शेती आणि शेतकऱ्यालाच महत्व येणार आहे, शेतकरी मुलाची किमत येत्या पाच वर्षात आपल्या कळेलच त्या वेळेस आपल्या कडे पश्चाताप शिल्लक राहील. आजच्या कोरोना महामारी च्या काळातही सुद्धा शेती किती उत्तम व्यवसाय आहे हे कोरोनाने दाखवून दिले आहे. लॉक डाऊन मध्ये जवा सर्व कंपन्यांना कुलूप लागले तेव्हा काय आईने मात्र सर्वांना कुशीत घेतले हे आपल्याला विसरुन नाही चालणार. आज हि कित्येक मुलं हि फक्त लग्न करण्यासाठी साठी कंपनीत कामाला गेली आहे आणी जात आहेत
हे लग्न झाले कि एक अपत्य झालं कि घरी येतात मग आपण भामटे होतो. तर काही लोकं मग मुलीची फारकत घेतात आणि समाजत इजत घालून घेतात. त्या पेक्षा आजच शेतकरी मुलगा निवडा तीन एकर पाच एक शेती असेल मुलगा निर्व्यसनीअसेल शेती हंगामी बागायती असेल तरी तो पाच ते सात लाखच उत्पन्न काढतो. जास्त शेती ही कोणाकडे राहिली नाही म्हणून सात एकर बारा एक हा विषय सोडून द्या. गावातून एक किंवा दोन मुलांना पाच एकर शेती वाट्याला येती जेवडी जास्त शेती तेवढच कष्ट जास्त, खर्च जास्त, नुकसान झाले तर ते जास्त प्रमाणात होते. शेती ह्या व्यवसाय कोणाचा रुबाब ऐकायची गरज नाही, टार्गेट नाही, कोणी आपले मालक नाही,
कॉम्पिटिशन नाही, व्यवसाय कायम स्वरूपी टिकाऊ, आणि हो शेती ही सेंद्रिय केली तरच फायद्याची ठरेल. कारण आपण जरी शेतीचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढवू लागलो त्याचप्रमाणे आपल्याला उत्पादन खर्च ही कमीच करावा लागेल त्यासाठी सेंद्रिय शेतीची कास धरणे आवश्यक आहे.शेतात थोडे फार काम केल्यामुळे शरीर मजुबूत राहते, प्रदूषण मुक्त हवा, लॉकडाउन असले तरी पाच किलोमीटर पर्यंत शेतात फिरा, सर्व भाजीपाला,दुध, आपल्याच शेतातील उपलब्ध, घर भाडे नाही, पाणीपट्टी नाही, ग्रामीण भागतील मज्जा जरा वेगळीच आहे आणि त्यामधे वेगळं सांगण्याची गरज नाही.
शेतकरी आज जरी मनाचा राजा असला तरी येत्या काहीच वर्षात तो इतरांचा राजा बनेल. त्यामुळे शेती हाच उत्तम व्यवसाय आहे असे आपल्याला समजून घ्यावे लागेल.
गोपाल उगले
कृषी महाविद्यालय अकोला
9503537577
Published on: 30 December 2021, 03:33 IST