Agripedia

कीटकनाशकांचे पाण्यामध्ये द्रावण करताना प्रामुख्याने दोन प्रकारची कीटकनाशके बाजारात असतात.

Updated on 16 April, 2022 8:53 PM IST

कीटकनाशकांचे पाण्यामध्ये द्रावण करताना प्रामुख्याने दोन प्रकारची कीटकनाशके बाजारात असतात. एक म्हणजे पाण्यामध्ये मिसळणारी (ईसी, एससी, डब्ल्यूपी, डब्ल्यूएससी इत्यादी), तर दुसरी म्हणजे पाण्यात विरघळणारी (एसपी, डब्ल्यूएसएल, एसएल, एसजी इ.). पहिल्या प्रकारच्या कीटकनाशकाचे क्रियाशील घटक विद्रावकामध्ये मिसळतात. हे विद्रावक ब-याच अंशी पाण्यामध्ये मिसळणारे असल्यामुळे ते कीटकनाशक (क्रियाशील घटक) व पाणी यांमधील दुव्याचे काम करते. अशी फॉर्म्युलेशन असलेली कीटकनाशके पाण्यामध्ये मिसळतात; परंतु विरघळत नाही. गव्हाचे पीठ जसे पाण्यात मिसळते, त्याप्रमाणे चांगले ढवळल्यानंतर ते पाण्यात एकसारखे पसरते; परंतु काही वेळाने ते तळाशी बसते. म्हणून पाण्यात मिसळणा-या कीटकनाशकांचे द्रावण तयार करताना विशेष काळजी घ्यावी लागते.

व फवारणी करताना असे द्रावण परत-परत ढवळावे लागते. दुस-या प्रकारची कीटकनाशके पाण्यामध्ये विरघळतात, म्हणून ती किडीसाठी प्रभावी ठरतात. तसेच, झाडांमध्ये त्वरित शोषली जातात. कीटकनाशकांचे द्रावण तयार करताना पहिले प्लॅस्टिक बकेटमध्ये पाणी घेऊन त्यात कीटकनाशक मोजून टाकावे व काठीने ढवळून एकजीव द्रावण तयार करावे. उदा. हे द्रावण १oo लिटर पाण्यासाठी तयार केलेले असल्यास ड्रममध्ये बकेटमधील द्रावण टाकून पाण्याची पातळी १oo लिटरची करावी व परत काठीने एकजीव द्रावण होईपर्यंत ढवळावे. प्रत्येक वेळी पंपामध्ये द्रावण भरताना ड्रममधील द्रावण काठीने ढवळत जावे.

कीटकनाशकांचे पाण्यामध्ये द्रावण करताना प्रामुख्याने दोन प्रकारची कीटकनाशके बाजारात असतात. एक म्हणजे पाण्यामध्ये मिसळणारी (ईसी, एससी, डब्ल्यूपी, डब्ल्यूएससी इत्यादी), तर दुसरी म्हणजे पाण्यात विरघळणारी (एसपी, डब्ल्यूएसएल, एसएल, एसजी इ.). पहिल्या प्रकारच्या कीटकनाशकाचे क्रियाशील घटक विद्रावकामध्ये मिसळतात. हे विद्रावक ब-याच अंशी पाण्यामध्ये मिसळणारे असल्यामुळे ते कीटकनाशक (क्रियाशील घटक) व पाणी यांमधील दुव्याचे काम करते. अशी फॉर्म्युलेशन असलेली कीटकनाशके पाण्यामध्ये मिसळतात; परंतु विरघळत नाही. गव्हाचे पीठ जसे पाण्यात मिसळते, त्याप्रमाणे चांगले ढवळल्यानंतर ते पाण्यात एकसारखे पसरते; परंतु काही वेळाने ते तळाशी बसते. 

 म्हणून पाण्यात मिसळणा-या कीटकनाशकांचे द्रावण तयार करताना विशेष काळजी घ्यावी लागते व फवारणी करताना असे द्रावण परत-परत ढवळावे लागते. दुस-या प्रकारची कीटकनाशके पाण्यामध्ये विरघळतात, म्हणून ती किडीसाठी प्रभावी ठरतात. तसेच, झाडांमध्ये त्वरित शोषली जातात. कीटकनाशकांचे द्रावण तयार करताना पहिले प्लॅस्टिक बकेटमध्ये पाणी घेऊन त्यात कीटकनाशक मोजून टाकावे व काठीने ढवळून एकजीव द्रावण तयार करावे. उदा. हे द्रावण १oo लिटर पाण्यासाठी तयार केलेले असल्यास ड्रममध्ये बकेटमधील द्रावण टाकून पाण्याची पातळी १oo लिटरची करावी व परत काठीने एकजीव द्रावण होईपर्यंत ढवळावे. प्रत्येक वेळी पंपामध्ये द्रावण भरताना ड्रममधील द्रावण काठीने ढवळत जावे.

लेख संकलित आहे.

English Summary: An important method of preparing pesticide solutions
Published on: 16 April 2022, 08:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)