नाशिक: इनसेक्टीसाइडस् (इंडिया) लिमिटेड (आयआयएल- IIL), या देशातील पीक संरक्षण आणि पोषण क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने, द्राक्ष पिकातील डाउनी मिल्ड्यू रोगाचा सामना करण्यासाठी 'स्टनर' हे नवे बुरशीनाशक औषध दाखल केले आहे.
डाउनी मिल्ड्यू या बुरशीजन्य रोगामुळे द्राक्षांच्या गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम होतो. त्यामुळे शेतकर्यांचे २० ते ८० टक्के नुकसान होते. अशा या घातक रोगावर स्टनर हे अत्यंत प्रभावी उपाय ठरत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
“भारतात पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे फॉर्म्युलेशन तयार केले जात आहे. आतापर्यंत शेतकरी परदेशातून आयात केलेल्या बुरशीनाशक फॉर्म्युलेशनवर अवलंबून होते.
मात्र ‘मेक इन इंडिया’उपक्रमावर ठाम विश्वास असल्याने, देशातच अशा औषधाची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला आणि आता आपल्याकडे देशातच निर्माण करण्यात आलेले स्टनर हे प्रभावी बुरशीनाशक उपलब्ध आहे. ” असे आयआयएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, राजेश अग्रवाल म्हणाले.
“या औषधाची संभाव्य बाजारपेठ प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र असून त्यातही सिंहाचा वाटा प्रामुख्याने नाशिक, बारामती, सांगली, नारायणगाव, सोलापूर आणि सातारा या भागाचा आहे.
या अनोख्या फॉर्म्युलेशनमुळे द्राक्षावरील डाउनी मिल्ड्यू रोगाच्या संकटाशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्टनर हे औषध बुरशीविरूद्ध वनस्पतीची संरक्षण यंत्रणा सक्रिय करते आणि या रोगाचा नायनाट करण्यास मदत करते.”असे आयआयएल कंपनीचे उपाध्यक्ष संजय वत्स यांनी सांगितले.
“आयआयएलचा महाराष्ट्राच्या बाजारपेठेत मजबूत ठसा असून, आमची सोफिया, मोनोसिल, हर्क्युलस, लेथल गोल्डसारखी उत्पादने शेतकरी समुदायामध्ये लोकप्रिय आहेत.
आता स्टनर, शिनवा आणि इझुकीसारखी नवीन उत्पादने दाखल केल्यामुळे, आम्ही शेतकर्यांना या संकटातून मुक्त करू शकू, असा आम्हाला विश्वास आहे. ” असे कंपनीच्या विपणन (मार्केटिंग) विभागाचे उपव्यवस्थापकिय संचालक एन.बी. देशमुख म्हणाले.
Published on: 14 October 2022, 03:29 IST