Agripedia

अलीकडे बी बियाणे, खते, कीटकनाशके आदींच्या वाढत्या खर्चाने शेतकऱ्यांना बऱ्याच पिकांचे उत्पादन घेताना उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसत नाही. अनेकदा उत्पादन खर्च जास्त तर त्यातून मिळणारे उत्पन्न कमी अशी स्थिती असते. शेतकऱ्यांना नफा न होता त्याला सामोरे जावे लागते.

Updated on 14 October, 2021 4:32 PM IST

अलीकडे बी बियाणे, खते, कीटकनाशके आदींच्या वाढत्या खर्चाने शेतकऱ्यांना बऱ्याच पिकांचे उत्पादन घेताना उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसत नाही. अनेकदा उत्पादन खर्च जास्त तर त्यातून मिळणारे उत्पन्न कमी अशी स्थिती असते. शेतकऱ्यांना नफा न  होता  त्याला सामोरे जावे लागते.

त्यामुळे शेतकऱ्यांचा पिकांचा होणारा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी रासायनिक खतांना पर्याय म्हणून जैविक खताचा उपयोग केला तर उत्पादन खर्चातही बचत होते व उत्पन्नात देखील वाढ होते. या कसे बनवावेलेखात आपण जैविक खतांचा महत्त्वाचा भाग असलेल्या जीवामृतवापराचे  फायदे व ते बनवण्याची पद्धत जाणून घेऊ

 जीवामृत कसे बनवावे?

 जीवामृत तयार करण्यासाठी दहा लिटर गोमूत्र किंवा पाच ते सात लिटर देशी गाईचे गोमुत्र घेतले तरी चालते. तीन किलो ग्रॅम गूळ,  गाईचे पाच किलो ग्रॅम शेन,दोन किलो बेसन पीठ आणि दोनशे लिटर पाण्याची टाकी एवढे साहित्य जीवामृत बनवण्यासाठी आवश्यक असतं.

 सुरुवातीला एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये किंवा डब्यामध्ये पाच किलो गाईचे शेण घेऊन त्यामध्ये गोमूत्र घालावे. ते अशा पद्धतीने मिसळावे की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ राहणार नाही. दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गूळ चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावा.

या मिश्रणामध्ये गुळ टाकण्याचा फायदा असा होतो की, तयार झालेल्या मिश्रणामध्ये जे उपयुक्त बॅक्टेरिया असतात ते पटकन ऍक्टिव्ह  होतात. गूळ मिसळताना त्याचे खडे राहणार नाहीत तसेच ते पाण्यामध्ये पूर्णपणे एकजीव होतील अशा पद्धतीने मिसळावे. नंतर त्या गुळाच्या मिश्रणाला तयार केलेल्या शेणयुक्त व गोमूत्र युक्त मिश्रणामध्ये टाकून चांगल्या प्रकारे ते मिसळावे. नंतर या मिश्रणाला ढवळून घ्यावे.

 या मिश्रणामध्ये दोन किलो ग्रॅम बेसन पीठ टाकून चांगल्या पद्धतीने मिक्स करावे. थोड्या वेळा पर्यंत हे मिश्रण चांगल्या प्रकारे हलवत राहावे. नंतर सगळे मिश्रण 200 लिटर च्या बॅरल मध्ये टाकून त्या बॅरल मध्ये पूर्ण पाणी भरावे. नंतर शेतातील बांधावरची मूठभर माती बॅरल मध्ये टाकून सगळे मिश्रण एकत्र करावे. हे तयार केलेले  द्रावण सावलीत ठेवावे. हे द्रावण कमीत कमी दोन ते तीन दिवस सावलीत ठेवून सकाळ-संध्याकाळ काठीने ढवळून घ्यावे. सात दिवसात जीवामृत वापरले तरी चालते. एक एकर क्षेत्रासाठी दोनशे लिटर जीवामृत पुरेसे ठरते.

 जीवामृत वापरायचे फायदे

  • पण जीवामृताचा उपयोग केला तर पिकांची वाढ जोमदार होते आणि उत्पादनात चांगल्या प्रकारचे वाढ दिसून येते.
  • जीवामृत वापरल्याने पिकांची सहनशीलता वाढते. कीड व रोगांना पिकापासून दूर ठेवण्याची प्रतिकारक शक्ती उत्पन्न होते.
  • जीवामृत वापरल्याने सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. शेतामध्ये उपयुक्त जिवाणूंची संख्या प्रचंड वाढते. त्यामुळे पिकांचा किडीपासून बचाव होतो.
  • जर आपण ठिबक सिंचन पद्धती वापरत असाल तर त्याद्वारे ही पिकांना ड्रीप द्वारे जीवामृत सोडता येत.
  • जीवामृत तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर करणे फायद्याचे ठरेल.
English Summary: advantage of jivamrut in crop and making mathod to jivamrut
Published on: 14 October 2021, 04:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)