आता काही दिवसांनी रब्बी हंगाम तोंडावर आला असून रब्बी हंगामाची तयारी काही दिवसात सुरू होईल. प्रामुख्याने आपल्याला माहित आहेच की भारतामध्ये रब्बी हंगामामध्ये गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु आपण मागील काही वर्षापासून वाढत्या तापमानाचा विचार केला तर याचा परिणाम थेट पीक उत्पादन घटीवर होताना दिसत आहे.
वाढत्या तापमानाचा विपरीत परिणाम पिकांवर होत असून शेतकरी राजांना अपेक्षित उत्पादन मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
तापमानवाढीमुळे बऱ्याच प्रकारचे नुकसान होत असून या पार्श्वभूमीवर विविध कृषी विद्यापीठातील कृषी संशोधकांनी वाढत्या तापमानात तग धरतील अशा वाणे विकसित करण्यावर भर दिला आहे. याच पार्श्वभूमीवर कृषी संशोधकांनी गव्हाचे वाढत्या तापमानात टिकाव धरू शकेल असे वाण विकसित केले आहे.
वाढत्या तापमानात तग धरू शकणारे गव्हाचे वाण
मागच्या रब्बी हंगामामध्ये तापमान वाढीमुळे गहू पिकाचे खूप मोठे नुकसान झाले होते व एकंदरीत गहू उत्पादक राज्यांमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसला होता.
नक्की वाचा:Groundnut Tips: भुईमुगाचे भरघोस उत्पादन हवे तर करा प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर,होईल फायदा
या पार्श्वभूमीवर पंजाब कृषी विद्यापीठाने वाढत्या तापमानात टिकाव धरू शकेल असे गव्हाचे वाण विकसित केले असून त्याचे नाव पिबीडब्ल्यू-826 हे आहे. जर आपण या वाणाचा विचार केला तर गेल्या चार वर्षापासून यासंबंधी चाचण्या घेतल्या गेल्या असून 148 दिवसात हे वाण विकसित करण्यात आले आहे.
हे वाण आता राज्य सरकारच्या समितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले असून संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते शेतकऱ्यांसाठी वापरास उपलब्ध करण्यात येणार आहे.
जर आपण एकंदरीत पीबीडब्ल्यू-826 या वाणाचा विचार केला तर गव्हाच्या एचडी 2967 आणि एचडी 3086 या वाणांच्या तुलनेत गव्हाचा दाणा आकाराने 31 टक्के मोठा आहे. तसेच या वाणापासून इतर वाणांच्या तुलनेत 17 टक्के अधिक उत्पादन मिळेल असे देखील कृषी संशोधकांनी म्हटले आहे.
नक्की वाचा:Fertilizer: गंधकाचा वापर ठरेल ऊस उत्पादन वाढीत माईलस्टोन,वाचा सविस्तर माहिती
Published on: 28 September 2022, 10:35 IST