स्पर्श बायोटेक कंपनी - पाचवड, सातारा, या कंपनीमार्फत संपूर्ण भारतामधील शेतकऱ्यांना जिरेनियम लागवडीसाठी विनामूल्यमार्गदर्शन केले जाते .जिरेनियम लागवडीसाठी एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च येतो. या पिकासाठी लागवड खर्च जास्त येत असला तरी जिरेनियम पिकाची काढणी चौथ्या महिन्यात होत असते. त्यावेळी लागवडीचा झालेला संपूर्ण खर्च मिळणारे उत्पादन येते. त्यानंतर प्रत्येक तीन महिन्यांनी या पिकाची कटिंग होत असते. प्रत्येक कटिंगच्या वेळी सरासरी 15 टन प्रति एकरी उत्पादन मिळते. या कटिंगची विक्री केली असता 6000/- रुपये प्रतिटन प्रमाणे बाजार भाव मिळतो. जर आपण डिस्टिलेशन युनिट बसवलेले असेल तर आपल्याला प्रतिटन एक लिटर ओईल मिळत असते. म्हणजेच एका कटिंग मधून 15 लिटर ओईल मिळते.
जिरेनियम ओईल ची विक्री प्रति किलो प्रमाणे होत असते. एका किलो मध्ये सरासरी 1100 मिली ऑइल बसते. म्हणजेच एका कटिंग मध्ये सरासरी 12 किलो ऑइल मिळते. याचा अर्थ वर्षाला 4 कटिंग मधून 48 ते 50 किलो ऑइल मिळेल.जिरेनियम या पिकाची लागवड केल्यापासून 3 वर्षापर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो. प्रत्येक 3 महिन्याला कटिंग करून 3 वर्षांमध्ये या पिकाच्या 12 वेळा कटिंग होतात. 12 कटिंग मधून आपल्याला 3 वर्षांमध्ये सरासरी 150 किलो ओईल मिळू शकते. भारतामधील जिरेनियम ऑइल चा प्रति किलो सध्याचा बाजार भाव 11500/- रुपये.सध्याच्या बाजारभावाप्रमाणे 3 वर्षांमध्ये आपण जिरेनियम पिकामधून 17,25,000/- एवढ्या रुपयांचे उत्पादन घेऊ शकतो.एक किलो ऑइल निर्मितीसाठी सरासरी 1500 रुपये खर्च येतो. 3 वर्षामध्ये 150 किलो ओईल मिळत असेल तर आपल्याला वार्षिक एकरी 2,25,000/- खर्च होतात. पूर्ण एका एकर चा लागवड व मशागत
खर्च 1,00,000/- व प्रतिमहिना औषधे व मशागत खर्च 5000/- प्रमाणे 1,80,000/- 3 वर्षासाठी होऊ शकतो. 3 वर्षांमध्ये पुढील प्रमाणे आपल्याला नफा मिळेल.17,25,000/- तीन वर्षातील उत्पादन.-2,25,000/- ओईल निर्मिती खर्च.-1,80,000/- औषधे व मशागत खर्च.-1,00,000/- लागवड खर्च.13,20,000/- तीन वर्षाचे उत्पादन÷3440,000/- प्रति वर्ष उत्पादन.वरील ताळेबंद पाहता इतर कोणत्याही पिकांमध्ये एवढे हमखास उत्पादन मिळत नाही.या शाश्वत उत्पादनासाठी आवश्यक आहे ते जिरेनियम लागवडीबद्दलचे संपूर्ण ज्ञान व आवश्यक असणारी साधन सामग्री. स्पर्श बायोटेक मार्फत उत्तम प्रतीची जास्तीत जास्त उत्पादन देणारी व पूर्ण तीन वर्ष उत्पादनक्षम रोपे दिली जातात. यासाठी आवश्यक असणारी खत आणि औषधांची पूर्तता सुद्धा केली जाते.
