Agripedia

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी नवनवीन योजना राबवत असते. आता कृषी विभागानेही शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कृषी विभागाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.

Updated on 18 August, 2022 12:27 PM IST

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी नवनवीन योजना राबवत असते. आता कृषी विभागानेही शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कृषी विभागाच्या (Department of Agriculture) या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.

आता राष्ट्रीय कृषी विकास योजनेत मृद आरोग्य पत्रिका अभियान पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या अभियानात जिल्ह्यात शेत जमिनीतील मातीची तपासणी (Soil Test) करण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या मृदा विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यातून (Ahmednagar District) 6 हजार 696 माती नमुने गोळा केले आहेत.

'या' योजनेत फक्त 100 रुपयांची गुंतवणूक करा आणि मिळवा 75 हजार रुपयांचा लाभ; जाणून घ्या

या माती नमुन्यांतील विविध घटकांची तपासणी करून त्यानुसार शेतकर्‍यांना (Farmer) डिजीटल स्वरुपात आरोग्य पत्रिका (Soil Health Card) देण्यात येणार आहे. यामधील जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून सहा याप्रमाणे 84 गावे निवडली आहेत. या गावांतून माती नमुने गोळा करण्यात आले आहेत.

त्यानंतर आता या माती नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे. प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर संबंधित शेतकर्‍यांना डिजीटल (Digital) स्वरुपात आरोग्य पत्रिका देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! सोयाबीन विकला जातोय 'या' दरात; जाणून घ्या आजचे बाजारभाव

महत्वाचे म्हणजे या आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना शेत (agriculture) जमिनीची काय परिस्थिती आहे? पिकांसाठी कोणती खते किती प्रमाणात वापरायला हवीत? याची माहिती देखील मिळणार आहे. याबाबत 'कृषिक' या मोबाइल अ‍ॅपवरही माहिती देण्यात येणार आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांना स्मार्टफोनवरही (Smartphone) जमिनीच्या आरोग्याची (Health) माहिती कळणार आहे. सेंद्रीय कर्ब, सामू, क्षारता, नत्र, स्फूरद, पालाश, मँगनीज, गंधक, बोरॉन, लोह, तांबे असे विविध 12 घटक तपासण्यात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या;
पीएम किसान योजनेबाबद महत्वाची बातमी; पती-पत्नीला लाभ मिळण्यासंदर्भात नवीन नियम लागू
Modi Government: मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय; 'या' योजनेला दिली मंजूरी
Crop Management: कापूस आणि सोयाबीन पिकांतील तणनियंत्रण वेळीच करा; अन्यथा होईल मोठे नुकसान

English Summary: Agriculture department big decision farmers
Published on: 18 August 2022, 12:20 IST