Agripedia

शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन यंत्राचा वापर करून चांगले उत्पादन घेत असतात. बऱ्याच शेतकऱ्यांना उस पिकातील आंतर मशागतीच्या यंत्राविषयी आणि वापराविषयी माहिती नसते.

Updated on 13 September, 2022 12:09 PM IST

शेतकरी आपल्या शेतीमध्ये (agriculture) नवनवीन यंत्राचा वापर करून चांगले उत्पादन घेत असतात. बऱ्याच शेतकऱ्यांना उस पिकातील आंतर मशागतीच्या यंत्राविषयी आणि वापराविषयी माहिती नसते.

महत्वाचे म्हणजे ऊस पिकामध्ये (Sugarcne Crop) बाळबांधणी, खते देणे, तणनियंत्रण तसेच मातीची भर देणे इ. आंतरमशागतीची कामे केली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचा मंजुरीवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो.

ऊस पिकातील आंतरमशागतीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ट्रॅक्टरचलित फुले ऊस आंतरमशागत यंत्र (sugarcane intercropping machine) विकसित केले आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; सोयाबीनच्या दरात सुधारणा; मिळतोय 'इतका' दर

या यंत्राचा शेतकऱ्यांना (farmers) फायदा असा आहे की, या यंत्रामुळे मजुरीवर होणाऱ्या खर्चात बचत होते. विशेष म्हणजे या यंत्राची १२० ते १५० सेंमी अंतरावरील उसाला भर देणे आणि दाणेदार खत पेरणीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यवान ठरण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

यंत्राची वैशिष्ट्ये

ट्रॅक्टरचलित फुले ऊस आंतरमशागत हे यंत्र २०१२ साली विकसित करण्यात आले आहे. हे यंत्र १८.५ आश्वशक्ती पेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरच्या (horse power tractors) सहाय्याने ओढता येते. या यंत्राने मातीचा वरचा थर फोडणे, उसाला मातीची भर देणे आणि खत पेरणी अशी कामे एकाच वेळी केली जातात.

खत पेरणी उसाच्या मुळाशी झाल्यामुळे पिकाची जोमदार वाढ होते. खताचा अपव्यय होत नाही. उसाची बाळ बांधणी आणि मुख्य बांधणी पिकाचे नुकसान न करता करता येते. १२० सेंमी पेक्षा जास्त अंतरावरील उसामध्ये हे यंत्र सहज वापरता येते.

महत्वाच्या बातम्या 
आनंदाची बातमी! आता गॅस सिलिंडर मिळणार फक्त 750 रुपयांमध्ये; आजच करा बुकिंग
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सूक्ष्म सिंचनासाठी तब्बल 666 कोटींचे अनुदान जाहीर
LIC च्या जीवन प्रगती योजनेमध्ये दररोज 200 रुपये जमा करा आणि मॅच्युरिटीनंतर मिळवा 28 लाख रुपये

English Summary: Agriculture University launches tractor driven machine intercropping sugarcane
Published on: 13 September 2022, 12:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)