Agripedia

हंगाम खरीप असो की रब्बी या दोन्हीही हंगामात जो पर्यंत त्या शेतमालाचे खळे होवून घरात माल येत नाही

Updated on 22 March, 2022 5:07 PM IST

हंगाम खरीप असो की रब्बी या दोन्हीही हंगामात जो पर्यंत त्या शेतमालाचे खळे होवून घरात माल येत नाही तो पर्यंत तो आमचा नसतो असे बळीराजा नेहमी म्हणतात आणि ते सत्यच आहे 

चालू खरीप हंगामात कधी नव्हे असा मान्सून वेळेवर आला त्यामुळे मूग पिकाची पेरणी प्राधान्याने केली सतत दोन महिने पाऊस होता मूग पिकाची वाढ जवळपास कमरेपर्यंत झाली शेंगा ही चांगल्या लागल्या ते परिपक्व ही झाल्या आता फक्त तोडणी करणे आणि खळे करणे इतके च काम बाकी शेतकरी खुश होते दरवर्षी सारखे या वर्षी बखाड पडले नाही त्याचा मोठा आनंद होता त्याच बरोबर दरवर्षी प्रमाणे आभाळाकडे टक लावून पहायची वेळ आली नाही असे सुखरूप सर्व चालले होते पण मध्येच कृपारूपी निसर्गाची ऐन मूग काढनित अवकृपा झाली सतत काही दिवस पाऊस पडत गेला आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. 

मला काही शेतकरी विचारत होते साहेब या वर्षी खूप पाऊस चांगला आहे त्यामुळे कोणत्याच खरीप पिकाचे विमा भरू नये असे वाटते पुन्हा तेच म्हणत आत मूग उडीद हे पीक आलेत यांचा विमा भरणार नाही दुसरे मका सोयाबीन ही येणारेचं आहे आता फक्त तूर आणि कापूस पिकाचे विमा भरण्याचे आम्ही मनात आणत आहोत इतकी खात्री पिकाची झाली होती पण मागच्या आठवड्यात एन मूग काढणीत आलेल्या पावसाने पुन्हा होत्याचे नव्हते केले

शेती कोरडवाहू असो की बागायती ती निसर्गाच्या अवकृपेच्या कचाट्यात सापडतेच एक ही असे वर्ष नाही की ज्या वर्षात सर्व पीक पदरात पडले गेल्या 2019 वर्षी देखील सोयाबीन मका आणि बाजरा या पिकाची काढणी अवस्था येणे 

आणि सतत सप्टेंबरमध्ये पाऊस येणे त्यावेळी ही असेच झाले त्यामुळेच या वर्षी खरीप सोयाबीन उगवनशक्तीवर परिणाम झाला

त्यापुर्वीचे दोन हे वर्ष गुलाबी बॉण्डअळीने कापूस पिकावर घातलेले थैमान यामुळे लक्षात राहिले

दुष्काळी वर्ष तर पाचवीला पूजिले सारखे सोडत नाही त्यामुळेच शेतीमाल घरात येईपर्यंत खरं नाही हेच खरं

त्यात आता या 2020 वर्षांनी असे शिकवले घरात आले तरी मार्केट मिळेलच याची खात्री राहिली नाही या जागतिक महामारीने उत्पादती झालेला माल ग्राहकांच्या दारी जाऊन विकावा लागला त्यामुळेच या व्यवसायात अस्थिरता कायम आहे.

फळबागा चांगल्या जोपासल्या जातात त्यात एक वर्ष असे येते की ते फळ बागेचे सरपण करते त्यामुळे या व्यवसाया इतके धोके इतर कोणत्याच व्यवसायात नाही हेच वास्तव

निसर्गाच्या कृपेने किंवा अवकृपेच्या होणारे नुकसान कमीच काय त्यात पुन्हा भर पडते ती अनेकांनी केलेल्या फसव्या धंदयाने कोण्ही काटा मारला, कोणी भाव पाडले, कोण्ही नको ते माथी मारले कोण्ही कागद काढण्यासाठी ताणून धरले अशा दररोज संघर्ष करीत जीवन जगत आहे या इतक्या संकटाना सामोरे जात जसे वाळवंटात हिरवळ सापडावी तसे एखादे वर्ष येते आणि हे वर्षे मागचे पाच वर्षे आणि पुढील पाच वर्षे दुःख विसरण्यास भाग पाडते असे आमचे जीवन असते

मग जे नियमित महिना घेऊनही वेगळे मागतात तेव्हा मात्र आम्ही हिरमुस होतो.

English Summary: Agriculture products from farm come to home not our
Published on: 22 March 2022, 05:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)