Agripedia

शेतीत श्रम करने लज्जास्पद वाटु लागले.यातुन बेकाराच्या फौजा गावात आहेत.

Updated on 25 April, 2022 1:36 PM IST

  ''शेतीत श्रम करने लज्जास्पद वाटु लागले.यातुन बेकाराच्या फौजा गावात आहेत.पण शेतात कामाला मानुस नाही. अशी स्थीती निर्मान झाली.शेती मजूरांच्या मदतिने करन्याचे दिवस संपले शेतिला मनुष्यबळ उरलेच नाही.अश्यातच नव्या-नव्या रासायनिक खतानी जमिनच नापिक बनवायला सुरवात केली.जमिनीचा कस घसरत चालला.रासायनिक खतांच्या प्रचंड मार्‍याने दुसरे काय होणार?त्यात वारेमाफ कीटक-नाशकाच्या वापर ,सृष्टिचे चक्रच धोक्यात आनणारे फवारे,शेतिला उपयुक्त असणार्‍या किटकासह चिमन्या पाखरही शेतातुन हद्दपार झाली.

तननाशकाच्या अति वापराने सरपटनारे प्राणीही शेतात फिरने बंद झाले.शेताच्या बांधातच पिकाचा स्वास घूसमटने सुरु झाले.अशातच संकरित बियान्यांच्या किमती गगनाला भिडल्या.बियाने उत्पादनात असनार्‍या कंपन्या वारेमाफ नफेखोरित अडकल्यामुळे शेतकर्‍याला लुटिचे सत्र सुरु झाले.पांरपारीक बियाने संपत चालल्यामुळे शेतकर्‍याला या कंपन्याचे उंबरठे झिजवल्याशिवाय पर्यायच उरला नाही. असे असले तरी सगळेच संपले आहे असे मात्र नाही.आता हळुहळु खेड्यातला मानसाला आपल्या आतल्या आवाजाची हाक ऐकु येवु लागली आहे.आपल्याला कोन नागवते हे कळु लागले.त्याच्यात नवी उर्जा संचारते आहे.

या उर्जेच्या बळावर तो नवे जगन्याचे मार्ग शोधतो आहे.रासायनिक खताला नकार,किटकनाशकाला नकार,पान्याची नासाडी.सहकारातिल राक्षस गाडला पाहिजे ही भावना वाढिस लागते आहे.यातुनच नवे खेडे निर्मान होईल.असे म्हनायला जागा आहे.म्हनुन काही लोक वेगळा विचार करतात.आणी यातुनच शेंद्रिय शेती तंत्रज्ञानाचा वापर आज बरेच लोक करु लागले.बघा आज प्रत्येक शेतकर्‍याला जर विचारले,कि तुम्हाला शेती करन परवडते का? तर उत्तर काय मिळते.नाही!परवडत नाही!.

कारन शेती करताना सुरवातिला करावा लागतो खर्च,आणी नंतर मिळते उत्पन्न.पण खर्च हा कसा असतो.अर्थातच जास्त आणी उत्पन्न कमी त्यामुळे शेती परवडत नाही.कारण शेतिच समिकरन कस असल पाहिजे,खर्च कमी व उत्पन्न जास्त.तरच भारतातला शेतकरी हा सुजलाम,सुफलाम होउ शकतो.आणी यावर एकच पर्याय .आणी तो म्हनजे शेंद्रिय शेती.पन सावध रहा?बाजारात या शेंद्रिय शेतिच्या नावावर सुद्धा लोक लुबाडत आहे.म्हनुन सेंद्रिय शेती म्हणजे ब्रँडेड कंपन्यांचे उत्पादनं घेऊनच सेंद्रिय शेती होते हा देखील शेकऱ्यांचा जीव घेणारा विचार आहे सेंद्रिय शेती साठी शेतकर्यांनीच सेंद्रिय खते व कीटकनाशके घरच्या घरी तयार करण्याची कला शिकून घेतली पाहिजे .

 

जैविक शेतकरी

शरद केशवराव बोंडे.

९४०४०७५६२८

ध्येय मातीला वाचवणं

Save the soil all together

English Summary: Also will present agriculture and through Change farmers'
Published on: 25 April 2022, 01:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)