Agripedia

अडुळसा हे वनस्पती भारतामध्ये सगळीकडे आढळते. परंतु नैसर्गिक अवस्थेमध्ये अडुळसा फार कमी प्रमाणात मिळतो. म्हणून त्याची शेतात लागवड करणे महत्त्वाचे आहे.अडुळसा बद्दल म्हटले तर अडुळसा चे झाड पाच ते आठ फूट उंच वाढते. तसेच त्याचे पानेकुडाच्या पानासारखी दहा ते पंधरा सेंटिमीटर लांब व 5 ते 7 सेंटीमीटर वृंद तसेच लांबट, वर्तुळाकार व टोकांकडे निमुळती होतात.

Updated on 09 January, 2022 5:23 PM IST

अडुळसा हे वनस्पती भारतामध्ये सगळीकडे आढळते. परंतु नैसर्गिक अवस्थेमध्ये अडुळसा फार कमी प्रमाणात मिळतो. म्हणून त्याची शेतात लागवड करणे महत्त्वाचे आहे.अडुळसा बद्दल म्हटले तर अडुळसा चे झाड पाच ते आठ फूट उंच वाढते. तसेच त्याचे पानेकुडाच्या पानासारखी दहा ते पंधरा सेंटिमीटर लांब व 5 ते 7 सेंटीमीटर वृंद तसेच लांबट, वर्तुळाकार व टोकांकडे निमुळती होतात.

अडुळशाची फुले ही गुच्छात येतात व त्यांचा रंग पांढरा असतो. फळे ही बोटाच्या आकाराची असून त्यामध्ये चार बिया असतात. पिकल्यावर त्या बिया फुटतात व आला होतात. अडुळसा ची लागवड करताना  ती झाडाची कटिंग किंवा बियांपासून करतात. अडुळशाच्या पाण्यामध्ये गंधयुक्त उडणारे तेल, वसा, टाळ, कडू सत्व वासीकिन, गोंद वशर्करा आढळते. अडुळशाच्या मुळाच्या सालीत पानापेक्षा अधिक वासिकीन आढळते. तसेच याच्या पानांचा व मुळाचा उपयोग औषधी म्हणून केला जातो.

 अडुळशाच्या औषधी गुणधर्म

  • अडुळसा पानांचा फुलांचा सहित रस काढून मधासोबत घ्यावा. कितीही दिवसांचा दमा, खोकला असला तरी तो कपक्षय दूर होतात.
  • काविळवर अडुळशाच्या पानांचा फुला सहित रस काढून त्यामध्ये खडीसाखर व मध घालून घ्यावे.
  • कप, खोकला यावर अडुळसा, गुळवेल व रिंगणी यांचा काढा मध घालून घ्यावा.
  • अडुळशाची पाने जंतुनाशक असतात त्यामुळे ते पाण्यात टाकल्यास पाणी खराब होत नाही. तसेच धान्य मध्ये ठेवल्यास कीड लागत नाही.
  • शेतामध्ये अडुळसा पानांचा उपयोग खत म्हणून देखील करता येतो.

 अडुळशाच्या पानांचा लेपाचा वापर बाहेरून सुजनाशक, जंतुनाशक, वेदनाशामक व त्वचारोगात करतात

अडुळसा ची लागवड

  • लागणारी जमीन- अडुळशाचे लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत करता येते.
  • पूर्वमशागत- लागवडीअगोदर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जमीन नांगरावी व भुसभुशीत करावी.
  • लागवड- अडुळसा याची लागवड बियांपासून व फांदी कलमापासून करतात. बियांपासून जर लागवड करायची असेल तर 60 बाय 15 सेंटिमीटर अंतरावर तीन ते चार बिया पेराव्यात. तसेच फांदीपासून लागवड करायची असल्यास उन्हाळ्यात कलमे तयार करून रोपे तयार करावीत व दीड महिन्यांची रोपे असताना लागवडीसाठी वापरावे.
  • खतपुरवठा- जमिनीचा पोत आणि कस पाहून शेणखत व कंपोस्ट खताचा वापर करावा. अडुळसा ची लागवड केल्यानंतर लगेच पाणी द्यावे व नंतर गरजेप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  • अडुळशाची काढणी- अडुळशाच्या वाढीला पोषक हवामान व जमीन असल्यास दोन वर्षात झाडांची वाढ अडीच ते तीन फूट होते. तसेच पाने व फुले तसेच साल काढणीतपीक योग्य असते.
  • अडुळसा वर काढणी नंतरची प्रक्रिया- अडुळशाच्या झाडाची पाने, फळे व मुळे वेगळे करून सावलीत सुकवावे. प्रत्येक भाग वेगळा ठेवावा व पावडर करावी.
  • अडुळसा चे उत्पादन- पानांचे उत्पादन दोन ते तीन टन, अडुळसा मूळ्यांचे चे उत्पादन 200 ते 300 किलो प्रति एकरी मिळते. ताजा वनस्पतींचा भागांचा वापर करायचा असल्यास त्वरित प्रक्रिया केंद्रात पाठवणी करावी किंवा वाळवून साठवणूक करायचे असल्यास सावलीत वाळवावी व पॅकिंगमध्ये बांधणी करून थंड व कोरड्या जागेत साठवण करावी. अडुळशाच्या ताज्या उपयुक्त रंगांना जास्त मागणी असल्यामुळे प्रक्रिया उद्योगा जवळ लागवड करणे जास्त फायदेशीर आहे.
English Summary: adulasa cultivation and medicinal properties of adulsa that useful for many disease
Published on: 09 January 2022, 05:23 IST