Agripedia

सोयाबीन बाजारभाव पाहता सध्या सोयाबीनचे भाव स्थिर आहेत. सोयाबीनला ६००० ते ६५०० पर्यंत चांगला भाव मिळतो आहे.

Updated on 21 January, 2022 1:24 PM IST

सोयाबीन बाजारभाव पाहता सध्या सोयाबीनचे भाव स्थिर आहेत. सोयाबीनला ६००० ते ६५०० पर्यंत चांगला भाव मिळतो आहे. मागच्या दोन वर्षातील सोयाबीनचे बाजार तेजीत असल्यामुळे इतर पिकांना फाटा देत शेतकऱ्यांनी आपला मोर्चा सोयाबीनकडे वळवला आहे. सध्या उन्हाळी सोयाबीनची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. उन्हाळी सोयाबीनची पेरणी १५ - २० जानेवारी पर्यंत करावी असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील तज्ञ समितीने केला आहे

शेतकऱ्यांचा कल सोयाबीन कडे

सध्या अनेक शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीनचे उत्पादन घेण्याकडे आहे. सध्या भुईमुगाची लागवड केली जाते. मात्र भुईमुगापेक्षा अनेक शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीनचे उत्पादन घेण्याकडे आहे. उन्हाळी सोयाबीनची लागवड ही मुख्यतः खरिपातील बियाणे मिळण्यासाठी केली जाते मात्र बियाण्यांसोबतच उत्पादन म्हणूनही शेतकरी सोयाबीन लागवड करीत आहेत. सोयाबीन या पिकाची गणना नागदी पीक म्हणून केली जाते.

२०२१ मध्ये खरिपातील अतिवृष्टी मुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. मात्र दर चांगला असल्याने अद्यापही सोयाबीन घेण्याकडेच शेतकऱ्यांचा कल आहे. शिवाय सध्या चांगला पाऊस झाल्याने पाण्याची देखील उपलब्धता आहे. त्यामुळे अतिवृष्टीत घटलेले सोयाबीनचे उत्पादन उन्हाळी सोयाबीनच्या माध्यमातून भरून काढणे शक्य आहे. जरी सोयाबीन पेरणी १५ - २० तारखेपर्यंत करण्यास सांगितले असले तरी काही शेतकरी ३० जानेवारी या तारखेपर्यंत पेरणी करू शकतात.

 

 या कारणामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन ची पसंती

१) सोयाबीनला मिळणारा दर

२) सोयाबीन पेरणीपासून काढणीपर्यंत उपलब्ध झालेले यानंतर

 ३) पाऊस चांगला झाल्यामुळे पाण्याची उपलब्धत

४) केवळ साडेतीन महिन्यात येणारे पीक

५) कृषी विद्यापीठे आणि कृषीतज्ञांचा सल्ला.

६) बाजारात वाढलेली मागणी

 

From Great farmer's

English Summary: According to experts, plant summer soybeans till this date.
Published on: 21 January 2022, 01:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)