Agripedia

पेरणीनंतर (kharip crop cultivation) जाणीवपूर्वक युरिया खताची (urea fertilizer) टंचाई निर्माण करुन शेतकर्‍यांची अडवणुक करणार्‍या कृषी सेवा केंद्रांकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. अहमदनगर जिल्ह्यात हे चित्र पाहायला मिळत आहे.

Updated on 31 July, 2022 3:31 PM IST

पेरणीनंतर (kharip crop cultivation) जाणीवपूर्वक युरिया खताची (urea fertilizer) टंचाई निर्माण करुन शेतकर्‍यांची अडवणुक करणार्‍या कृषी सेवा केंद्रांकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. अहमदनगर जिल्ह्यात हे चित्र पाहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांना या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पारनेर (parner) तालुक्यातील कृषी सेवा केंद्राची (agriculture seed, insecticide and fertilizers input center) चौकशी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हे ही वाचा 
Crop Insurance Scheme: पीकविम्याचे धोरण बदलले; शेतकऱ्यांना होणार 'हा' मोठा फायदा, जाणून घ्या..

पारनेर तालुक्यातील कृषी सेवा केंद्रात युरिया खताचा कायमचा तुटवडा निर्माण होत आहे. पारनेर तालुका एकतर कायम दुष्काळी भाग आहे. यावेळी झालेल्या थोडाफार पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी पेरणी केली. अशा परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांनी घेतलेल्या पिकांसाठी युरिया खताची गरज पडू लागली आहे.

हे ही वाचा 
Monkeypox: 'या' देशात मंकीपॉक्सचा दुसरा बळी; जगभरात आढळले 20 हजारांहून रुग्ण

परंतु पारनेर तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांकडू मनमानी करून युरियाची टंचाई असल्याचे दाखवले जात आहे. युरिया मिळवण्यासाठी कृषी सेवा केंद्रात वारंवार हेलपाटे मारावे लागतात. पाऊस जर झाला नाही, तर युरिया भेटूनही उपयोग होत नाही. अशा प्रकारे शेतकरी पूर्ण हवालदिल झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

वारंवार युरिया तुटवडा निर्माण होत असल्याने सर्व कृषी सेवा केंद्राची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा संघटनेच्या वतीने उपोषण केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 
Pension Scheme: शेतकरी मित्रांनो; पत्नीच्या नावाने उघडा 'हे' अकाउंट, दर महिन्याला मिळतील 45 हजार रुपये
"या म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करावी"; रूपाली ठोंबरे पाटलांची राज्यपालांवर जहरी टीका
Common People: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; 1 ऑगस्टपासून होणार हे 'पाच' बदल

English Summary: Agricultural service centers investigated Farmers big relief
Published on: 31 July 2022, 03:23 IST