खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांचे पेरणीची लगबग सुरू आहे परंतु अजूनही राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पेरण्या रखडले आहेत. परंतु महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये चांगला पाऊस झाल्याने अशा भागांमध्ये पेरणीची लगबग सुरू आहे किंवा काही ठिकाणी करण्यात आल्या आहेत.
अजूनही पेरण्यांना वेळ असल्यामुळे या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना काही विविध पिकांच्या पेरणीच्या व्यवस्थापनाविषयी सल्ला दिला आहे. तो आपण या लेखात पाहू.
खरीप पिकांच्या व्यवस्थापनाविषयी सल्ला
1- कापूस- कापूस लागवड करण्याअगोदर बियाण्याला बीजप्रक्रिया करणे खूप गरजेचे असून त्यासाठी कापूस बियाण्यास स्युडोमोनास/ कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे.
यामुळे कपाशी पिकावरील करपा आणि मर या दोन्ही रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. तसेच कापूस पिकात नत्र स्थिरीकरण यासाठी अझटोबॅक्टर या जिवाणूसंवर्धकाची 10 मिली प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. कापूस लागवड 15 जुलै पर्यंत करता येईल.
2- तुर - तूर पिकाची पेरणी करण्याअगोदर तूर बियाण्यास अडीच ग्रॅम थायरम प्रति किलो याप्रमाणे चोळावे. त्यामुळे जमिनीतून होणाऱ्या विविध रोगांपासून पिकाचा बचाव होईल.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे पेरणी करण्याअगोदर तुरीच्या प्रति किलो बियाण्यास दहा ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम प्रति 10 किलो बियाण्यास गुळाच्या द्रावणातून चोळावे. तूर पिकाची लागवड 15 जुलै पर्यंत करता येईल.
नक्की वाचा:कापूस उत्पादकांसाठी महत्त्वाचे! कापसातील 'रूट नॉट नेमाटोड'ची लक्षणे आणि व्यवस्थापन
3- मका- मका पिकाची लागवड करणे अगोदर सायऍन्ट्रानीलिप्रोल (11.8 टक्के)+ थायमेथॉक्झाम (19.8 टक्के एफ एस ) सहा मिलि प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.
याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे मका लागवडी नंतर 15 ते 20 दिवसांपर्यंत अमेरिकन लष्करी आळी पासून पिकाला संरक्षण होते. बियाण्यास थायरम दोन ते अडीच ग्रॅम तसेच आझेटोबेक्टर हे जिवाणू संवर्धक 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे.
नक्की वाचा:सोयाबीन मध्ये चक्रभुंगा आलाय मग फक्त हे काम करा आणि उत्पन्न घ्या
Published on: 06 July 2022, 08:09 IST