Agripedia

अ‍ॅग्रोकेमिकल्स: हे खते आणि कीटकनाशके यासारख्या रसायनांना दिले गेलेले सामान्य नाव आहे. नावाप्रमाणेच अ‍ॅग्रोकेमिकल्स शेतीमध्ये वनस्पतींच्या वाढीस आणि संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते . त्यांना कृषी रसायने देखील म्हणतात.

Updated on 30 April, 2021 11:15 AM IST

अ‍ॅग्रोकेमिकल्स: हे खते आणि कीटकनाशके यासारख्या रसायनांना(chemicals) दिले गेलेले सामान्य नाव आहे. नावाप्रमाणेच अ‍ॅग्रोकेमिकल्स शेतीमध्ये वनस्पतींच्या वाढीस आणि संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते . त्यांना कृषी रसायने देखील म्हणतात.

अनेक आजारांना निमंत्रण :

रसायने ही पिकाचे उत्पादन सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत , तथापि, याचा अतिवापर आता पर्यावरणावर मोठा परिणाम दिसून येत आहे . अ‍ॅग्रोकेमिकल्स आपल्या आजूबाजूच्या जमीन आणि जल संस्थांमध्ये जातात आणि अन्न साखळीत प्रवेश करतात.अशा रसायनांचा जास्त प्रमाणात वापर केल्याने महत्त्वपूर्ण प्रमाणात अवशेष निर्माण होतात. या अवशेषांमुळे पोषक असंतुलन आणि कृषी उत्पादनांची गुणवत्ता-कपात होते. या अवशेषांच्या वापरास विविध आजारांशी जोडले गेले आहे. उदाहरणार्थ, अन्नातील कीटकनाशकांच्या अवशेषांमुळे मानवांमध्ये दम्याचा धोका वाढू शकतो.

हेही वाचा:कपाशीच्या शेतीतून बोंड अळीचा नायनाट करायाचा असेल तर 'या' गोष्टी आहेत महत्त्वाच्या

मातीवर परिणाम:

  • रसायनाचा मोठया प्रमाणात वापर केल्याने ते मातीसाठी फायद्याच्या इतर जीवांचा नाश करू शकतात.
  • मातीत नायट्रेटचे प्रमाण वाढते.
  • पीएच पातळी बदलते.
  • अनैसर्गिक वाढ याचा प्रभाव दिसून येतो.
  • अनेक विषारी chemical आपल्या अन्न साखळीत प्रवेश करतात.

पाण्यावर परिणाम:

  • केमिकल युक्त पाणी वापरासाठी अयोग्य बनते .
  • पाण्यातील वाढत्या केमिकलमुळे मोठ्या प्रमाणातील पाण्यांमध्ये शैवालच्या वाढीस चालना देतात - ज्यामुळे माशासारख्या जीव पाण्यात जास्त काळ टिकू शकत नाही .
  • जास्त रसायने युट्रोफिकेशनला कारणीभूत ठरतात.
  • पाणी प्रदूषण वाढते.
  • पाण्याचे रासायनिक गुणधर्म बदलतात .

हवेमध्ये प्रदूषण वाढते :

  • कीटकनाशकाचे कण हवेने विखुरतात, आणि हवेची रचना बदलतात.
  • वारा प्रदूषितहोऊन त्याचा दुष्परिणाम पसरवितो.
  • श्वसन आजारांचा धोका वाढतो.
English Summary: Agrochemicals and their effects on the environment
Published on: 30 April 2021, 10:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)