मोती कसे तयार होतात? : मोती हा सजीवाद्वारे निर्मित आहे. मोती हे एक नैसर्गिक रत्न असून ते मोलस्क नावाच्या शंबुकामध्ये (शिंपल्यामध्ये) तयार होते. सध्या गोड्या पाण्यात मोत्यांची शेती करण्याचा प्रयोग केला जात असून तो यशस्वी ठरत आहे.
बाजारपेठेतील मागणी : हिरे, जवाहिर, सोने या खालोखाल साजश्रृंगारामध्ये मोत्यांना महत्त्व आहे. त्यामुळे भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारातही मोत्याला प्रचंड मागणी आहे.
मोत्याला लोकांची पसंती : सध्या डिझाईन मोत्यांना खूप मागणी असून त्यांना बाजारात खूप दर मिळत आहे. विशेष म्हणजे देशातील बाजारापेक्षा परदेशात मोत्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. इतकेच काय तर शिंपल्यांनाही बाजारात मोठी मागणी असते. शिंपल्यांपासून सजावटीच्या वस्तू तयार केल्या जात असतात. शिंपल्यांपासून कन्नोज मध्ये परफ्यूम तेल काढले जाते.
मोती व्यवसाय आणि प्रक्रिया-
हंगाम :या शेतीसाठी चा अनुकूल हंगाम हा ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान असतो.
आवश्यक गोष्टी : स्वतःची जागा असावी, इथे लहान तलाव बांधून यात हवे तितके ऑयस्टर (शिंपले) वाढवून मोत्यांचे उत्पादन सुरू करता येते.
व्यवसाय खर्च :
प्रत्येक ऑयस्टरची बाजारभावाने किंमत १५ ते २५ रुपये इतकी आहे.
तर मोती बीजरोपण केलेले शिम्पली ही साधारणतः १५० रु पर्यन्त विकत मिळू शकतात. (हेही सोयीस्कर पडते)
या तलावामध्ये उभारलेल्या संरचनेवर सुमारे १५ हजार रुपये खर्च येतो.
याव्यतिरिक्त एक हजार रुपये आणि पाण्याच्या प्रक्रियेसाठी एक हजार रुपयांची उपकरणे घेणे आवश्यक आहे.
प्रक्रिया :दहा बाय दहा फुटाच्या आकाराचे तलाव केले, तर त्यात तीन हजार शिंपले लावता येतात.
एका शिंपल्यात दोन मोती बनतात. तीन हजारांपैकी किमान २४०० शिंपले जीवंत राहतात.
मरण्याचे प्रमाण वीस टक्के इतके असते. या शिंपल्यांमधून किमान पाच हजार मोती तयार होऊ शकतात.
या शिंपल्याची योग्य काळजी घेतली तर साधारणतः ५००० शिंपल्यासह सर्व ६०००० खर्च गृहीत धरला तरीही वर्षाकाठी ६-७ लाख उत्पन्न मिळू शकते.
अंदाजित बाजारभाव व प्रॉफिट : एक शिंपल्याची किंमत वीस ते तीस रुपये आहे हे आपण पहिलेच. बाजारात एक मी.मी ते वीस मी.मी मोतीची किंमत हि साधारण तीनशे रुपये ते पंधराशे रुपये असते. छोट्या स्वरूपातील उद्योग वर्षाकाठी ६ ते ७ लाख रुपये तर मोठ्या स्वरूपात हा व्यवसाय केल्यास या उत्पादनातून वर्षाकाठी सुमारे ११ तर १२ लाख रूपये सहज कमवणारे लोक आहेत. ही शेती कमी मेहनतीत आणि कमी खर्चात अधिक नफा देऊ शकते.
कुठे मिळेल प्रशिक्षण?
मोत्यांच्या शेतीचे प्रशिक्षण ओरिसाच्या सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ फ्रेशवॉटर ऍक्वाकल्चर, भुवनेश्वर, ओरिसा येथे दिले जाते. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मार्गदर्शन केंद्र सुरू असून इंटरनेट वरून या केंद्रांची माहिती मिळवू शकता.
-विनोद धोंगडे नैनपुर
VDN AGRO TECH
Published on: 13 October 2021, 06:57 IST