Agripedia

सुगंधित शेती म्हणजे ॲरोमॅटिक प्लांट शेती होय. लेमन ग्रास, खस, मेंथा, जिरेनियम इत्यादी वनस्पती ॲरोमॅटिक प्लांट्स श्रेणीमध्ये येतात. केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मोदी सरकारचे लक्ष आहे की 2025 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे होय. सरकार आधुनिक गरज आणि मागणीच्या आधारे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. सुगंधी शेती म्हणजे ॲरोमॅटिक शेतीचे वैशिष्ट्य 1- दुष्काळग्रस्त भागांमध्ये शेती करणे शक्य- भारताचे भौगोलिक स्थिती ही विविधता असणारी आहे. भारताचे अर्धे क्षेत्रफळ हे दुष्काळग्रस्त दुसरा अर्धा भाग हा पूर समस्यांनी ग्रस्त आहे. दुष्काळग्रस्त भागांमध्ये सामान्यपणे पारंपारिक पिकांची लागवड करणे नुकसानदायक असते. कुणाची सोय असली तरीसुद्धा दुष्काळाचा परिणाम हा भूमिगत जल स्तरावर सुद्धा होतो. ॲरोमॅटिक प्लांट ची शेती दुष्काळग्रस्त भागांमध्ये सहजपणे करता येऊ शकते.

Updated on 28 June, 2021 12:04 PM IST

 सुगंधित शेती म्हणजे सुगंधित  शेती होय. लेमन ग्रास, खस, मेंथा, जिरेनियम इत्यादी वनस्पती सुगंधित  प्लांट्स श्रेणीमध्ये येतात. केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मोदी सरकारचे लक्ष आहे की 2025 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे होय. सरकार आधुनिक गरज आणि मागणीच्या आधारे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करीत  आहे.

 सुगंधी शेती म्हणजे सुगंधित   शेतीचे वैशिष्ट्य

  • दुष्काळग्रस्त भागांमध्ये शेती करणे शक्य- भारताचे भौगोलिक स्थिती ही विविधता असणारी आहे. भारताचे अर्धे क्षेत्रफळ हे दुष्काळग्रस्त दुसरा अर्धा भाग हा पूर समस्यांनी ग्रस्त आहे. दुष्काळग्रस्त भागांमध्ये सामान्यपणे पारंपारिक पिकांची लागवड करणे नुकसानदायक असते. कुणाची सोय असली तरीसुद्धा दुष्काळाचा परिणाम हा भूमिगत जल स्तरावर  सुद्धा होतो. सुगंधित  शेती  दुष्काळग्रस्त भागांमध्ये सहजपणे करता येऊ शकते.
  • सिंचनाची कमी आवश्यकता : सुगंधित शेती  साठी जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता नसते. पाण्याच्या फवार्‍याने म्हणजे तुषार सिंचन सारख्या साधनांनी ही  शेती करता येऊ शकते. आपल्याकडे  पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. दुष्काळग्रस्त भागांमध्ये भूमिगत जलस्तर  कमी होण्याची समस्या  उग्र  स्वरूपात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड करणे फायद्याचे ठरेल शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
  • सी एस आय आर अरोमा मिशनच्या माध्यमातून देत आहे या शेतीला प्रोत्साहन : सरकार अशा प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत असते. त्यासोबतच सीएसआयआर सारख्या सबसिडरी संस्था यांच्या माध्यमातून लोकां मध्ये जागृत करण्याचे काम करीत आहेत. सी एस आय आर द्वारा सन 2017 मध्ये ॲरोमा मिशन ची सुरुवात करण्यात आली. या मिशनमध्ये भारतातील एकिकृत चिकित्सा संस्थान, हिमालय जैव संसाधन प्राऊद्योगिकी संस्थान, सी एस आय आर राष्ट्रीय वनस्पती अनुसंधान संस्थान, सी एस आय आर  पूर्वोत्तर विज्ञान आणि प्रोऊद्योगिकी संस्थान या मिशनलापाठिंबा देत आहेत.त्याबरोबर शेतकऱ्यांना सुगंधित  शेती करण्यासाठीप्रोत्साहित करीत आहे.

सुगंधित  शेतीचे फायदे

 

1-सुगंधित शेती मधून अधिक उत्पन्न मिळते: पारंपारिक शेती मधून येणाऱ्या उत्पन्नाची तुलना केली तरतर सुगंधित शेती मधून येणारे उत्पन्न हे दुप्पट असते. भात, गहू तारखे पारंपारिक शेती मधून शेतकरी जवळजवळ पन्नास ते साठ हजार रुपये प्रतिवर्ष प्रतिएकर कमवू शकतो. परंतु सुगंधित  शेतीमधून प्रतिएकर शेतकरीसव्वा ते दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेऊ शकतो.

2-अतिवृष्टी,दुष्काळ इत्यादी परिस्थितीचा या शेतीवर कोणताही परिणाम होत नाही. पारंपारिक शेतीमध्ये दुष्काळामुळे, अतिवृष्टीमुळे किंवा कधीकधी पीक कापणी करून शेतात असते ते पावसात ओले झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानला सामोरे जावे लागते. बहुसंख्य शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन शेतीसाठी भांडवल उभे केले असते. जर अशा प्रकारचे नुकसान झाले तर शेतकरी आर्थिक परिषद अनेक काही वर्ष मागे जाऊ शकतो. अशा वेळेस बऱ्याचदा शेतकरी अनुदानाच्या रूपात मदत करते परंतु हे मदत अत्यल्प असते. परंतु  सुगंधित  शेतीमध्ये अतिवृष्टी, दुष्काळासारख्या समस्यांचा प्रभाव पडत नाही.

 

 

 या शेतीमधून रोजगार निर्माण होऊ शकतो.

 कृषी क्षेत्राच्या माध्यमातून भारतात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात काही कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होत असतो. उदाहरणार्थ शेतकरी जर भातशेती करत असेल तर या भात शेतीच्या माध्यमातून अप्रत्यक्ष स्वरूपात घाऊक विक्रेता, दुकानदार, होलसेलर, सरकारी कर्मचारी आणि अन्नाची  देखभाल करणारे इतर लोकांना रोजगार उपलब्ध होतो. याबाबतीत सी एस आय आर म्हणते की, मार्केटमध्ये सुगंधी तेलांना इतकी मागणी आहे की जर याला प्रोत्साहन दिले तर देशात जवळजवळ पंधरा लाख व्यक्तींना यामधून रोजगार उपलब्ध होईल. निर्मित सुगंधी तेलाचा उपयोग औषधी, कॉस्मेटिक्स, साबण आणि डिटर्जंट पावडर मध्ये केला जातो. सी एस आय आर म्हणते की यामधून 15 लाख लोकांना 15 लाख लोकांना रोजगार मिळेल आणि यामधून 25 हजार शेतकऱ्यांना  प्रत्यक्ष रुपात त्याचा फायदा होईल.

 

English Summary: aeromatic farming
Published on: 28 June 2021, 12:04 IST