महाराष्ट्र मध्ये उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.खासकरून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये ऊस लागवड मोठ्या प्रमाणात होते.आपल्याला माहित आहेच की राज्यामध्ये उसाची लागवड ही पूर्वहंगामी, सुरू आणि आडसाली या तीन हंगामात केली जाते.
त्याच्या हंगामाची त्यांच्या प्रकारची वैशिष्ट्य असतात. परंतु ऊस लागवडीमध्ये आडसाली हंगाम फायद्याचे दिसून येतो. उसाची उगवण होते तेव्हापासून अनुकूल हवामान मिळाल्याने उगवण चांगली होऊन फुटवा जोमदार येतो. उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये जेव्हा पाण्याचा ताण बसण्याचा कालावधी असतो तेव्हा आडसाली ऊस आठ ते नऊ महिन्यांचा असतो. त्यामुळे पाण्याचा ताण बऱ्यापैकी सहन करण्याची क्षमता यामध्ये असते. जर कीड व रोग यांचा प्रादुर्भाव याचा विचार केला तर सुरू आणि खोडवा उसाच्या तुलनेत आडसाली उसामध्ये याचे प्रमाण कमी राहते. त्यामुळे बऱ्याच गोष्टींचा विचार केला तर आडसाली ऊस फायद्याचा ठरतो.
आडसाली उसासाठी जमिनीची निवड
ज्या जमिनीचा सामू साडेसात ते आठ आहे आणि ती मध्यम व भारी त्या प्रकाराची जमीन यासाठी चांगली राहते. जमिनीची खोली 60 ते 120 सेंटीमीटर पर्यंत असणे गरजेचे आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे 0.5 टक्क्यांपेक्षा जास्त असावे.
बेण्याची निवड
आता प्रत्येक पीक लागवडीमध्ये बियाणे महत्त्वाची भूमिका निभावतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे बियाणे चांगले असेल तर येणारे उत्पादन देखील भरघोस मिळते. हीच बाब ऊस लागवडीमध्ये सुद्धा लागू होते. जर उसाचे बेणे दर्जेदार असेल तर मिळणारे उत्पादन देखील तेवढेच दर्जेदार मिळते.
उसाचे उत्पादन घटने मागील महत्वाचे कारण हे बेण्याच्यादर्जाकडे होणारे दुर्लक्ष हे आहे. बेण्याची निवड करताना ते मळ्यात वाढवलेले नऊ ते 11 महिने वयाचे, निरोगी आणि रसरशीत तसेच अनुवंशिक दृष्ट्या चांगले आणि शुद्ध असणारी बेणे वापरणे गरजेचे आहे. यामुळे उसाच्या उत्पादनात 15 टक्क्यांपर्यंत वाढ होते.
बेण्याची निवड
1- उसाचे बेणे हे रसरशीत वसशक्त असावे. तसेच बेणे शुद्ध, भेसळ विरहीत असावे.
2- निवडलेल्या बेण्याचे डोळे फुगीर व हिरवेगार असावेत. बेणे 9 ते 11 महिने वयाचे असावे.
3- रोग व किड विरहीत असावे. तसेच बेण्याच्या डोळ्यावरील पाचट काढलेले नसावे.
आडसाली उसाची लागवड तंत्र
1- आडसाली उसाची लागवड प्रामुख्याने15 ऑगस्ट या कालावधीत करावी.
2- सरी पद्धत- लागवड करण्यासाठी मध्यम जमिनीत 100 ते 120 सेंटीमीटरव भारी जमिनीत 120 ते 150 सेंटिमीटर अंतरावर सरी पाडावी.
3- जोडओळ पट्टा पद्धत- जोडओळ पट्टा पद्धतीने लागवड करायची असल्यास मध्यम जमिनीसाठी अडीच फुटावर तर भारी जमिनीसाठी तीन फुटावर सलग सऱ्या पाडाव्यात. दोन सऱ्यांमध्ये उसाची लागवड करून एक सरी रिकामी सोडावी. त्यामुळे 75 ते 150 सेंटिमीटर व 90 ते 180 सेंटीमीटर या पद्धतीने सरी पडेल. रिकाम्या असलेल्या सरीच्या दोन्ही बगलेला अंतर पीक किंवा हिरवळीच्या खतासाठी धिंचा किंवा ताग घेता येईल.
आडसाली उसाचे एकात्मिक खत व्यवस्थापन
1- शिफारसीनुसार चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्ट खतजमिनीमध्ये टाकावे व चांगले मिसळून घ्यावे. यापैकी अर्धी मात्रा दुसऱ्या नांगरटी पूर्वी द्यावी व उरलेली मात्रा सरीमध्ये द्यावी.
2- शेणखत अगर कंपोस्ट खत उपलब्ध झाले नाही तर ऊस लागवडीपूर्वी ताग किंवा धैंचा यासारखे हिरवळीचे पीक घेऊन पिक जमिनीत गाडावे.
3-खताचे व्यवस्थापन करताना मातीचे परीक्षण करून घेणे गरजेचे आहे.त्यानुसारच खतांचे नियोजन करावे. मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील तेवढीच गरज असते. त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर गरजेनुसार हेक्टरी 25 किलो फेरस सल्फेट,20 किलो झिंक सल्फेट आणि दहा किलो मॅग्नीज सल्फेट व पाच किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये10:1 प्रमाणात दोन ते तीन दिवस भरून सरीमध्येचळी घेऊन मातीआड करावीत.
4- ऊसाच्या जाती मध्ये को 86032 ही जात रासायनिक खतांच्याजास्त खताच्या मात्रेस चांगला प्रतिसाद देते. प्रति हेक्टर नत्र, स्फूरद आणिपालाश या रासायनिक खतांचे 25 टक्के जादा मात्रा द्यावी.
5- अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू या जिवाणू खताची बीजप्रक्रिया केल्यास नत्र खताची मात्रा 50% व स्फुरद खताची मात्रा 25 टक्क्यांनी कमी करून द्यावे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:जंगल जलेबी फळाचे फायदे तोटे माहित आहेत? वाचून वाटेल आश्चर्य...
नक्की वाचा:जनावरांना विषबाधा झाल्यास दगावत आहेत जनावरे, शेतकऱ्यांनो 'हे' उपाय करून टाळा विषबाधा..
Published on: 24 April 2022, 05:57 IST