Agripedia

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात वीस/पंचवीस दिवसापूर्वी

Updated on 25 July, 2022 8:49 AM IST

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात वीस/पंचवीस दिवसापूर्वी पावसाच्या पाण्यावर लागवड झालेल्या मका या पिकावर अमेरिकन लष्करी अळिचा जवळ जवळ सर्व महाराष्ट्रात कमीअधिक प्रमाणात प्रादुर्भाव किंवा (अटॅक )आहे. तरी प्रत्येक शेतकरी मित्रांनी शेतात जाऊन आपल्या मका या पिकाचे निरीक्षण करावे, व उपाय योजना अत्यंत तातडीने कराव्या, कारण मका या पिकावर लष्करी आणि चा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला तर त्याचे नियंत्रण करणे कठीण जाते. त्या ऐवजी ती आणि येण्या अगोदर किंवा कमी प्रादुर्भाव असतो तेव्हा त्याचे नियंत्रण करणे सोपे जाते. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मका या पिकाचे निरीक्षण करावे. कारण मका हे पीक लष्करी

अळी मुळे पूर्णपणे नष्ट होते , आपण पोंगा किंवा ( कोम) म्हणतो ती हि लष्करी आळि खाते, त्यामुळे ते मक्याचे झाड किंवा मका पूर्ण पूर्णपणे निरोपयोगी होतो. कारण मका या पिकाला ज्वारी बाजरी गहू यासारखे मुख्य शेंडा किंवा (कोम) मेला तर मका या पीकास फुटवे येत नाही, ( ज्याला आपन मुर म्हणतो )त्यामुळे मका पिकावर प्रादुर्भाव झाल्यास मका मोडण्या शिवाय किंवा पीक काढून टाकल्या शिवाय पर्याय राहत नाही. त्यासाठी आपण या गोष्टीची काळजी घ्यावी.लष्करी अळी नियंत्रणाचे उपायलष्करी आळी चे रासायनिक कीटकनाशका द्वारे नियंत्रण करावयाचे असल्यास याप्रमाणे फवारणी करून आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकतो.1) ल्यामडा सायक्लोथोन 5 %15मी ली व कलोरोपायरी फॉस 50ई सी.30मीली व5 % निमार्क अर्क. हे वापरावे.

2) इमामेकटीन बेनझोएट10ग्रॅम व क्लोरोपायरी फॉस 50 ई सी 30मीली .व निमआर्क25 % हे प्रमाण 15 लीटर पंप साठी वापरावे व फवारणी करताना हळू चालावे, जेने करून फवारणीचे द्रावण मका पीकाचे पोग्यात जाऊन अळीचा ताबडतोब नियंत्रन होईल.यासाठी प्रतिएकरी 100लीटर पाणी वापरले पाहीजे.For this, 100 liters of water should be used per acre.3) जैविक नियंत्रना साठी निमोरीया रिलाया या बुरशीचा प्रति लीटर 5 गॅम याप्रमाने वापर करावा. आणि4)दुसरी बुरशी मेटाराईझीयम हीचा सुद्धा चांगला उपयोग होतो, सध्या हवामानात आद्रता जास्त असल्याने याचा चांगला परीनाम मिळतो हे झाले बुरशीजन्य किटकनाशके.5)बेकुलस थुरेसेन्सीस ( बीटी ) या विषाणूजन्य किटकनाशकाचा वातावरणात आद्रता असल्याने

चांगले परीनाम मिळतात, है औषध फकत 20 मी ली प्रतीपंप (15लीटर )याप्रमाने फवारणी करावयाची आहे है बाजारात 250ते 300रु ला250 मी ली मिळते.वरील जैविक औषधी बुरशीजन्य किटकनाशके किंवा विषाणूजन्य किटकनाशके हि प्रत्येक तालुका स्तरावरील कृषी विज्ञान केंद्र विद्यापीठे यांचेकडे मोफत किंवा नाममात्र दरात मिळतात.परत 8 दिवसांनी यापैकी एक फवारणी परत केली पाहीजे या मुळे लष्करी अळीचे प्रभावी नियंत्रन होईल,लष्करी अळी नियंत्रना साठी लाईट ट्रॅप ( प्रकाश सापाळे ) सुद्धा वापरले पाहीजे. तसेच कामगंध सापळे एकरी 5याप्रमाणे लावावे.सर्वसाधारण एकरी 5ते 10पक्षी थांबे ( टि T ) आकाराचे उभे करावे. लिबोळी अर्क याचे नियंत्रनात महत्वाची व प्रभावी भुमिका बजावते, तरी त्याचा वापर प्रत्येक फवारणीत आर्वजुन करावा.या प्रकारे योग्य काळजी घेतल्यास लष्करी अळीचे नियंत्रण करता येते.

 

प्रा दिलीप शिंदे सर

9822308252

English Summary: Agricultural Advice for Maize Armyworm and Control
Published on: 25 July 2022, 08:49 IST