Agripedia

कमी पाण्यात अधिक उत्पादन यासाठी सूक्ष्म सिंचनाचा भाजीपाला व फळे पिकात अवलंब केला जातो.

Updated on 04 February, 2022 7:20 PM IST

कमी पाण्यात अधिक उत्पादन यासाठी सूक्ष्म सिंचनाचा भाजीपाला व फळे पिकात अवलंब केला जातो.परंतु आता उसासारख्या पिकात ठिबक सिंचनाचा वापर होताना दिसत आहे.म्हणजेच ठिबक सिंचनाचा वापर वाढत आहे.सूक्ष्म सिंचन पद्धती ठिबक सिंचन संचाची काळजी व देखभाल घेणे गरजेचे असते. ठिबक सिंचन संचाची कार्यक्षमता कायम राखण्यासाठी संचाची वेळोवेळी देखभाल करणे गरजेचे आहे. जेणेकरून वेळेची, ऊर्जेची बचत होते व संचाचे जीवनमान वाढते.या लेखात आपणठिबक संचाच्या देखभालीसाठी कराव्या लागणाऱ्या आम्ल व क्‍लोरिन प्रक्रियेविषयी माहिती घेणार आहोत.

ठिबक संचाच्या देखभालीसाठी करावी लागणारी आम्ल प्रक्रिया

लॅटरल व ड्रीप मध्ये साचलेले क्षारजसे कॅल्शियम कार्बोनेट,मॅग्नेशियम कार्बोनेट किंवा फेरिक ऑक्साइड ठिबक सिंचन संचाचे कार्य मंदावतात अथवा बंद पाडतात. हे जमा झालेले क्षार स्वच्छ करण्यासाठी आम्ल प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी सल्फ्युरिक आम्ल(65 टक्के), हायड्रोक्लोरिक आम्ल (36 टक्के), नायट्रिक आम्ल (60 टक्के ) किंवा फोसफेरीक आम्ल( 85 टक्के)यापैकी कुठलेही उपलब्ध होणारेआम्ल वापरू शकता.

आम्ल द्रावण तयार करण्याच्या पद्धती

एका प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये एक लिटर पाणी घेऊन त्यात ऍसिड मिसळत जावे.

–आम्ल मिसळताना मध्येमध्ये पाण्याचा सामू पीएच मीटर नेआता लिटमस पेपरने मोजावा.

–पाण्याचा सामू तीन ते चार होईपर्यंत ( लिटमस पेपर चा रंग फिकट गुलाबी होईपर्यंत) पाण्यात ॲसिड मिसळत जावे.

–पाण्याचा सामू तीन ते चार करण्यासाठी किती ऍसिड लागले ते लिहून ठेवावे.

पंप चालू केल्यानंतर संचाच्या शेवटचा ड्रीपर पर्यंत पाणी पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो याची नोंद घ्यावी. साधारणतः पंधरा मिनिटे वेळ लागतो असे गृहीत धरावे.

ठिबक संचाच्या देखभालीसाठी असलेली क्‍लोरिन प्रक्रिया

ठिबक संचातील पाईप,लॅटरल, दिफर्स यामध्ये झालेल्या शेवाळ वाढीमुळे संचाची कार्यक्षमता मंदावते.ठिबक सिंचन संच यामध्ये जैविक व सेंद्रिय पदार्थांचे झालेली वाढ रोखण्यासाठी क्‍लोरिन प्रक्रिया चा उपयोग होतो. यासाठी ब्लिचिंग पावडर चा उपयोग करावा. त्यामध्ये 65 टक्के मुक्त क्लोरीन असतो.अथवा सोडियम हैपो क्लोराईड वापरावे.त्यामध्ये 15% मुक्त क्लोरीन असतो. ब्लिचिंग पावडर हा सर्वात स्वस्त व सहज बाजारात उपलब्ध होणारा क्लोरीन चा स्त्रोत आहे.

परंतु सिंचनाच्या पाण्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण ( 20 पीपीएम पेक्षा जास्त )जास्त असल्यास ब्लिचिंग पावडर वापरू नये. आम्ल प्रक्रिया ची गरज असल्यास टीक्‍लोरिन प्रक्रिया पूर्वीच करून घ्यावी. कारण बाहेर पडणारा क्लोरीन वायू विषारी असतो

क्‍लोरिन प्रक्रिया खालील प्रमाणे करावे.

–ठिबक सिंचन संचाच्या विसर्ग दराप्रमाणे पूर्ण संचातून 20 ते 30 पीपीएम क्लोरीन जाईल एवढे क्लोरीन द्रावण संचात सोडून —-संच 24 तास बंद ठेवावा.

–क्लोरीनचे द्रावणातील प्रमाण मोजण्यासाठीक्लोरीन पेपर चा उपयोग करावा.

–नंतर संपूर्ण ठिबक संच फ्लशकरून घ्यावा.

English Summary: Acid and chlorine treatment required for drip maintenance
Published on: 04 February 2022, 07:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)