आज जगावर युद्धाची छाया आहे.रशिया आणि अमेरिका एकमेकांच्या जीवावर उठले आहेत याचे साधे कारण त्यांचे अर्थकारण आणि खनिज तेलावर हुकमत मिळवणे हे आहे.आखाती देशात अमेरीकेने जे जे काही केलं याच्या मुळाशी पेट्रोल हेच होते.हे दोन्ही ही देश तेल साठ्यां साठी काही ही करायला तयार आहेत.आता प्रश्न आमचा आपल्या कडे तेलाचे साठे नाहीत.त्या मुळे आम्हीं केवळ जागतिक भिकारी झालो आहोत दुसरे काही नाही.
१३० कोटी लोकांची हक्काची बाजार पेठ असताना आम्हीं नुसत्या आयातीचा धडाका लावलेला आहे.When there is a market for the rights of 130 crore people, we have just started a blast of imports..जो थोडाफार जी.डी.पी दर टिकून आहे तो केवळ कृषी क्षेत्रा मुळे आहे.
हे ही वाचा - दुसऱ्याच्या शेड्युलच्या नादात शेतकरी होतात बरबाद, राहत नाही कोणतेही पिकांसाठी नियोजन
अर्थातच यात शेतकरी बांधवांचे योगदान मोठे आहे..असे असताना दरवर्षी अत्यंत विषारी असणारे पाम तेल आयात करून येथील कृषी पूरक तेल व्यवसाय आणि त्यावरती अवलंबून पडणारे लघुउद्योग आम्हीं रसातळाला घातले आहेत...दरवर्षी 95 हजार कोटीच्या आसपास आम्हीं हे अत्यंत विषारी पाम तेल आयात करत आहोत.
दरवर्षी फक्त तेलाचा विचार करू या!एव्हडा पैसा जरी आपल्या शेतकरी बांधवांच्या अर्थव्यस्थेत मुरला तरी त्यात केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे तर देशाच्या समृद्धीचे गणित सामावलेले आहे.केवळ स्वस्त मिळते म्हणून आम्हीं हे विष आयात करण्याचा मूर्ख पणा का करतो आहोत याचा ही विचार केला पाहिजे.सर्वात महत्वाचे म्हणजे तेल निर्मिती साठी आपणांस कोरडवाहू क्षेत्र लागते आजही आपल्या महाराष्ट्रात 83% जमीन कोरडवाहू आहे...बागायती जमीन धारक साखर कारखाने चालवतील ते त्यांचे पाहून घेतील.साखर कारखानदारी तरी काय
साखर नावाचे पांढरे जहरच निर्माण करीत आहे.साखरेचा तुटवडा निर्माण झाला तर लोकं काही तडफडून मारणार नाहीत.तरीही कोट्यावधी रुपयांचा चुराडा साखर कारखान्यांवर केला जात आहे..इथे ही कोरडवाहू क्षेत्रावर अन्यायच होत आहे.कोरड वाहू क्षेत्राला तेल उद्योग हे वरदान ठरू शकतो नव्हे तर ती आपल्या देशाची मोठी ताकत होती.पण आम्हीं त्याचा कधीच विचार केला नाही आणि आज ही करत नाही.नुसती करडईच नव्हे तर,तीळ,मोहरी,भुईमूग, या आरोग्यवर्धक तेलाचे उत्पादन जरी आम्हीं देशात
वाढवले या पाम तेलाची आयात बंद केली तर एक जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने भारताची किमान वाटचाल तरी सुरू होऊ शकते.GREEN OIL POWER म्हणून भारत जगाच्या क्षितिजावर येऊ शकतो. यात महत्वाचे म्हणजे याला आपल्याच देशाची बाजारपेठ उपलब्ध आहे.कुणाच्या दारात जाऊन विक्रीसाठी हात पसरण्याची गरज नाही.आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही आपला पारंपरिक तेल उद्योग परत उभा राहिला पाहिजे.करडवाहू शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीचा आधार घेत हजारो एकर वर करडई चे उत्पादन घेऊन आपल्याच
मालावर प्रक्रिया करणारे तेल कारखाने उभारण्याची खूप गरज आहे.गावो गावी परत तेल घाणे जिवंत झाले पाहिजेत.तेल ही आज ही आपली फार मोठी ताकत आहे.सरकारने या पाम तेलाच्या माध्यमातून भेसळीला सरळ सरळ परवानगी दिली आहे..तम्हीं चार पैसे जास्त देऊन जरी करडई,अथवा,शेंगदाना तेल विकत घेतले तरी त्यात पामतेल मिक्स केले जात आहे.हा सरकारने लोकांच्या आरोग्याशी खेळणारा किळसवाणा प्रकार ही ताबडतोप बंद केला पाहिजे...आपला भारत देखील GREEN OIL POWAR बनू शकतो.फक्त येणाऱ्या तरुण पिढीने आपल्या डोळ्यावरची झापडं उघडली पाहिजेत..
Published on: 24 September 2022, 07:01 IST