गोमुत्र मध्ये पिकाची वाढ व उत्पन्नावर निश्चित चांगले परिणाम करणारी द्रव्ये आहेत. गोमूत्र एकाच वेळेस तीन प्रकारे पिकाला मदत करते. ते म्हणजे खत म्हणून, हार्मोन म्हणून, कीड व रोग नाशकअशा तीन प्रकारचा फायदा या पिकांना गोमूत्र वापराने मिळत असतो. गोमूत्रा मध्ये पिकांसाठी असलेल्या आवश्यक घटकांचा विचार केला तर त्यामध्ये 70 ते 80 टक्के पाणी असले तरी फास्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश, कार्बोनेट आणि पोटॅश, अमोनिया, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, गंधक, तांबे, लोह, कार्बलीक आमल, लॅक्टोज तसेच इतर महत्वाचे संपर्क असतात व ही सगळी घटक झाडांच्या वाढीसाठी पूरक आहेत.
गोमूत्राचा वापर कसा करावा?
पिकांवर फवारण्यासाठी गोमूत्राच्या 10 ते 15 टक्के पाण्यातील द्रावणात इतर पदार्थ उदा.हिंग आणि थोडे साबणाचे पाणी मिसळावे. तसेच कडूनिंब, जंगली एरंडी, निरगुडी, शेवंती, कन्हेर, निलगिरी, कांदा, मिरची इत्यादी वनस्पतींची पाने व फळे बारीक कापून किंवा वाटून गोमूत्र टाकावे. कडुनिंबाचा 5% पाण्यातील थंडर क आणि इतर वनस्पतींच्या गरम अर्क ( पाच ते दहा टक्के) गोमूत्रात मिसळल्यास फवारणी जास्त परिणामकारक ठरते. बाजारात गोमुत्रा वर आधारित व्यापारी कीडनाशके ही उपलब्ध आहेत.
या मिश्रणाची फवारणी केल्यास दोघा मधील रासायनिक घटक एकत्र येतात. यामुळे किडी व रोगांचे प्रमाण कमी होते. झाडांना थोड्या प्रमाणात अन्नद्रव्येही मिळाल्यामुळे झाडाची अवर्षण विरुद्ध क्षमता वाढतेआणि खताची मात्रा लांबणीवर टाकता येते.
हिंगाचा वापर केल्यामुळे त्याच्या वासाने किडीची मादी अंडी कमी प्रमाणात टाकते. उडणाऱ्या किडी वासामुळे दूर जातात. किडीची वाढ खुंटते, त्यांच्या जीवनाअवस्था वर त्याचा अडथळा येतो, त्यांची प्रजनन क्षमता कमी होते. इत्यादी कायदेशीर बाबी गोमूत्र व वनस्पतीजन्य पदार्थांचा मिश्रणामुळे शक्य होतात आणि पिकाचे नुकसान कमी होते की टळते.
झाडांना गोमुत्राची आंघोळ
वनस्पतींवरील किडीचा प्रादुर्भावला रोखण्याची ताकद गोमूत्रात असते. गोमुत्राचे द्रावण म्हणूनच झाडासाठी फायदेशीर आहे. गोमुत्राचे द्रावण तयार करताना 900 मिली पाण्यात शंभर मिली गोमूत्र मिसळावे. एक गोमुत्राचा द्रावण वनस्पतींवर आठवड्यातुन एकदा फवारल्यास किडीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण तर येतच पण त्याचबरोबर गो मूत्रातील पोषक द्रव्यांमुळे वनस्पतींची पाने हिरवी आणि तजेलदार दिसू लागतात आणि वनस्पतींची वाढही चांगली होते. जोरदार फवाऱ्यानेप्रत्येक पानास वरून खालून नीट आंघोळ घातली जाईल अशा रीतीने गोमूत्राच्या द्रावणाची फवारणी करावी.
लेखक-
शरद केशवराव बोंडे
9404075628
Published on: 18 July 2021, 10:42 IST