Agripedia

शेतकरी शेतामध्ये विविध पिके घेतात. सद्यस्थितीत पारंपारिक पिके कालातीत होत आहेत. शेतकरी आता विविध प्रकारचे आधुनिक आणि वैविध्यपूर्ण पिके घेण्याकडे वळत आहेत. यामध्ये विविध प्रकारचे भाजीपाला विशेषकरून विदेशी भाजीपाला लागवड, सफरचंदा सारख्या फळबागांचा प्रयोग, स्ट्रॉबेरी आणि ड्रॅगन फ्रुट सारखे फळबागा यशस्वी करत आहेत.

Updated on 16 July, 2022 2:16 PM IST

 शेतकरी शेतामध्ये विविध पिके घेतात. सद्यस्थितीत पारंपारिक पिके  कालातीत होत आहेत. शेतकरी आता विविध प्रकारचे आधुनिक आणि वैविध्यपूर्ण पिके घेण्याकडे वळत आहेत. यामध्ये विविध प्रकारचे भाजीपाला विशेषकरून विदेशी भाजीपाला लागवड, सफरचंदा सारख्या फळबागांचा प्रयोग, स्ट्रॉबेरी आणि ड्रॅगन फ्रुट सारखे फळबागा यशस्वी करत आहेत.

या सगळ्या पिके घेण्याच्या पद्धतीमध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत. जर आपण औषधी वनस्पती लागवडीचा विचार केला तरी यामध्ये शतावरी, अश्वगंधा आणि कोरफड त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

कारण औषधी वनस्पतींची देखील मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. अजूनही औषधी वनस्पतींच्या लागवडीबाबत आणि त्यांच्या बाजारपेठेत बाबत शेतकऱ्यांमध्ये पुरेशी माहिती नाही.

हळूहळू यामध्ये शेतकरी प्रगत होत आहेत. या लेखामध्ये अशाच आपण उपयुक्त कोरफडीची लागवड आणि त्याच्यात होणारी कमाई याबद्दल माहिती घेणार आहोत.

 उपयुक्त कोरफड लागवड

 माफक गुंतवणुकीतून तुम्ही कोरफड लागवड करू शकता व या माध्यमातून तुम्ही दरवर्षी पाच पट नफा देखील मिळू शकतात.

कोरफडीचे मागणी दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.अनेक प्रकारची सौंदर्य प्रसाधने असो किंवा आयुर्वेदिक औषधनिर्मिती या सगळ्यांमध्ये कोरफड मोठ्या प्रमाणात वापरली जात असल्यामुळे बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

नक्की वाचा:Money Plant: घरात मनी प्लांट लावल्याने होतात 'हे' मोठे बदल ; वास्तुशास्त्र काय सांगतंय? वाचा..

कोरफड लागवडीतून भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. खूप जास्त प्रमाणात कोरफडीची लागवड भारतात आता प्रसिद्ध होत आहे. कोरफड लागवडीसाठी जमिनीचा विचार केला तर पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि जास्त ओलावा असणार नाही अशा जमिनीची गरज असते.

वालुकामय माती याची लागवडीसाठी चांगली मानली जाते. परंतु कोरफड लागवड करण्याआधी त्याची इत्थंभूत माहिती असणे देखील खूप महत्त्वाचे आहे. कोरफड लागवडीचा विचार केला तर यावर कीटकांचा प्रादुर्भाव फार लवकर होतो.

त्यामुळे कीटकनाशकांचा वापर हा करावाच लागतो. जर आपण कोरफडीच्या प्रजातींचा विचार केला तर एलोवेरा बार्बाडेंसिस  लागवडीसाठी जास्त प्रमाणात वापरली जाते. ज्यूस बनवण्यापासून ते सौंदर्यप्रसाधने बनवण्या पर्यंत त्याचा वापर केला जातो.

मागणीमुळे शेतकरी देखील त्याचे लागवड अधिक करतात. कारण या प्रजातीच्या कोरफडीची पाने मोठी असतात आणि त्यातून अधिक जेल बाहेर येते. तसेच दुसरी प्रजाती म्हणजे इंडिगो हेदेखील लागवडीसाठी चांगली मानली जाते. सामान्यपणे आपण घरामध्ये किंवा घराच्या परसबागात कुंड्यांमध्ये देखील लावतो.

नक्की वाचा:माहिती खतांच्या बाबतीत! शेतकरी राजांनो, वापरा 'या'सोप्या पद्धती आणि ओळखा Urea आणि DAP असली आहे या नकली

 कोरफडीचा लागवड कालावधी

 कोरफडीची लागवड ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर पासून करता येते. अन्यथा वर्षभर केव्हाही लागवड केली तरी चालते. लागवड करताना दोन रोपांमधील अंतर दोन फूट असणे गरजेचे असते. एकदा लागवड केली तर वर्षातून दोनदा काढणी केली जाते.

 कोरफडी पासून फायदा

 एक एकर शेतात 12000 कोरफडीचे रोपे लावता येतात. एका रोपाची किंमत तीन ते चार रुपये असते. म्हणजे एका एकरामध्ये कोरफडीची लागवड करण्यासाठी सुमारे 40 हजार रुपये खर्च येतो.

एका रोपापासून जवळ जवळ कोरफडीचे चार किलोपर्यंत पाने निघतात. एका पानाचे किंमत सात ते आठ रुपयांपर्यंत आहे. ही पाने विकून तुम्ही नफा मिळवू शकतात.

तसेच थेट कंपनीला देखील विकता येतात. एका एकरातील कोरफडीची पाने विकून लाखो रुपये मिळवता येतात. सुरुवात हळूहळू करावी  नंतर व्यवसायाचा आवाका वाढवावा.

नक्की वाचा:मका पिकाच्या उत्पादन वाढीकरिता झिंक सल्फेट या खताचे आदिवासी शेतकऱ्यांना वाटप

English Summary: alovera cultivation is so profitable farming and give more income to farming
Published on: 16 July 2022, 02:16 IST