Agripedia

निंबोळी पावडरमध्ये ऑझाडीरेक्टीन घटक असल्यामुळे मातीमधील हुमणी, खोडकीड, कटवर्म, वाळवी विषाणु, बुरशी या शत्रूकिटक, रोगांचा ते नायनाट करते.

Updated on 30 October, 2021 7:47 PM IST

निंबोळी पावडर हे संपूर्ण नैसर्गिक स्वरुपामधील निंबोळी पावडर असल्याने जमिनीमधील कोणत्याही उपयुक्त जिवाणुंना हानी पोहचत नाही. निंबोळी पावडर हे रासायनिक खतांमध्ये मिसळून वापरल्याने रासायनिक खतांमधील नत्र टिकून राहते. निंबोळी पावडर पिकांचे सूक्ष्मकृमींच्या, सुत्रकृमींच्या प्रादुर्भावापासून १००% संरक्षण करते. निंबोळी पावडर मर रोगाच्या प्रमाणामध्ये घट करते. 

निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीमधील मातीचे कण एकमेकांना चिटकत नाहीत. यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते.

निंबोळी पावडर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. तसेच मातीमधील ह्युमसचे प्रमाण वाढवून पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ होण्यास मदत होते.

निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीचा सामू चांगला राखला जातो. परिणामी ऊत्पादन व गुणवत्ता वाढते.

निंबोळी पावडरच्या वापराचे प्रमाण

सर्व पिकांमध्ये वापरास योग्य असणारी ही निंबोळी पावडर एकरी १५० किग्रॅ वापरण्याची शिफारस आहे फळबागेमध्ये वापर करायचा असल्यास २०० ग्रॅम प्रति झाड(१ वर्ष) या प्रमाणामध्ये चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत द्यावे सेंद्रिय, रेसिड्यूफ्री, नैसर्गिक, जैविक, एकात्मिक, रासायनिक इ. सर्व शेती प्रकारामध्ये वापराकरिता पूर्ण सुरक्षित आहे कडूनिंब सर्वांना परिचित असलेले वृक्ष आहे. सहज लागवड होणारे,

कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही ठिकाणी जगणारे हे वृक्ष संपूर्ण मानवजातीला उपयोगी असून आज निंबोळी पावडर ४० रुपये प्रति किलो आहे. आपण सर्व सन्माननीय मंडळी संकल्प करुया कडूनिंब लागवड व संवर्धनाचा

 

संकलन - प्रवीण सरवदे कराड

English Summary: Agricultural work of neem powder.
Published on: 30 October 2021, 07:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)