Agripedia

देशात सध्या शेतकरी बांधव शेती क्षेत्रात मोठा अमुलाग्र बदल करीत आहेत. शेतकरी बांधवांनी आता पीकपद्धतीत मोठा बदल केला असून नगदी पिकांची आणि अल्पकालावधीत तसेच नेहमीच मागणी मध्ये असलेल्या पिकांची लागवड सुरू केली आहे. अशाच एका पिकांपैकी आहे एलोवेरा अर्थात कोरफड चे पिक. सध्या संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिक मेडिसिन्स तसेच आयुर्वेदिक कॉस्मेटिक प्रोडक्टस वापरायला सुरुवात केली आहे. आयुर्वेदिक मेडिसिन्स, तसेच सर्व प्रकारचे कॉस्मेटिक प्रोडक्ट बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एलोवेराचा उपयोग केला जातो.

Updated on 13 February, 2022 7:03 PM IST

देशात सध्या शेतकरी बांधव शेती क्षेत्रात मोठा अमुलाग्र बदल करीत आहेत. शेतकरी बांधवांनी आता पीकपद्धतीत मोठा बदल केला असून नगदी पिकांची आणि अल्पकालावधीत तसेच नेहमीच मागणी मध्ये असलेल्या पिकांची लागवड सुरू केली आहे. अशाच एका पिकांपैकी आहे एलोवेरा अर्थात कोरफड चे पिक. सध्या संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिक मेडिसिन्स तसेच आयुर्वेदिक कॉस्मेटिक प्रोडक्टस वापरायला सुरुवात केली आहे. आयुर्वेदिक मेडिसिन्स, तसेच सर्व प्रकारचे कॉस्मेटिक प्रोडक्ट बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एलोवेराचा उपयोग केला जातो.

यामुळेच कोरफडला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कोरफड लागवड शेतकऱ्यांसाठी वरदान सिद्ध होऊ शकते असे तज्ञांचे मत आहे. याच गोष्टी लक्षात घेऊन आम्ही आज आमच्या वाचक मित्रांसाठी कोरफड शेती विषयी काही महत्वाच्या बाबी सांगणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया कोरफड शेतीविषयी ए टू झेड माहिती.

एलोवेरा लागवडमधील काही महत्वाच्या बाबी- एलोवेरा लागवडीविषयी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याच्या शेतीसाठी केवळ वन टाइम इन्व्हेस्टमेंट करण्याची आवश्यकता असते. एक वेळेस कोरफड लागवड झाली की सुमारे पाच वर्ष यापासून उत्पादन मिळवले जाऊ शकते. तसेच, एकदा लागवड झाल्यानंतर कोरफड पासून मिळणारे बेबी प्लांट उपयोगात आणून पुन्हा त्याची लागवड करणे सोपे होते. यामुळे एलोवेराची रोपांची संख्या वाढतच जाते आणि उत्पादना त्यामुळे वाढ होते. असे सांगितले जाते की, एलोवेराचे झाड सुमारे चार महिन्यानंतर बेबी प्लांट देण्यास सज्ज होते.

एलोवेरा लागवड अशा जमिनीत केली गेली पाहिजे ज्या जमिनीत ओलावा हा कमी असतो, तसेच एलोवेरा लागवड केलेल्या क्षेत्रात पाणी साचता कामा नये. एलोवेरा लागवड वाळू मिश्रित माती असलेल्या जमिनीत करण्याचा सल्ला दिला जातो. याची लागवड चिकन माती असलेला सुपीक जमिनीत देखील केली जाऊ शकते मात्र अशा जमिनीत यापासून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. त्यामुळे याची लागवड अशा जमिनीत न करता वाळूमिश्रित माती असलेल्या जमिनीत करावी.

वेळोवेळी एलोवेरा पिकाची खुरपणी व निंदणी करणे आवश्यक असते. एलोवेरा च्या असंख्य जाती आहेत. यातील इंडिगो ही जात भारतात अधिक बघायला मिळते या जातीची कोरफड अनेक लोक आपल्या घरात ठेवत असतात. असे असले तरी एलोवेरा बार्बाडेन्सीस ही जात अलीकडे व्यावसायिक शेतीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली जात आहे. या जातीची बाजारात मोठी मागणी देखील आहे. एलोवेरा लागवड करणारे शेतकरी देखील या जातीला जास्त पसंती दर्शवीत आहेत, कारण की या जातीच्या एलोवेराला मोठी पाने येतात.

कोरफड लागवड फेब्रुवारी ते ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत करता येते, या काळात लागवड केल्यास कोरफडीपासून चांगले उत्पादन मिळते. असे असले तरी, हिवाळ्यात एलोवेरा लागवड केली जात नाही. हिवाळा वगळता शेतकऱ्यांनी वर्षातून केव्हाही एलोवेरा लागवड केली तरी चालते. लागवड करताना दोन रोपांमध्ये 2 फूट अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. रोपाची लागवड केल्यानंतर, शेतकरी वर्षातून दोनदा त्याची पाने काढू शकतात आणि नफा मिळवू शकतात, म्हणजे एका वर्षात एलोवेरा पिकातून दोनदा उत्पादन घेता येते.

कोरफड लागवडिस जंगली प्राण्यांचा देखील कोणताही त्रास नसतो. याला कोणतेच प्राणी खात नाहीत. असे असले तरी एलोवेरा लागवड केलेले शेत जनावरांपासून संरक्षित केले पाहिजे कारण त्याची पाने खूप मऊ असतात आणि यांच्या पानांना प्राणी पायाने तुडवतात.

एलोवेरा शेतीतुन किती होते कमाई- मित्रांनो जर आपणास कोरफड लागवड करायची असेल तर आपण एक बिघा क्षेत्रात 12 हजार कोरफडीची रोपे लावू शकतात. एलोवेरा च्या एका रोपाची किंमत 3 ते 4 रुपये आहे. म्हणजेच एक बिघा शेतात कोरफड लागवड करण्यासाठी, रोपांसाठी सुमारे 40 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. कोरफडीच्या एका झाडापासून 3.5 किलोपर्यंत पाने मिळतात आणि एका पानाची किंमत 5 ते 6 रुपयांपर्यंत असते. तसे पाहता, एका झाडाची पाने जवळपास 18 रुपय किंमतीपर्यंत विकली जाऊ शकतात. म्हणजे जर शेतकरी बांधवांनी 40 हजार रुपयांची गुंतवणूक करून कोरफड लागवड केली असेल, तर त्यांना अडीच लाख रुपयांपर्यंत कमवू शकतो.

English Summary: aloe vera farming ideas very helping for farmers
Published on: 13 February 2022, 07:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)