ज्या शेतकरी मित्रांना डिस्टिलेशन युनिट बसवायचे आहे त्यांच्यासाठी अद्ययावत पद्धतीने तयार केलेले डिस्टिलेशन युनिट सुद्धा बसवून दिले जाते. त्यानंतर त्यामधून तयार होणारे ऑइल खरेदी केले जाते.मागील काही वर्षाचा अनुभव पाहता अनेक शेतकरी मित्रांनी अर्धवट माहिती मधून जिरेनियम लागवड केली व त्यातून निघणारे वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल मार्केटमध्ये विक्री केल्यामुळे बाजार भाव 12500/- वरून 1000 रुपयांनी कमी झाले.जर आपल्याला जास्त बाजार भाव मिळवायचा असेल तर आपल्याला स्पर्श बायोटेक मार्फत लागवड करणे फायदेशीर आहे. स्पर्श बायोटेक मार्फत शास्त्रोक्त पद्धतीने लागवड ते ऑइल निर्मिती पर्यंत मार्गदर्शन घेऊनऑइल निर्मिती केल्यास नक्कीच बाजार भाव जास्त मिळू शकतो.आज महाराष्ट्र मधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिरेनियम लागवड होत आहे. अनेकांनी जिरेनियम शेती मधून वर्षाला 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत कमाई केली आहे.Many have earned up to Rs 4 to 5 lakhs a year from geranium farming.
पारंपारिक पिकांपेक्षा या शेतीमध्ये हमखास उत्पन्न मिळत आहे. जिरेनियम शेती करत असताना या पिकाबद्दलची शास्त्रोक्त माहिती घेऊन ज्यांनी लागवड केली आहे त्यांना त्यामध्ये उत्पन्न मिळत आहे. पण अलीकडील काळात जे शेतकरी अर्धवट माहिती घेऊन लागवड करत आहेत त्यांना अनेक अडचणी येत आहेत.यासाठी शेतकऱ्यां प्रति कर्तव्य समजून स्पर्श बायोटेक कंपनी लागवडीसाठी सर्वप्रकारे विनामूल्य मार्गदर्शन करत असते.यामध्ये उत्कृष्ट प्रतीची जिरेनियम रोपे, आवश्यक असणारी खते आणि औषधे, ऑइल तयार करण्यासाठी आवश्यक असणारे डिस्टिलेशन युनिट व विक्री व्यवस्था या सर्व स्तरावर कंपनी काम करते. त्यामुळे शेतकऱ्यांना जिरेनियम शेती मधून हमखास उत्पादन मिळण्याची शाश्वती आहे.जिरेनियम ऑइलची संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कारण हे ऑइल सर्व प्रकारच्या सौंदर्यप्रसाधने व ज्या उत्पादनांमध्ये सेंट चा
वापर केला जातो त्या प्रत्येक उत्पादनासाठी बेस प्रोडक्ट म्हणून वापरले जाते. उदा. टूथपेस्ट, साबण, अगरबत्ती, परफ्युम, सर्व प्रकारचे क्लिनर (फिनोईल) फेस वॉश इत्यादी.भारतासाठी जिरेनियम ऑइलची वार्षिक 120 ते 130 टन इतकी आवश्यकता आहे. पण सध्या भारतामधून फक्त 25 ते 30 टन ऑइल तयार होत आहे. पुढील काळात ऑइलची मागणी ही सतत वाढत राहणार आहे.आज भारतात खूप मोठ्या प्रमाणात जिरेनियम लागवड होत आहे.आज पर्यंत शतावरी, कोरफड इत्यादी लागवडी झाल्या. पण या पिकांवर प्रोसेस करण्याची सुविधा नसल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले.जिरेनियम मध्ये असा प्रॉब्लेम येणार नाही. कारण जिरेनियम पासून ऑइल तयार करण्यासाठी लागणारे डिस्टिलेशन युनिट हे शेतकरी आपल्या शेतामध्येच बसवू शकतात व त्यापासून तयार होणारे ऑईल भारतभर अनेक कंपन्यांना देऊ शकतात.
Contact:- 9172384748/7719917662
Published on: 19 July 2022, 05:38 IST