Agripedia

देशी गाईचे तूप आहारात वापरणे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

Updated on 29 April, 2022 7:50 PM IST

देशी गाईचे तूप आहारात वापरणे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. पण तुम्हाला नाकात तूप सोडण्याचे फायदे आणि तोटे माहित आहेत का? 

             हो नाकात देशी गाईचे शुद्ध तूप टाकून तुम्ही बऱ्याच आजारापासून मुक्त होऊ शकता. देशी गाईचे शुद्ध तूप आयुर्वेदात औषध म्हणून ओळखले जाते. रात्री झोपताना देशी तुपाचे फक्त 2 थेंब नाकात टाकल्याने अनेक फायदे होतात.

 नाकात तूप सोडण्याचे फायदे:-

त्रिदोष संतुलित ठेवण्यासाठी - वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांना नाकात तूप टाकून समतोल साधता येतो. यासाठी गाईच्या तुपाचे दोन थेंब दिवसातून तीन वेळा नाकात टाका.

डोळ्यांसाठी उत्तम आरोग्यासाठी
जेव्हा तुम्ही गाईचे तूप नाकात घालता तेव्हा ते डोळ्यांची पाहण्याची क्षमता वाढवते. दृष्टी वाढवण्यासाठी, रात्री झोपताना तुपाचे दोन थेंब नाकात घाला.
 केस गळणे थांबवण्यासाठी
तुपामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे आपल्या केसांसाठी फायदेशीर असतात. तुमचे केस गळणे थांबवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या तुपाचे दोन थेंब नाकात घाला.
 स्मरणशक्ती साठी
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नाकातील तूप फायदेशीर आहे. तुपाचे दोन थेंब नाकात घाला.

डोकेदुखीमध्ये

 जर तुम्हाला डोकेदुखी आणि मायग्रेनने त्रास होत असेल तर सकाळी आणि संध्याकाळी नाकात गायीच्या तुपाचे दोन थेंब टाका, यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल.

  इतर फायदे -

- रात्री झोपण्यापूर्वी तुपाचे दोन थेंब नाकात टाकल्याने निद्रानाशाची समस्या संपते.

 - तूप ओतल्याने नाकाचा कोरडेपणा संपतो.

- नाकात तूप सोडल्याने एखाद्या व्यक्तीला कोमामधून उठवण्यास मदत होते.

- कफाची समस्या दूर होते.

- नाकात तूप टाकल्याने तणाव दूर होण्यास मदत होते.

- यामुळे कर्करोग होण्याची शक्यताही कमी होते.

 नाकात तूप सोडण्याचे तोटे-

 गायीच्या तुपाचे काही थेंब(प्रमाणात) नाकात घातल्याने कोणतेही गंभीर नुकसान होत नाही. यासाठी तुम्ही फक्त देशी गायीचे शुद्ध तूप वापरावे. जर तुम्हाला तुपाच्या वासाने कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर ते वापरू नये.

टीप- वरील कुठलाही प्रयोग करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Nutritionist & Dietician 

 Naturopathist

 Amit Bhorkar

whats app: 9673797495

English Summary: Advantages and disadvantages of nasal congestion
Published on: 29 April 2022, 07:46 IST