Agripedia

मित्रांनो भारतात आता थंडी पडायला सुरवात झाली आणि ह्या थंडीच्या मौसम मध्ये पेरू खाण्याची मजाच काही न्यारी असते! बरोबर ना! आणि मित्रांनो थंडीत पेरू खाने आरोग्यासाठी लाभदायी असते. म्हणुन तुम्ही देखील हिवाळ्यात पेरू अवश्य खा. ज्याप्रकारे पेरू आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे त्याप्रमाणे पेरू उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. याची लागवड करून शेतकरी बांधव मोठी तगडी कमाई करत आहेत. मित्रांनो ग्रामीण भागात पेरूची झाडे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहावयास मिळतील. ह्याची किमत हि दुसऱ्या फळांच्या तुलनेत कमी असते आणि शिवाय आरोग्यासाठी खुपच फायदेशीर असते म्हणुन ह्याची मागणी हि बाजारात जास्त असते. मित्रांनो कृषी जागरण आज या अशा गुणकारी पेरूच्या एका विशिष्ट जातीविषयी माहिती घेऊन आले आहे चला तर मग जाणुन घेऊया.

Updated on 21 December, 2021 1:06 PM IST

कोणी विकसित केली पेरूची विशेष वाण (Who developed this special variety of Guava)

मित्रांनो बिहार कृषी विद्यापीठाच्या (Bihar Agricultural University) शास्त्रज्ञांनी पेरूची एक विशेष जात विकसित केली आहे. ह्या जातींचे पेरू हे काळ्या रंगाचे असतात म्हणुन ह्याला काळा पेरू म्हणून ओळखले जाते. पेरूची ही वाण खूप खास आहे, कारण त्यात आढळणारे पोषक घटक आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवतात.  यासोबतच ह्या पेरू मध्ये असलेले अँटी-एजिंग घटक वृद्धत्व रोखण्यासाठी मदत करतात.

शास्त्रज्ञांच्या मते, हा पेरू नियमित खाल्ल्याने दीर्घकाळ वृद्धत्व टाळता येऊ शकते. बिहार कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार,  या जातीच्या पेरूची लागवड सुमारे 2 ते 3 वर्षांपूर्वी केली गेली आणि आता ह्या जातीच्या पेरूला फळे यायला सुरुवात झाली आहे. त्यांना अशी आशा आहे की या जातीचा पेरू लवकरच व्यावसायिक लागवडीसाठी वापरला जाईल.

या जातीच्या पेरूची विशेषता (Characteristic of this Guava)

»या काळ्या जातीच्या पेरूमध्ये अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात.

»या जातीमध्ये रोगाशी लढण्याची क्षमता आहे म्हणजेच झाडाची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे.

»या जातीचा गेदू/लगदा/आतील भाग हा लाल रंगाचा आहे.

»बद्धकोष्ठता, मूळव्याध यांसारख्या आजारांत ह्या जातीच्या पेरूचे सेवन लाभदायी असल्याचा दावा केला जात आहे.

»या जातीच्या पेरूमध्ये कॅल्शियम आणि लोह भरपूर असल्याने शरीरातील ऍनिमियाच्या समस्यावर मात करता येऊ शकते.

English Summary: agri scientist developed a black guava
Published on: 21 December 2021, 01:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)