांत दडले आहे. अग्निहोत्रामुळे उत्पन्न होणारी पोषक द्रव्ये वायु, जल, भूमि व सूर्यप्रकाश सर्वात प्रवेश करून प्रदूषणाने उत्पन्न होणारे विषारी प्रभावांना निष्प्रभ करतात. जमिनीची सुपीकता वाढते. जमीनीची पाणी शोषून घेण्याची शक्ती वाढते. वातावरण पोषक द्रव्यांनी परिपूर्ण रहाते. झाडांच्या चयापचयक्रीयेमध्ये (Metabolism) अग्निहोत्राचे वातावरण मध्यस्थाचे (Catalyst) काम करते. ज्यामुळे झाडे निरोगी व रोगप्रतिकारक्षम बनतात. या सर्वांचा परिणाम प्रत्यक्ष पहावयासाठी शेताच्या मध्यभागी अग्निहोत्र करून पहावे. सामान्यत: पाच एकर क्षेत्रांत एक अग्निहोत्र करणे उचित ठरते.
10 पेक्षा जास्त एकर क्षेत्रांत चारी कोपऱ्यात चार व मध्यभागी एक अशा प्रकारे अग्निहोत्र करावे. हा प्रयोग चालू असताना रासायनिक खते कीटनाशक द्रव्यांचा वापर संपूर्णतया टाळावा. वाचताना हे विचित्र वाटेल पण अनुभवाने हे सिद्ध झाले आहे की अग्निहोत्र पद्धतीने शेती केल्याने किती तरी पट अधिक उत्पादन शक्य आहे. धान्याचे स्वरूप व चव ही कृत्रीम खतांच्या वापराने उत्पादित केलेल्या धान्याच्या चवीपेक्षा लाखपटीने चांगले असते. जमीनीची सुपीकता वाढते. तसेच महागड्या खतांपासून व कीटकनाशकांपासून गरीब शेतकऱ्यांची कायमची सुटका होते.
हा प्रयोग छोट्या प्रमाणावर तुम्हीही करू शकता. आपल्या परसबागेत अग्निहोत्राची थंड राख निंदणी खुरपणी, लागवड करताना व पाणी देताना, अग्निहोत्राचे मंत्र म्हणत वापरावी. हा प्रयोग करत असताना रासायनिक खते व कीटकनाशक औषधांचा वापर करू नये. काही दिवसांतच आश्चर्यकारक परिणाम आपल्या निदर्शनास येतील. फळे व भाज्या आपणास अधिक पोसलेल्या व निरोगी व चविष्ट असलेल्या आढळतील. झाडेही निरोगी व पुष्ट दिसतील.
हरित क्रांतीचे स्वप्न साकार करण्यासाठी झटणाऱ्या वैज्ञानिकांना अग्निहोत्र पद्धतीच्या शेतीमुळे त्यांना येणाऱ्या समस्यांचे उत्तर मिळते. आर्थिक दृष्टया दुर्बल शेतकऱ्यांना महागड्या खतांपासून व औषधांपासून मुक्ती देणारी अग्निहोत्र कृषि पद्धत हे एक वरदानच ठरते. हे आजपर्यंतच्या अनुभवाच्या आधारावर ठामपणे सांगता येते.परिणाम प्रत्यक्ष पहावयासाठी शेताच्या मध्यभागी अग्निहोत्र करून पहावे. सामान्यत: पाच एकर क्षेत्रांत एक अग्निहोत्र करणे उचित ठरते.
पुष्प आधार - अग्निहोत्र चिकित्सा
शरद केशवराव बोंडे.
९४०४०७५६२८
ध्येय मातीला वाचवणं
Save the soil all together
Published on: 22 April 2022, 11:48 IST